agriculture news in Marathi, proposal of milk rate cut behind quality, Maharashtra | Agrowon

गुणवत्तेच्या नावाखाली दूधदर कपातीचा प्रस्ताव

टीम अॅग्रोवन
बुधवार, 22 ऑगस्ट 2018

मुंबई : राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांनी केलेल्या आंदोलनानंतर सरकारने शेतकऱ्यांना दूध दर मिळण्यासाठी संघांना ५ रुपये प्रतिलिटर अनुदान जाहीर केले होते. मात्र, आता दुधाची गुणवत्ता टिकावी, या कारणासाठी कमी एसएनएफ असलेल्या दुधाच्या दरात कपात करण्याचा प्रस्ताव पशुसंवर्धन आणि दुग्धविकास विभागाने आणला आहे, याबाबत लवकरच शासन निर्णय जाहीर होण्याची शक्यता असल्याने पुन्हा एकदा शेतकऱ्यांमध्ये असंतोष पसरण्याची चिन्हे आहेत.  

मुंबई : राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांनी केलेल्या आंदोलनानंतर सरकारने शेतकऱ्यांना दूध दर मिळण्यासाठी संघांना ५ रुपये प्रतिलिटर अनुदान जाहीर केले होते. मात्र, आता दुधाची गुणवत्ता टिकावी, या कारणासाठी कमी एसएनएफ असलेल्या दुधाच्या दरात कपात करण्याचा प्रस्ताव पशुसंवर्धन आणि दुग्धविकास विभागाने आणला आहे, याबाबत लवकरच शासन निर्णय जाहीर होण्याची शक्यता असल्याने पुन्हा एकदा शेतकऱ्यांमध्ये असंतोष पसरण्याची चिन्हे आहेत.  

पिशवीबंद दूध वगळून गायीच्या उर्वरित दुधाला ३.२ फॅट आणि ८.३ एसएनएफ व त्यापेक्षा अधिक गुणवत्तेच्या दूध रूपांतरणास ५ रुपये अनुदान देण्यास सरकारने मान्यता दिली आहे.

त्यानुसार शेतकऱ्यांना ३.२ टक्के फॅट गुणवत्तेच्या दुधाला २४ रुपये १० पैसे दर देणे बंधनकारक आहे. त्यामध्ये १९ रुपये १० पैसे रुपये दूध संस्थेचे तर ५ रुपये शासन अनुदानाचा समावेश असणार आहे. ३.३ टक्के फॅटच्या दुधास २४ रुपये ४० पैसे (१९ रुपये ४० पैसे व ५ रुपये अनुदान), ३.४ टक्के फॅटच्या दुधास २४ रुपये ७० पैसे व (१९ रुपये ७० पैसे व ५ रुपये अनुदान) आणि ३.५ टक्के फॅट गुणवत्तेच्या दुधास २५ रुपये (२० रुपये व ५ रुपये अनुदान) प्रतिलिटर असा दर देणे बंधनकारक राहील. 

दूध प्रकिया संघांकडील पिशवीबंद दुधाला हे अनुदान असणार नाही. हे अनुदान दूधपुरवठा करणारी संस्था किंवा रूपांतरण करणारी संस्था यापैकी एका संस्थेस लागू राहील. या योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या संघांनी दूध उत्पादक शेतकऱ्यांना १ ऑगस्ट २०१८ पासून २५ रुपये प्रतिलिटर खरेदी दर दिला जात असल्याचे हमीपत्र संबंधित प्रादेशिक दुग्धव्यवसाय विकास अधिकारी यांना देणे बंधनकारक करण्यात आले होते, यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना दरात दिलासा मिळेल, असे वाटत असतानाच सरकारने दर कपातीचा नवा प्रस्ताव आणला असल्याची खात्रीलायक माहिती पुढे आली आहे. 

या प्रस्तावानुसार आता ८.४ एसएनएफ असलेल्या दुधाच्या दरात १ रुपयांनी कपात करण्यात येणार आहे. तर ८.३ एसएनएफपेक्षा कमी गुणवत्ता असलेल्या दुधाला प्रतिलिटर ५० पैसे अधिक दर कपात करण्यात येणार आहे. दुधाची गुणवत्ता टिकावी व भेसळ होऊ नये यासाठी हा निर्णय घेत असल्याचा दावा विभागाकडून करण्यात येत आहे. यासंदर्भातला शासन निर्णय लवकरच प्रसिद्ध होणार असून शेतकऱ्यांमधून विरोध होण्याची शक्यता आहे.


इतर अॅग्रो विशेष
थेट पपई विक्रीतून मिळविला तिप्पट दर !परभणी ः कोरोनाच्या स्थितीमध्ये लॉकडाऊन व...
शेतमालाचे ऑनलाइन तारण कर्ज होणार उपलब्ध...मुंबई : टाळेबंदी कालावधीत शेतकऱ्यांना राज्य वखार...
अतिवृष्टी आणि अतिक्रमणामुळेच पूरस्थिती...मुंबई : अतिवृष्टी आणि अतिक्रमणामुळेच...
शेतकऱ्यांची अडवणूक झाली, तर...नगर : ‘‘शेतकऱ्यांसाठी काम करणे याला आपण सर्वांनी...
मॉन्सून अरबी समुद्रात; सोमवारपर्यंत...पुणे  : नैर्ऋत्य मोसमी वारे (मॉन्सून)...
सहकाराच्या त्रिस्तरीय रचना मोडण्यास...पुणे : राज्यातील काही जिल्हा मध्यवर्ती सहकारी...
उद्यापासून पूर्वमोसमी पावसाचा अंदाज;...पुणे : राज्यात अक्षरशः भाजून काढणाऱ्या उन्हापासून...
`गोकुळ' ची ४५ लाख लिटर दुधावर प्रक्रिया कोल्हापूर ः लॉकडाउनच्या काळात कोल्हापूर...
पीककर्जासाठी हेलपाटे, भ्रष्ट...संग्रामपूर, जि. बुलडाणा : वेळ सकाळी साधारण...
टोळधाडीमुळे अवघे ५० हेक्‍टरचे नुकसान :...नागपूर: टोळधाडीचा धोका अमरावती विभागात टळला असला...
राज्यात ४० हजार टन दूध पावडर पडूनपुणे : राज्यात ४० हजार टन दूध पावडर (भुकटी) पडून...
मागणीपेक्षाही एक लाख क्विंटल बियाणे...पुणे : ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर लॉकडाउन असले...
दुग्धव्यवसायातून शेतीला दिला सक्षम...आत्महत्याग्रस्त अशी ओळख असलेल्या यवतमाळ...
मॉन्सून मालदिवात दाखल; १ जूनलाच केरळात...पुणे : नैर्ऋत्य मोसमी वारे (मॉन्सून) सोमवारपर्यंत...
भारतीय किसान संघामार्फत शेतकऱ्यांनी...कोल्हापूर: भारतीय किसान संघाने लॉकडाउनच्या काळात...
लॉकाडाउनमध्येही शेतकऱ्यांकडून शेतमालाची...पुणे (प्रतिनिधी)ः कोरोना टाळेबंदी मध्ये शेतमालाची...
खानदेशात साठा वाढल्याने कापूस, सरकी...जळगाव : कापसाची शासकीय खरेदी खानदेशात मागील ६ मे...
राज्यातील २८० बाजार समित्या अडचणीत;...लातूर ः राज्यातील ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा...
उष्णतेच्या लाटेमुळे अकोल्यात केळीचे घड...अकोला  ः जिल्ह्यात या आठवड्यात वाढलेल्या...