माफसूत काही तासांत पदोन्नतीचे आदेश बदलले

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

नागपूर : गुणवत्तावर्धनअंतर्गत देण्यात आलेल्या पदोन्नती (CAS) आदेशात अवघ्या काही तासांतच बदल करण्यात आल्याचा धक्‍कादायक प्रकार समोर आला आहे. माफसू (महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठ) मधील हा प्रकार चव्हाट्यावर येताच त्यास आता लिपिकाची चूक म्हणून सारवासारव केली जात आहे.

माफसूचे कुलगुरू डॉ. आदित्यकुमार मिश्रा यांचा कार्यकाळ सात सप्टेंबर रोजी संपुष्टात आला. कार्यकाळ पूर्ण होण्याच्या चार महिने आधीच त्यांनी गुणवत्तावर्धनअंतर्गत पदोन्नतीची तयारी चालविली होती; परंतु वेळेत ही प्रक्रिया पूर्ण केली गेली नाही. डॉ. मिश्रा कार्यकाळ संपून विद्यापीठाबाहेर पडले. त्याचवेळी पदोन्नतीचे आदेश अनेकांना व्हॉट्‌सॲपवर तर काहींना ईमेलवर पाठविण्यात आले; परंतु या आदेशात अवघ्या काही तासांतच बदल करण्यात आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. या प्रकरणी नेमके काय घडले हे मात्र गौडबंगालच ठरले आहे.  

आदेश संशयास्पद असल्याचा आरोप ज्यांना पदोन्नती मिळाली त्यांना आदेशही ७ सप्टेंबरलाच मिळाले. पहिल्या आदेशात सध्याचे पद त्यासोबतच पदोन्नतीनंतर कोणत्या विभागाचे प्राध्यापक झाला आहेत, याचाही उल्लेख होता. पहिल्या आदेशात याप्रमाणे सुमारे ४ कॉलम होते; मात्र त्याच दिवशी काही तासांतच तडकाफडकी पहिल्या आदेशात बदल करून दुसरा आदेश काढण्यात आला. दुसऱ्या आदेशात केवळ तीन कॉलम ठेवण्यात आले. पदोन्नतीनंतर कोणत्या विभागाच्या प्राध्यापकपदी नियुक्‍ती झाली, हा कॉलम गाळण्यात आला. हा सारा प्रकार संशयास्पद असल्याचा आरोप आता होऊ लागला आहे.

सुरवातीला काढण्यात आलेल्या आदेशात चूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यात सुधारणा करून नव्याने आदेश काढण्यात आला. कॉपी पेस्टच्या घोळातून हा प्रकार घडला आहे. यामध्ये गैरप्रकार झाला असे म्हणता येणार नाही.

- डी.बी. राऊत, कुलसचिव, माफसू, नागपूर

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com