agriculture news in Marathi, proposal of 60 rupees cutting in BT cotton seed bag, Maharashtra | Agrowon

बीटी कापूस बियाणे दरात ६० रुपये कपातीचा प्रस्ताव

विनोद इंगोले
गुरुवार, 8 मार्च 2018

नागपूर ः कपाशीच्या बीटी बियाणे पाकिटांच्या किमतीत ६० रुपयांनी कपात करून दर ८०० रुपयांवरून ७४० रुपये करण्याचा प्रस्ताव बीटी बियाणे दर नियंत्रण समितीने केंद्रीय कृषी मंत्रालयाकडे पाठविला आहे. कृषी मंत्रालय त्यावर बुधवारी (ता.७) निर्णय घेणे अपेक्षित असताना उशिरापर्यंत त्यावर निर्णय झाला नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.

नागपूर ः कपाशीच्या बीटी बियाणे पाकिटांच्या किमतीत ६० रुपयांनी कपात करून दर ८०० रुपयांवरून ७४० रुपये करण्याचा प्रस्ताव बीटी बियाणे दर नियंत्रण समितीने केंद्रीय कृषी मंत्रालयाकडे पाठविला आहे. कृषी मंत्रालय त्यावर बुधवारी (ता.७) निर्णय घेणे अपेक्षित असताना उशिरापर्यंत त्यावर निर्णय झाला नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.

देशाच्या विविध भागासह महाराष्ट्रात यावर्षी बिजी-२ तंत्रज्ञानाचा अंतर्भाव असलेल्या कापशीवर गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव झाला. त्यामुळे बीजी-२ तंत्रज्ञानासाठी मोन्सॅन्टोला दिली जाणारी ४९ रुपयांची रॉयल्टी रद्द करावी, अशी मागणी नॅशनल सीड असोसिएशनने केली आहे. 

रॉयल्टी कमी करण्याची मागणी करणाऱ्या सीड असोसिएशनने त्याच वेळी बियाणे दरात १५० रुपयांच्या दर वाढीच्या मागणीचा प्रस्ताव रेटला आहे. बियाणे दर नियंत्रण समितीचे कृषी उपसंचालक अश्‍वनी कुमार यांच्यासमोर या संदर्भाने गेल्या आठवड्यात सुनावणी झाली. त्याआधारे समितीने आपला अहवाल तयार करीत तो केंद्र सरकारच्या कृषी मंत्रालयाला पाठविला आहे. या प्रस्तावात बीजी-२ कापूस बियाणे प्रतिपाकिटाचे दर ७४० रुपये करण्याची शिफारस केली आहे.

केंद्र सरकारदेखील बीटी बियाणे दर कमी करण्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिलासा देण्याच्या विचारात आहे. यामाध्यमातून सरकारप्रती शेतकऱ्यांमध्ये असलेला असंतोष कमी करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. 

शेतकऱ्यांना दिलासा
बीटी बियाणे दर कमी करण्याच्या प्रस्तावात १० रुपये मोन्सॅन्टोची रॉयल्टी कमी करून ती ३९ रुपये केली जाणार आहे. कंपन्यांना याच वेळी ५० रुपये प्रतिपाकिट कमी करण्याची शिफारस केली आहे. देशात वर्षाला ५०० दशलक्ष पाकिटांची विक्री होते. ६० रुपये प्रतिपाकिट दर कमी केल्यास शेतकऱ्यांचे कंपन्यांना जाणारे सुमारे ३०० कोटी रुपये वाचणार आहेत. कंपन्यांनी याला विरोध करण्याची तयारी चालविली आहे. ९४० रुपयांवरून ८०० आणि आता थेट ७४० रुपये दर होणार. मजुरी व कच्च्या मालाच्या दरात वाढ होत असताना बियाणे दरात कपात करण्याचे धोरण अन्यायकारक असल्याचे कंपन्यांचे म्हणणे आहे. दर कमी गुणवत्ता राखण्याचे आव्हान आमच्यासमोर राहील, असेही कंपन्यांचे म्हणणे आहे.


इतर अॅग्रो विशेष
शेतकरी सक्षमीकरण हेच असावे धोरण यावर्षी पावसाळा वेळेवर सुरू झाला. बेताबेताने...
अवजारे, अनुदान अन् अनागोंदीअवजारे अनुदानाच्या योजना आणि त्यातील अनागोंदींचे...
कोकण, मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी...पुणे ः मध्य महाराष्ट्रातील नगर, पुणे, सातारा,...
निम्म्या महाराष्ट्रातून मॉन्सूनची माघार पुणे : परतीच्या मॉन्सूनने गेल्या आठवड्यापासून...
‘जाॅइंट अॅग्रेस्को’ आजपासून अकोला ः डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ व...
निकृष्ट सोयाबीन बियाणे प्रकरणी ...अकोला ः खरीप हंगामात सोयाबीन बियाणे उगवले...
कांदा दरात एक हजारापर्यंत घसरण, शेतकरी...नाशिक: कांद्याच्या वाढत्या दरावर नियंत्रण...
पावसाने सोयाबीनचे आगार उद्ध्वस्त वाशीमः वेळ दुपारची...काही भागात ऊन होते...काही...
प्रदूषणावर तोडग्यासाठी लवकरच कायदा :...नवी दिल्ली : शेतातील काडीकचरा जाळण्याचे प्रकार...
राज्यात १०८ कोटी लिटर इथेनॉल निर्मितीचे...पुणे: राज्यात यंदा जास्त ऊस उत्पादनाची शक्यता...
शरद पवार यांच्या उपस्थितीत ऊसतोडणी...नगर ः ऊसतोडणी मजुरांच्या प्रश्‍नावर तोडगा...
बारकाईने जाणून घ्या शेतकरी अपघात विमा...राज्य शासनाकडून सुरू करण्यात आलेली गोपीनाथ मुंडे...
पिंपळगावला आडत्याकडून शेतकऱ्याला मारहाण नाशिक: निफाड तालुक्यातील कारसूळ येथील शेतकरी...
अवजारे अनुदानाचे निकष वाढवलेपुणे : राज्यात कृषी अवजारे अनुदानासाठी...
तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता पुणे ः कोकण व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी हलका...
बदल्या, मारहाण, लाचखोरीने गाजतेय राहुरी...पुणे: महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या आवारात...
मॉन्सूनच्या माघारीस पोषक वातावरण पुणे : मॉन्सून दोन दिवसांत उत्तर महाराष्ट्र व...
काही ठिकाणी जोरदार सरीपुणे ः राज्यातील काही भागांत पावसाचा जोर कमी झाला...
व्यापाऱ्यांवरील कांदा साठा...पुणे/नाशिक: पुरवठा कमी असल्याने देशभरात कांद्याची...
पावसानं पांढऱ्या सोन्याची झाली माती !औरंगाबाद: यंदा पाऊस चांगला सांगितल्याने शेतीच्या...