Agriculture News in Marathi Property card soon in Purandar: Union Secretary Sunil Kumar | Page 2 ||| Agrowon

पुरंदरमध्ये लवकरच प्रॉपर्टी कार्ड : केंद्रीय सचिव सुनील कुमार

टीम अॅग्रोवन
बुधवार, 22 सप्टेंबर 2021

स्वामित्व योजना महाराष्ट्राबरोबरच देशांमध्ये लागू करण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतला आहे. या योजनेमुळे आपल्या जागेत कोणतेही वाद राहणार नाहीत.

गराडे, जि. पुणे : स्वामित्व योजना महाराष्ट्राबरोबरच देशांमध्ये लागू करण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतला आहे. या योजनेमुळे आपल्या जागेत कोणतेही वाद राहणार नाहीत. प्रॉपर्टी कार्ड बनवताना सर्व तंत्रज्ञानाचा वापर केलेला आहे. या कामासाठी भूमी आभिलेखचे सर्व कर्मचारी काम करत आहेत. आता ऑनलाइन पद्धतीने प्रत्येक कार्डधारकांची चौकशी करून येणाऱ्या चार-पाच महिन्यांत प्रॉपर्टी कार्ड सर्वांना मिळतील, असे केंद्र सरकारचे पंचायत राज मंत्रालयाचे सचिव सुनील कुमार यांनी मंगळवारी (ता.२१) सांगितले. 

सुपेखुर्द (ता. पुरंदर) येथे उपअधीक्षक भूमी अभिलेख पुरंदर, पंचायत समिती पुरंदर यांच्या वतीने स्वामित्व योजना गावठाण जमाबंदी प्रकल्प या योजनेची चौकशी कामाचा प्रारंभ मंगळवारी (ता.२१) सुनील कुमार यांच्या हस्ते करण्यात आला.

या वेळी त्यांनी माहिती दिली. जमाबंदी आयुक्त एन. के. सुधांशू, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, नगर भूमापनचे उपसंचालक बाळासाहेब काळे, भूमी अभिलेखचे उपसंचालक किशोर तरवेज, सर्वे ऑफ इंडियाचे एस. त्रिपाठी, तांत्रिक संचालक समीर दातार, जिल्हा आधीक्षक भूमी आभिलेख सूर्यकांत मोरे, उपजिल्हाधिकारी संजय तेली, उपविभागीय आधिकारी प्रमोद गायकवाड, तहसीलदार रूपाली सरनोबत, गटविकास अधिकारी अमर माने, सुहास कांबळे, ग्रामसेवक रोहित अभंग, ताई गायकवाड आदी उपस्थित होते. 

सुपे ठरणार देशातील पहिले गाव 
महाराष्ट्रात एक वर्षापासून ड्रोनद्वारे सर्वेक्षण सुरू आहे. पहिल्यांदा चौकशीची कारवाई होऊन त्यानंतर नकाशा बनवणार आहे. ऑनलाइन पद्धतीने नकाशा यादी दुरुस्तीच्या कामकाजाचा प्रारंभ करणारे देशातील पाहिले गाव सुपे खुर्द ठरणार आहे. आधी कुठेही ऑनलाइन पद्धतीने नकाशाची दुरुस्ती झालेले नाही, असे जमाबंदी आयुक्त एन. के. सुधांशू यांनी सांगितले. ड्रोनद्वारे झालेल्या सर्वेक्षणानंतर त्याचा वापर करून ऑनलाइन पद्धतीने चौकशी, नकाशा, उतारा, चौकशीची नोंद ही कामे होणार आहे.

या नंतर प्रॉपर्टी कार्ड व सनद दिली जाणार आहेत. पॉपर्टी कार्ड ऑनलाइन मिळणार आहेत. सनद ही ऑफलाइन मिळणार आहे. ही कामे उपअधीक्षक भूमी अभिलेख विभागाच्या वतीने राबवण्यात येत आहेत. असे प्रास्ताविकात भूमिअभिलेख विभागाचे उपअधिक्षक विकास गोफणे यांनी सांगितले. 


इतर बातम्या
विपरीत परिस्थितीत तग धरणाऱ्या...नागपूर ः दुष्काळी भागात नाचणी पीक तग धरू शकते....
जतमध्ये यंदा मुबलक पाणीसाठा सांगली : जत तालुक्यात २७ प्रकल्प असून, २५३७.८२...
बटाटा वाणाचे भाव तेजीत मंचर, जि. पुणे : बाजार समितीच्या आवारात मराठवाडा...
दिवाळीनंतरच कृषी महाविद्यालये गजबजणारपुणे ः राज्यात कोविडमुळे बंद पडलेले कृषी...
यूपी सरकारची भूमिका वेळकाढूपणाचीनवी दिल्ली ः उत्तरप्रदेशातील लखीमपूर खिरी येथील...
नांदेड जिल्ह्यात रब्बीत साडेतीन लाख...नांदेड : जिल्ह्यात आगामी रब्बी हंगामात पेरणी...
एफआरपीपेक्षा  जादा दर मिळणार?कोल्हापूर : प्रति वर्षीप्रमाणे यंदाही स्वाभिमानी...
नांदेड जिल्ह्यातील वीस हजार शेतकरी...नांदेड : महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती...
जिरायत, बागायत जमीन विक्रीवरील निर्बंध ...नाशिक : ‘‘शासनाच्या नव्या धोरणानुसार जमीन...
चंदन लागवडीला प्रोत्साहन; अगरबत्ती...मुंबई : चंदन लागवडीला प्रोत्साहन देणे तसेच...
धुळे : अमरिश पटेल यांचा बिनविरोधसाठी... धुळे : बहुचर्चित धुळे-नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती...
परभणी जिल्ह्यात कापसाला किमान सात हजार...परभणी ः जिल्ह्यात यंदाच्या हंगामातील खासगी कापूस...
खानदेशात रब्बीची पेरणी २०० टक्के होणे...जळगाव ः खानदेशात रब्बी पेरणीची तयारी सुरू झाली...
‘महावितरण’ची थकबाकी वसुली अत्यावश्यक :...नाशिक : ‘‘वीजनिर्मिती कंपन्यांकडून वीज विकत घेऊन...
परराज्यांतील भात रोखा : मंत्री छगन भुजबळ गडचिरोली :  परराज्यांतील भात (धान) चोरट्या...
शिरपूर तालुक्यात आठ बंधाऱ्यांच्या...शिरपूर, जि. धुळे : तालुक्यातील बोरगाव, जातोडा आणि...
पावसाची उघडीप राहणारपुणे : बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या...
हरभरा बियाणे वितरणासाठी कृषी विभागाची...पुणे ः राज्यातील रब्बी हंगामात हरभऱ्याचे क्षेत्र...
इथेनॉलनिर्मिती १५० कोटी लिटरच्या पुढे...पुणे ः राज्याची एकूण इथेनॉलनिर्मिती क्षमता येत्या...
‘सिबिल’वर ठरतेय कर्जदाराची पतसोलापूर : रिझर्व्ह बॅंकेच्या निकषांनुसार आता...