agriculture news in Marathi, proposal for loan waive of water irrigation scheme, Maharashtra | Agrowon

उपसा सिंचन योजनेवरील कर्जमाफीचा प्रस्ताव विचाराधीन
टीम अॅग्रोवन
बुधवार, 31 जुलै 2019

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत कर्जमाफीसाठी शेतीच्या उपसा सिंचन योजनांवरील थकीत कर्ज माफ करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन आहे. यासाठी लागणारा आर्थिक खर्च आणि शेतकऱ्यांची संख्या याचा अहवाल विभागाने सादर करावा, अशा सूचना सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी कर्जमाफीसंदर्भातील मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत दिल्या.

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत कर्जमाफीसाठी शेतीच्या उपसा सिंचन योजनांवरील थकीत कर्ज माफ करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन आहे. यासाठी लागणारा आर्थिक खर्च आणि शेतकऱ्यांची संख्या याचा अहवाल विभागाने सादर करावा, अशा सूचना सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी कर्जमाफीसंदर्भातील मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत दिल्या.

शेतकरी कर्जमाफीबाबत आढावा घेण्यासाठी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या दालनात झालेल्या बैठकीस महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, परिवहनमंत्री दिवाकर रावते यांच्यासह सहकार विभागाच्या प्रधान सचिव आभा शुक्ला, वित्त विभागाचे प्रधान सचिव राजीव कुमार मित्तल आदी उपस्थित होते.

शेतीसाठीच्या उपसा सिंचन योजनांचे कर्ज थकल्याने अशा शेतकऱ्यांना दिलासा देण्याची गरज असल्याचे सहकारमंत्री श्री. देशमुख यांनी बैठकीत सांगितले. त्या अनुषंगाने हा निर्णय घेणे आवश्यक आहे. तसेच, काही जिल्ह्यात शेतकऱ्यांना सहकारी संस्थांच्या धर्तीवर शेतीसाठी पतपुरवठा करणाऱ्या जुन्या पैसा बँका या वित्तपुरवठा संस्था आहेत. त्या सहकारी संस्थासारख्याच काम करीत असूनही नावात बँकेच्या उल्लेखामुळे कर्जमाफी योजनेत या संस्थातून कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळालेला नाही. त्या शेतकऱ्यांनाही कर्जमाफीचा लाभ देण्याबाबत विचारविनिमय या वेळी करण्यात आला. 

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत कर्जमाफी योजनेचा  लाभ दिलेल्या शेतकऱ्यांची यादी तालुकास्तरावर सहकारी संस्था सहायक निबंधकांच्या कार्यालयात उपलब्ध करून देण्यात येणार आहे. अर्ज केलेल्या मात्र  लाभ न मिळालेल्या शेतकऱ्यांच्या सर्व शंकांचे निरसन तालुकास्तरीय समितीने करावे, असे निर्देश सहकारमंत्री श्री. देशमुख यांनी दिले.

कर्जमाफी योजनेंतर्गत जून सन २०१५ -२०१६ मध्ये नियमित कर्ज भरलेल्या मात्र त्यानंतर सन २०१६-२०१७ मध्ये कर्जफेड न केलेल्या शेतकऱ्यांनाही नियमित कर्जफेडीच्या अनुषंगाने प्रोत्साहनपर रक्कम देण्याचा विचार करण्यात यावा, अशी चर्चा बैठकीत करण्यात आली.

इतर अॅग्रो विशेष
महाबळेश्वरात स्ट्रॉबेरी लागवडीस वेगसातारा  ः जिल्ह्यातील महाबळेश्वर, जावळी, वाई...
संत्र्याच्या आंबिया बहराला गळती; भाव...अकोला : संत्र्याच्या आंबिया बहाराला गळती...
तुरळक ठिकाणी पावसाची शक्यतापुणे ः परतीचा मॉन्सून देशातून परतल्यानंतर...
दुधाचे थकीत अनुदान देण्याच्या हालचालीपुणे: राज्यातील डेअरी उद्योगांचे अडकलेले...
अमरावती विभागात सोयाबीन उत्पादकता घटलीअमरावती  ः गेल्या काही वर्षांत कापसाला...
‘महाॲग्री ते महाॲग्रीटेक’ एक स्वप्नरंजन राज्यात शेतकऱ्यांची सर्व कामे ऑनलाईन होतील असे एक...
शेण पावडरपासून कलात्मक वस्तूंची...सुमारे ३८ देशी गायींचे संगोपन करीत नागपूर येथील...
शेततळ्यातील पाण्यावर फुलले शेडनेटमधील...पावसाचे कायम दुर्भिक्ष, त्यामुळे शेती अर्थकारणाला...
राज्यात गाजर ११०० ते ८००० रुपये...जळगावात ११०० ते १८०० रुपये दर जळगाव कृषी...
ऋतुचक्र बदलया वर्षीचा मॉन्सून अनेक बाबींनी वैशिष्ट्यपूर्ण...
प्रतिष्ठेचं वलय होतंय द्राक्ष...द्राक्ष शेतीने राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय...
उडीद, मूग, सोयाबीन ऑनलाइन नोंदणीला...औरंगाबाद: हमीदराने उडीद, मूग, सोयाबीन...
सांगली जिल्ह्यात डाळिंबावर रसशोषक...सांगली : मृग हंगाम धरलेल्या बहाराच्या डाळिंबाच्या...
कडधान्य आयातीला मुदतवाढीचा प्रस्तावनवी दिल्लीः देशात यंदा खरिप काडधान्य पिकांची...
राज्यात हलक्या पावसाचा अंदाजपुणे: वाढलेल्या उन्हामुळे राज्यात चटका वाढला आहे...
परतीचा मॉन्सून आठ दिवसात माघारीपुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून)...
आदर्श वनसंवर्धनातून ग्रामविकास साधलेले...वनसंपत्तीचे संवर्धन, वनविकासासह शेतीतही दिशादर्शक...
येतो मी... मॉन्सूनने घेतला देशाचा निरोप...पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) बुधवारी...
शेतकऱ्यांच्याच कपाळावर पुन्हा ‘मिऱ्या’दिनांक ३ जुलै २०१९ रोजी केरळचे खासदार डीन...
आश्वासनांचा पाऊसराज्यात विधानसभा निवडणुकीचा प्रचार आता अंतिम...