Agriculture news in marathi, Promptness of crop damage Punchnama should be done: Singh | Agrowon

पीक नुकसानीचे तातडीने पंचनामे करावेत :विभागीय आयुक्त पीयूष सिंह

टीम अॅग्रोवन
रविवार, 3 ऑक्टोबर 2021

वाशीम : अतिवृष्टीने सोयाबीन आणि तूर पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या पीक नुकसानीचे महसूल आणि कृषी विभागाने तातडीने पंचनामे करावेत, असे निर्देश विभागीय आयुक्त पीयूष सिंह यांनी दिले.

वाशीम : अतिवृष्टीने सोयाबीन आणि तूर पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या पीक नुकसानीचे महसूल आणि कृषी विभागाने तातडीने पंचनामे करावेत, असे निर्देश विभागीय आयुक्त पीयूष सिंह यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत सिंह बोलत होते. या वेळी जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस., जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील निकम, अपर जिल्हाधिकारी शहाजी पवार यांच्यासह विभाग प्रमुख उपस्थित होते.

सिंह म्हणाले, ‘‘जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात सोयाबीनचे उत्पादन घेतले जाते. अतिवृष्टीने शेतकऱ्यांच्या सोयाबीन पिकाचे जे नुकसान झाले आहे, त्या शेतातील पिकांचे अत्यंत काळजीपूर्वक पंचनामे करून नुकसानीचा अहवाल तयार करावा. संबंधित विमा कंपनीला याबाबत अवगत करावे. वाशीम हा आकांक्षित जिल्हा आहे. त्यामुळे स्वामित्व योजनेअंतर्गत ड्रोनद्वारे सर्व्हेक्षणाचे कामे त्वरित पूर्ण करावे.’’ 

आयुक्तांकडून पारडी, टकमोरमध्ये पाहणी

सिंह यांनी बैठकीपूर्वी वाशीम तालुक्यातील पारडी, टकमोर शिवारातील रामराव चौधरी यांच्या शेतीला भेट दिली. २८ व २९ सप्टेंबर रोजी झालेल्या अतिवृष्टीने चौधरी यांच्या सोयाबीन व तूर पिकाच्या नुकसानीची पाहणी केली. आपण पीकविमा काढला आहे. पीक नुकसानीची माहिती देण्यासाठी विमा कंपनीच्या प्रतिनिधीशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधला. मात्र प्रतिसाद दिला नाही, असे चौधरी म्हणाले. 


इतर बातम्या
किमान तापमानात घट होण्याची शक्यतापुणे : राज्यात पावसाने उघडिप दिल्यानंतर किमान...
‘महाडीबीटी’च्या कामात अडथळाअकोला ः कृषी खात्याच्या विविध योजनांचा लाभ...
कृषी निविष्ठा केंद्रांचे परवाने आता...पुणे ः राज्यातील कृषी सेवा केंद्रांना परवान्याची...
आयातीमुळे कडधान्य दर दबावातपुणे ः तुरीचा हंगाम पुढील काही दिवसांत सुरू होईल...
...तर द्राक्षाचे नुकसान टळले असतेनाशिक : गेल्या तीन वर्षांपासून कसमादे भागातील...
साहित्य संमेलनाचे अनुदान शेतकरी,...नाशिक : वामनदादा कर्डक जन्मशताब्दी साहित्यनगरी...
देशी वाणाने सकस उत्पादन ः राहीबाई पोपेरेसांगली : पारंपरिक बियाणाला रासायनिक खताच्या...
वीज पुरवठा सुरळीत न केल्यास  ढोरा...शेवगाव, जि. नगर : महावितरणने थकीत वीज बिलासाठी...
सहा हजार शेतकऱ्यांना नवीन पीककर्ज परभणी ः जिल्ह्यात यंदाच्या (२०२१-२२) रब्बी...
मॉन्सूनोत्तर पावसाचा सांगलीत  १२ हजार...सांगली : अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील द्राक्ष,...
शिवरायांच्या स्वराज्यापासून महात्मा...कोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या हिंदवी...
मराठवाड्यात आंब्यावर संकटाचे ढगऔरंगाबाद : यंदा आंब्यावर संकटाचे ढग कायम आहेत....
उचंगी प्रकल्पग्रस्तांचे शंभर टक्के...   कोल्हापूर : आजरा तालुक्यातील उचंगी...
श्रीरामपुरात बिबट्याचे चार तास...श्रीरामपूर, जि. नगर ः श्रीरामपूर शहरातील मोरगे...
शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत करू :...सांगली ः गेल्या काही दिवसापांसून संपूर्ण राज्यात...
क्षारपड जमीन सुधारण्यासाठी  केंद्राचे...कोल्हापूर : क्षारपड जमीन सुधारणा योजनेस केंद्र...
पावसामुळे द्राक्ष बागांचे  दोन हजार...पुणे ः जिल्‍ह्यात गेल्या आठवड्यात १ आणि २ डिसेंबर...
खानदेशात पुन्हा ढगाळ वातावरण कायम जळगाव ः  खानदेशात पावसाळी व ढगाळ वातावरण...
चाळीसगाव (जि.जळगाव) : अवकाळी पावसामुळे...चाळीसगाव, जि.जळगाव : चाळीसगाव, पाचोरा, भडगाव आदी...
जळगावः अॅग्रोवन व आयसीएल कंपनीतर्फे...जळगाव ः ॲग्रोवन आणि आयसीएल कंपनीच्या संयुक्त...