Agriculture News in Marathi Promotion of sandalwood cultivation; Agarbatti will boost the industry | Page 4 ||| Agrowon

चंदन लागवडीला प्रोत्साहन; अगरबत्ती उद्योगाला चालना देणार : वन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 21 ऑक्टोबर 2021

चंदन लागवडीला प्रोत्साहन देणे तसेच अगरबत्ती उद्योगाला चालना देण्यासाठी शासन सर्वतोपरी सहकार्य करेल. चंदन उद्योजकांनी केलेल्या मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेण्यात येतील, असे वन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले.

मुंबई : चंदन लागवडीला प्रोत्साहन देणे तसेच अगरबत्ती उद्योगाला चालना देण्यासाठी शासन सर्वतोपरी सहकार्य करेल. चंदन उद्योजकांनी केलेल्या मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेण्यात येतील, असे वन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले.

मंत्रालयातील दालनात राज्यातील चंदन उत्पादन वाढीसाठी उत्तेजन देण्याबाबत वन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी (ता.२०) बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीला अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक व मुख्य महाव्यवस्थापक (नियोजन) संजीव गौंड, प्रधान मुख्य वनसंरक्षक (उत्पादन व व्यवस्थापन) या बैठकीला उपस्थित होते.

भरणे म्हणाले, ‘‘राज्यात चंदनाची लागवड वाढून हा उद्योग वाढल्यास राज्याच्या महसूलात भर पडेल. चंदन उद्योगासाठी धोरणात्मक निर्णय घेऊन जे उद्योजक या क्षेत्रात काम करण्यासाठी तयार आहेत, त्यांना सहकार्य करण्यात येईल. शासनस्तरावरून देण्यात येणाऱ्या परवानग्या विहित वेळेमध्ये देण्याबाबत सर्व यंत्रणांना सूचना देण्यात येतील.

चंदन पावडर, तेल तसेच चंदन काड्या यांना मोठ्या प्रमाणात राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीयस्तरावर मागणी आहे, त्यामुळे चंदन लागवडीसाठी प्रोत्साहन देण्यासाठी शासन सर्वतोपरी मदत करेल. या उद्योगाला बळकटीकरणासाठी शासन नक्कीच प्रोत्साहन देईल. अगरबत्तीच्या व्यवसायात कशा प्रकारे चंदनाचा समावेश करता येईल, याचीही पाहणी वन विभागाने करावी. जेणेकरून अगरबत्ती व्यवसायाला देखील गती मिळेल, असेही राज्यमंत्री भरणे यांनी स्पष्ट केले.  

चंद्रपूरचे वनसंरक्षक किशोर मानकर यांनी अगरबत्ती व्यवसायाची सद्य:स्थितीची माहिती सांगितली. चंदन उद्योजक वदीराज मदभावी यांनी शासनाच्या सहकार्याबाबत सविस्तर सादरीकरण केले.


इतर बातम्या
अचलपूर तालुक्यातील तीन कृषी...अमरावती : खत वितरणात अनियमितता निदर्शनास आल्याने...
‘जवस आर्थिक सुबत्तेचा सक्षम पर्याय’ नागपूर ः बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊनच पिकांची...
इथेनॉलच्या दरात दुजाभाव नकोधान्यापासून इथेनॉल उत्पादित करणाऱ्यांनी सरकारकडे...
'AI' च्या मदतीने कापसाचे विक्रमी...तेलंगणात या खरीप हंगामात कापसाला  (Cotton)...
दक्षिण पूर्व आशियाई देशांकडून भारतीय...दक्षिण पूर्व आशियाई देश यामध्ये प्रामुख्याने...
महाराष्ट्रात ११ महिन्यांत २४९८...  जानेवारी ते नोव्हेंबर २०२१ या ११...
भात उत्पादक शेतकऱ्यांचा इतर पिकांकडे कल...गेल्या तीन दशकांहून अधिक काळापासून कृषी तज्ज्ञ...
खानदेशात उन्हाळी बाजरी पेरणी रखडतजळगाव : खानदेशात उन्हाळी बाजरीची पेरणी सुमारे तीन...
उसाच्या थकीत बिलासाठी तासगावात आंदोलनसांगली ः तासगाव आणि नागेवाडी कारखान्याच्या थकीत...
चिखलदऱ्याच्या कॉफीला राज्यभरातून मागणीचिखलदरा, जि. अमरावती : कॉफी संपूर्ण महाराष्ट्रात...
बुलडाण्यातील शेतकरी पिकवतोय...बुलडाणा ः स्ट्रॉबेरी म्हटली की थंड वातावरणात...
कोकण, मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यतापुणे : राज्यात उन्हाचा चटका वाढला असल्याने अनेक...
कृष्णा खोऱ्यातील उर्वरित पाणी वर्षभरात...पुणे : कृष्णा पाणीवाटप लवादाच्या पहिल्या...
सोयापेंड निर्यातीसाठी वाहतूक अनुदान...पुणे ः देशात यंदा सोयापेंडचे दर अधिक असल्याने...
कापूस मोजमापात पापवाशीम : शेतकऱ्यांना लुबाडणारी एक व्यवस्थाच तयार...
महावितरणने चालवलेली लूट थांबवा पुणे : महावितरणने शेतकऱ्यांकडे थकबाकी दाखवून...
आंबेगावच्या आदिवासी भागात मनरेगाची...पुणे : आंबेगाव तालुक्यातील आदिवासी भागातील एकूण...
नगर जिल्ह्यात कोरोना रुग्णवाढीचा वेग...नगर ः नगर जिल्ह्यात आठ दिवसांपासून कोरोना...
शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास...सिन्नर, जि. नाशिक : तालुक्याच्या पूर्व भागात...
लासलगावातून पहिल्यांदाच द्राक्षे...लासलगाव, ता. निफाड : जिल्ह्यातील द्राक्ष काढणी...