पीक नुकसानाची तातडीने भरपाई द्या

Promptly compensate for crop damage
Promptly compensate for crop damage

मंगरुळपीर, जि. वाशीम ः तालुक्यातील कासोळा सर्कलमध्ये गेल्या दोन दिवसांत झालेल्या वादळी वाऱ्यासह पूर्वमोसमी पावसाने, गारपिटीने  शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. शासनाने नुकसानीचे पंचनामे करून त्यांना त्वरित नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी मागणी जिल्हा परिषद सदस्या कांचन मोरे, पंचायत समितीचे उपसभापती हरिश महाकाळ, सदस्य श्रीकांत ठाकरे यांनी शुक्रवारी (ता. २०) येथील तहसीलदार यांना निवेदन दिले. या वेळी परिसरातील शेकडो शेतकऱ्यांची उपस्थिती होती.

निवेदनात म्हटले की, मंगरुळपीर तालुक्यातील कासोळा सर्कलमधील सायखेडा, मोतसवगा, मानोली, गोलवाडी, चिंचाळा, अरक, पिंप्री, रामगाव, इचोरी, फाळेगाव, सारसी, बिटोडा भोयर व कासोळा या गावात गेल्या दोन दिवसांत झालेल्या अवकाळी पाऊस व गारपीट झाली. त्यामुळे या गावातील शेतकऱ्यांच्या शेतांमधील उभ्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. 

मंगळवार (ता. १७) व बुधवारी (ता. १८) रात्री तालुक्यातील कासोळा सर्कलच्या सर्वच गावात वादळी वाऱ्यासह मोठ्या गारांचा पाऊस बरसला. विशेष म्हणजे गारांचा आकार संत्र्याएवढा होता. या गारपिटीमुळे काढणीला आलेल्या कांदा, हरभरा, गहू व फळबागांचे अतोनात नुकसान झाले असून शेतकरी पूर्णतः हतबल झाला आहे. या निवेदनावर कांचन मोरे, हरीश महाकाळ, श्रीकांत ठाकरे, शेतकरी दीपक ठाकरे, गणेश सूर्यवंशी, विजय ठाकरे, नीलेश ठाकरे, रामदास भोजने यांच्यासह नुकसानग्रस्त शेतकरी उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com