कापसाचा नवीन हंगाम (२०१९-२०) सुरू होऊन जवळपास दोन महिने संपायच्या बेतात आहेत, परंतु आज सु
अॅग्रो विशेष
ड्रोनद्वारे फवारणीचा प्रकल्प बारगळलेलाच!
देशातील एकाही विद्यापीठाने ड्रोनव्दारे फवारणीसंदर्भाने ठोस निष्कर्ष मांडलेले नाहीत. सुरवातीला ड्रोनची चर्चा झाल्याने नवे काही तरी करीत असल्याच्या अविर्भावात अनेक विद्यापीठांमध्ये चाचण्यांसाठी स्पर्धा लागली होती. त्यानंतर एकाही विद्यापीठाने कोणताच ठोस निष्कर्ष मांडला नाही. हवेत मिसळणारे रसायन, त्यामुळे होणारे दुष्परिणाम विचारात घ्यावे लागणार आहेत.
- नरसिंहा रेड्डी, पेस्टीसाईड ॲक्शन नेटवर्क फॉर इंडिया, हैदराबाद.
नागपूर ः फवारणी दरम्यान होणाऱ्या विषबाधेचे दुष्परिणाम टाळण्यासाठी `एरीयल’ फवारणीचा पर्याय चर्चेत आला होता. परंतु, पर्यावरण आणि मानवी आरोग्यावर याचे परिणाम अद्यापही अभ्यासले गेले नसल्याने त्याच मुद्यावरून निर्माण झालेल्या मतभेदामुळे हा प्रकल्प मागे पडल्याचे वृत्त आहे. विशेष म्हणजे यापूर्वी अकोला कृषी विद्यापीठासह औरंगाबाद परिसरातही ड्रोनने फवारणीचे प्रात्यक्षिक करण्यात आले होते.
यवतमाळ जिल्ह्यात दोन वर्षांपूर्वी फवारणी दरम्यान शेतकरी, शेतमजुरांना विषबाधा झाली होती. हजारावर शेतकरी, शेतमजुरांवर उपचार करण्यात आले. पंधरापेक्षा अधिक जणांचा यात बळी गेला होता. राज्यात देखील त्याच काळात फवारणी दरम्यान विषबाधेचे प्रकार समोर आले. यवतमाळसह राज्यातील एकूण बळींची संख्या बावीसवर पोचली होती. यावर नियंत्रणासाठी सरसावलेल्या सरकारकडून अनेक पर्यायांवर विचार झाला.
त्यामध्ये ड्रोनव्दारे फवारणीच्या पर्यायाचाही समावेश होता. खुद्द भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या पुढाकाराने देशभरातील कृषी सहसंचालकांकरिता त्याच दरम्यान ड्रोन फवारणीविषयक प्रशिक्षणाचे आयोजनही करण्यात आले. फवारणीसाठी कृषी सहसंचालकस्तरावर ड्रोन खरेदीचे निर्देश देण्यात आले. परंतु, अज्ञात कारणांमुळे पुढे हा प्रकल्प बारगळला.
हैदराबाद येथील एका खासगी कंपनीच्या सल्ल्यावरून अकोल्यातील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या प्रक्षेत्रावर चाचणीदेखील झाली. परंतु, त्याचे निष्कर्ष पुढे आलेच नाही. औरंगाबाद येथे देखील चाचणी झाली. परंतु, अद्याप राज्यातील एकाही विद्यापीठाकडून या संदर्भाने ठोस निष्कर्ष मांडण्यात आले नसल्याने मतभेद कायम आहेत. परिणामी, ड्रोनने फवारणीचा प्रकल्प गेल्या दोन वर्षांत मार्गी लागलाच नसल्याची स्थिती आहे.
प्रतिक्रिया
ड्रोन फवारणी संदर्भाने अद्याप चाचण्या आणि त्याचे निष्कर्ष समोर आले नाही. मानवी आरोग्य आणि पर्यावरणावर त्याचे होणारे दुष्परिणामही अभ्यासले गेले नाही. ड्रोनने फवारणी दरम्यान हवेत रसायन मिसळणार आहे. त्यामुळे अशाप्रकारच्या फवारणीतून किती परिणामकारकता साधली जाईल याबाबत देखील अनिश्चितता आहे. साधारणतः ३५ ते ४० टक्के रसायन हवेत उडून जाईल. या साऱ्या बाबींचा विचार करता सध्या तरी ड्रोनने पिकावर फवारणीचा कोणताच प्रस्ताव नाही.
- सुहास दिवसे, आयुक्त, कृषी
- 1 of 434
- ››