कॅन्सर, मधुमेहींसाठी मोफत औषधांचा प्रस्ताव : अर्थमंत्री मुनगंटीवार

विधीमंडळ अधिवेशन
विधीमंडळ अधिवेशन

नागपूर  ः दुर्धर आजारांवरील रुग्णांसाठी मोफत औषधे उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन असल्याची माहिती अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. कॅन्सर, तसेच मधुमेहावरील औषधांचा त्यामध्ये मुख्यत्वे समावेश असल्याचे त्यांनी गुरुवारी (ता.१२) विधान परिषदेत एका प्रश्‍नाच्या उत्तरात सांगितले.

जीएसटी बारा टक्‍क्‍यांऐवजी पाच टक्‍क्‍यांच्या स्लॅबमध्ये आणल्यानंतर देशभरात औषधांच्या किमती काही अंशी कमी होतील. याकरिता सरकार प्रयत्न करणार का, त्यासोबतच कॅन्सर, तसेच मधुमेहावरील औषध कमी दरात उपलब्ध होतील का, असा प्रश्‍न विधान परिषदेत उपस्थित करण्यात आला होता. त्यावर अर्थमंत्र्यांनी देशातील ३१ राज्य जीएसटी कौन्सिलचे सदस्य असल्याचे सांगितले.

या सर्व राज्यांचा देखील दुर्धर आजारांवरील औषधे कमी दरात मिळावीत यासाठी आग्रह आहे. महाराष्ट्र सरकारदेखील मोफत किंवा कमी दरात या आजारांसाठी औषधे उपलब्ध होतील, यासाठी प्रयत्न आहे. गरीब कुटुंबांना मोफत औषधे पुरविण्याचा विचार असून, केंद्र व राज्याचा हिस्सा त्याकरिता वापरला जाईल.

डिग्रीवर आपला फोटो लावून प्रॅक्‍टिस केली जात असल्याची बाब चौकशीत समोर आली होती. अशा २० डॉक्‍टरांवर कारवाई करण्यात आली. त्यानंतर ५३ नवी प्रकरणे समोर आली आहेत. त्यांच्यावर कारवाई प्रस्तावित असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी दिली.

दरम्यान, विधान परिषदेचे कामकाज सुरळीत सुरू असतानच विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, सुनील तटकरे यांच्यासह अन्य सदस्यांनी नाणार प्रकल्पावर चर्चेची मागणी केली. ती सभापतींनी नाकारल्याने विरोधकांनी गोंधळ घातला. त्यामुळे दिवसभरासाठी कामकाज तहकूब करण्यात आले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com