प्रॉपर्टी कार्डही लवकरच मिळणार ऑनलाइन : हेमंत सानप

सोलापूर : डिजिटल स्वाक्षरी असलेली मिळकत पत्रिका (प्रॉपर्टी कार्ड) आता लवकरच ऑनलाइन मिळू शकणार आहे. राज्याच्या वन आणि महसूल विभागामार्फत यासाठी E-PCIS ही संगणक प्रणाली विकसित करण्यात आहे.
 Property card to be available online soon: Hemant Sanap
Property card to be available online soon: Hemant Sanap

सोलापूर  : डिजिटल स्वाक्षरी असलेली मिळकत पत्रिका (प्रॉपर्टी कार्ड) आता लवकरच ऑनलाइन मिळू शकणार आहे. राज्याच्या वन आणि महसूल विभागामार्फत यासाठी E-PCIS ही संगणक प्रणाली विकसित करण्यात आहे. या संगणक प्रणालीवरुन नागरिक डिजिटल प्रॉपर्टी कार्ड मिळवू शकतात. महापालिकेच्या हद्दीत १३५ रुपये, नगरपालिकांच्या हद्दित ९०, तर ग्रामीण हद्दीत ४५ रुपयांचे शुल्क निश्‍चित करण्यात आले आहे. 

राज्य शासनाच्या महसूल आणि वन विभागाचे सहसचिव डॉ. संतोष भोगले यांनी शासन निर्णय जारी केला. याबाबत अधिक माहिती देताना भूमी अभिलेख अधीक्षक हेमंत सानप म्हणाले, ‘‘इज ऑफ डुईंग बिझनेस या धोरणानुसार नागरी भूमापनाच्या अधिकाराबाबत म्हणजेच मिळकत प्रत्रिकांबाबत ऑनलाइन ई-फेरफारची प्रणाली लागू केली जात आहे. मात्र संगणकीकृत मिळकत पत्रिकेसाठी नक्कल शुल्क ठरविण्यात आले नव्हते. ते शुल्क या शासन निर्णयाद्वारे निश्‍चित करण्यात आले आहे. त्याचबरोबर नक्कल शुल्काचा हिस्सा देखील निश्‍चित करण्यात आला आहे.’’

‘‘महाभूलेख संकेतस्थळावरून मिळकत पत्रिका डाउनलोड केल्यास महापालिका क्षेत्रासाठी १३५ रुपये, अ,ब,क वर्ग नगरपालिका आणि  नगरपंचायतीसाठी ९० रुपये, तर ग्रामीण क्षेत्रासाठी ४५ रुपये असेल. वरील शुल्काच्या दोन तृतीयांश हिस्सा राज्यशासनास, तर एक तृतीयांश हिस्सा जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमी अभिलेख यांच्या लेख्यात जमा होईल. महाभूलेख संकेतस्थळावरुन डिजिटल स्वाक्षरीने जुन्या अभिलेखाच्या नकला आणि डिजीटायईज्ड नकाशांच्या नकलांसाठीही शुल्क आकारण्यात येणार आहे,’’ असेही सानप यांनी सांगितले. 

सानप म्हणाले, ‘‘स्कॅनिंग करण्यात आलेल्या अभिलेखाच्या प्रतिफाईलसाठी तीस रुपये आकारले जातील. त्याचप्रमाणे डिजीटाईज्ड नकाशांच्या प्रतीफाईलसाठीही ३० रुपये आकारले जाणार आहेत. या शुल्काची विभागणीही दोन तृतीयांश राज्यशासन आणि एक तृतीयांश जमाबंदी आयुक्त आणि संचालक, भूमी अभिलेख यांच्या लेखात जमा होईल.’’

  जुन्या भूमी अभिलेखांचे स्कॅनिंग पूर्ण  

जिल्ह्यात मिळकत पत्रिकेचे संगणकीकरण करण्याचे काम सुरू आहे. याबाबतची डाटाएंट्री करण्याचे आणि भरलेला डाटा पडताळणी करण्याचे काम सुरू आहे. जिल्ह्यातील जुन्या भूमी अभिलेखांचे स्कॅनिंग करण्याचे काम पूर्ण झाले झाले आहे. सदरचे स्कॅनिंग केलेली कागदपत्रे स्टेट डाटा सेंटरवर अपलोड केली जात आहेत, ही दोन्ही कामे पूर्ण झाल्यानंतर मिळकत पत्रिका ऑनलाइन उपलब्ध होईल. तसेच जुने रेकॉर्डही उपलब्ध होईल. या कामासाठी आणखी तीन ते चार महिने लागू शकतात, असे सानप यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com