agriculture news in Marathi proposal of ban on 27 pesticides in last stage Maharashtra | Agrowon

सत्तावीस कीडनाशकांच्या बंदीविषयी अहवाल अंतिम टप्प्यात 

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 3 ऑगस्ट 2021

केंद्रीय कृषी मंत्रालयाने मागील वर्षी म्हणजे मे २०२० मध्ये भारतात नोंदणीकृत वा वापरातील २७ कीडनाशकांवरबंदी घालण्यासंबंधी मसुदा आदेश प्रसिद्ध केला.

पुणे ः केंद्रीय कृषी मंत्रालयाने मागील वर्षी म्हणजे मे २०२० मध्ये भारतात नोंदणीकृत वा वापरातील २७ कीडनाशकांवरबंदी घालण्यासंबंधी मसुदा आदेश प्रसिद्ध केला. त्याविषयी सार्वजनिक मतेही अजमावली. त्या अनुषंगाने मूल्यपरिक्षणासाठी स्थापन केलेली समिती येत्या सप्टेंबरपर्यंत आपला अहवाल केंद्राला सादर करण्याची शक्यता आहे. त्यानंतर या कीडनाशकांचे खरे भवितव्य ठरणार आहे. 

मागील वर्षी १८ मे रोजी केंद्र सरकारने एका गॅझेटद्वारे २७ कीडनाशकांवर बंदी घालण्याच्या अनुषंगाने मसुदा आदेश प्रसिद्ध केला. त्यात १२ कीटकनाशके, ७ तणनाशके व ८ बुरशीनाशकांचा समावेश होता. मानवी आरोग्यासह पर्यावरण, जलचर, पक्षी, मधमाशी अशा सजीवांना पोचणारा धोका, संबंधित कीडनाशकांप्रति विकसित झालेली प्रतिकारक्षमता, अवशेष समस्या आदी कारणांचा अभ्यास यामागे करण्यात आला. त्याचबरोबर परदेशात बंदी असलेली कारणे व ‘सीआयबीआरसी’ अंतर्गत तज्ज्ञ समितीच्या यापूर्वी केलेल्या फेरमूल्यांकन निष्कर्षांचाही आधार मानण्यात आला. 

सरकारच्या या निर्णयावर हरकती किंवा सूचना नोंदवण्यासाठी सुरूवातीला ४५ दिवसांचा कालावधी देण्यात आला. मात्र पुढे तो ९० दिवसांपर्यंत वाढवण्यात आला. या बंदीच्या निर्णयाबाबत उलट सुलट प्रतिक्रिया कीडनाशक वर्तुळातून उमटल्या. पर्यावरणवाद्यांकडून जसे स्वागत झाले तसे कृषीरसायन उद्योग, पीक वा बागायतदार संघांकडून निर्णयाला विरोधही झाला. 

सप्टेंबरपर्यंत अहवालाची शक्यता 
दरम्यान केंद्र सरकारने याबाबत मूल्यपरिक्षण करून त्याबाबत अहवाल देण्यासाठी ‘सीआयबीआरसी’ चे माजी सदस्य व भारतीय कृषी संशोधन परिषदेचे माजी साहायक संचालक डॉ. टी. पी. राजेंद्रन यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना केली. त्याबाबत ॲग्रोवनशी बोलताना डॉ. राजेंद्रन म्हणाले की केंद्र सरकारने कीडनाशकांच्या बंदीविषयी ज्या सूचना मागवल्या त्यास सुमारे १७०० ते १८०० संख्येपर्यंत प्रतिसाद मिळाला आहे. आमची समिती या अनुषंगाने मूल्यपरिक्षण करीत आहे. कोव्हीडच्या संकटामुळे त्यात काही अडचणी उद्भवल्या. मात्र त्यासंबंधीचा अहवाल आता जवळपास अंतिम टप्प्यापर्यंत येऊन पोचला आहे. येत्या सप्टेंबरमध्ये तो केंद्र सरकारला सादर होण्याची शक्यता आहे. कीडनाशकांवर बंदी घालण्याचा निर्णय सर्वस्वी केंद्र सरकारचा आहे. अहवाल अभ्यासूनच सरकार पुढील दिशा ठरवेल असेही डॉ. राजेंद्रन यांनी सांगितले. 

बंदी घालण्याबाबत प्रमुख मुद्दे 

  • मानवी आरोग्यासह सस्तन प्राणी, जलचर, पक्षी, गांडूळे, पक्षी, अन्य सजीव वा पर्यावरणाला धोका. 
  • कीडनाशक सर्वाधिक विषारी असणे. त्याच्या जैविक क्षमतेबाबत पुरेसे वैज्ञानिक तपशील, अभ्यास व निष्कर्ष अपूर्ण असणे. 
  • कीडनाशक लेबलवरील काही पिकांमध्ये काढणी प्रतीक्षा कालावधी (पीएचआय) उपलब्ध नसणे. 

इतर अॅग्रो विशेष
शेतीसह पर्यावरणाचे संवर्धनमान्हेरे (ता. अकोले, जि. नगर) येथील तुकाराम भोरू...
‘गोकुळ’तर्फे दुभत्या जनावरांना लाखाचा...कोल्हापूर : दुभत्या जनावरांचा कोणत्याही आजाराने...
पितृपक्षामुळे सुकामेव्याला मागणी वाढलीपुणे : पितृपक्षाला प्रारंभ झाल्यानंतर काही...
साखर दरवाढीची गोडी कायमकोल्हापूर : गेल्या महिन्यापासून साखर दरात आलेल्या...
भाजीपाला निर्जलीकरण, मसालानिर्मितीलातूर जिल्ह्यातील वासनगाव येथील ‘सावित्रीबाई फुले...
राज्यात विजा, मेघगर्जनेसह पावसाचा इशारापुणे : राज्यात पावसाचा जोर काहीसा ओसरला असला तरी...
प्रमाणपत्र, शाल, श्रीफळ मिळाले,...औरंगाबाद : गतवर्षीच्या रब्बी हंगामात आयोजित...
४१ व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे आज...औरंगाबाद : ४१ व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे...
पीककर्जाचे ‘वरातीमागून घोडे’पुणे ः शेतकऱ्यांना खरिपासाठी दिल्या जाणाऱ्या पीक...
शेतकरी पुत्रांचा #सोयाबीन ट्रेंडनांदेड : सोयाबीनचे दर ११ हजारांवरून पाच हजार...
कोकणात पावसाचा जोर कायमपुणे : राज्यात गेले काही दिवस पावसाने हजेरी लावली...
एकोप्यातून पानोलीकरांचा ग्रामविकासात...गावकऱ्यांचा एकोपा, लोकसहभाग, श्रमदान आणि गावांतील...
विदर्भ, कोकणात पावसाचा अंदाजपुणे : राज्यात पावसाने दमदार हजेरी लावल्यानंतर...
पाऊस सुरूच; ओल्या दुष्काळाचे सावटपरभणी ः राज्यात आठ दिवसांपासून पावसाचे पुनरागमन...
सेंद्रिय शेतीतून काळ्या आईचे आरोग्य जपा...नाशिक : रासायनिक शेतीचे परिणाम दिसत असल्याने...
मराठवाड्यात शेतीपिकांची पुन्हा दैनाऔरंगाबाद : मराठवाड्यात पुन्हा एकदा मंगळवारपासून (...
बेदाण्याला उठाव असल्याने दर स्थिरसांगली ः सणांमुळे बेदाण्याला चांगली मागणी आहे....
कापूस खरेदी नोव्हेंबरच्या पहिल्या...मुंबई : राज्यातील हंगाम २०२१-२२मधील शासकीय कापूस...
खरिपात तेलबिया उत्पादनात घट होणारपुणे : खरीप हंगाम २०२१-२२ मध्ये तेलबिया...
मराठवाड्यात पाऊस उठला पिकांच्या मुळावरऔरंगाबाद : आधी पावसाचा लहरीपणा आणि आता अतिपावसाने...