छावणीऐवजी चारा डेपोसाठी प्रस्ताव

छावणीऐवजी चारा डेपोसाठी प्रस्ताव
छावणीऐवजी चारा डेपोसाठी प्रस्ताव

नाशिक : जिल्ह्यात विविध तालुक्यामध्ये दुष्काळाने गंभीर रूप धारण केले आहे. पाणीप्रश्न बिकट झाला आहे. दुष्काळी तालुक्यांमध्ये जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर आहे. अशा परिस्थितीत चारा छावण्या सुरू करण्याचे शासनाचे आदेश असले, तरी छावण्या चालविण्यासाठी कोणी पुढे येत नसल्याची स्थिती आहे. त्यामुळे हतबल झालेल्या प्रशासनाने आता छावण्यांऐवजी चारा डेपो सुरू करण्यास मान्यता द्यावी, असा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्याची तयारी केली आहे.

जिल्ह्यातील नांदगाव, मालेगाव, सिन्नर, येवला, बागलाण आदी भागांत दुष्काळी परिस्थिती आहे. चाऱ्याअभावी पशुपालक मेटाकुटीला आले आहेत. दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्री गिरीश महाजन यांनी नुकताच जिल्ह्याचा दुष्काळी दौरा केला. शेतकऱ्यांनी जनावरांचा चारा व पाण्याचा प्रश्न त्यांच्यासमोर मांडला.

शेतकऱ्यांनी जनावरांची विक्री करण्यास सुरवात केली आहे. अशा परिस्थितीत जिल्ह्यात चारा छावण्या सुरू करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने या पूर्वी दोन वेळा निविदा मागविल्या; परंतु त्याला प्रतिसाद मिळाला नाही. दोन संस्थांनी तशी तयारी दर्शविली असली, तरी अन्य तालुक्यात चारा छावण्या सुरू करण्यासाठी प्रतिसाद मिळत नसल्याने प्रशासन अडचणीत आले आहे.

चारा डेपो सुरू करण्यात अडचणी

गेल्या काही वर्षांपूर्वी चारा छावण्यांऐवजी चारा डेपो शासनाने सुरू केले होते. परंतु यात मोठ्या प्रमाणात गैरप्रकार व आर्थिक गैरव्यवहार झाल्याच्या तक्रारी आल्या. गुन्हेही दाखल झाले. ते टाळण्यासाठी शासनाने यंदा फक्त चारा छावणीच सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे चारा डेपो सुरू करण्यात कायदेशीर अडचणी आहेत. परिणामी चारा डेपोसाठी जिल्ह्याला अनुमती मिळावी, असा प्रस्ताव देण्याची तयारी जिल्हा प्रशासनाने केली.    

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com