Agriculture news in marathi Proposal of Rs. 100 per quintal for transport of sugar | Page 4 ||| Agrowon

साखर वाहतुकीसाठी क्विंटलला १०० रुपये अनुदानाचा प्रस्ताव 

टीम अॅग्रोवन
रविवार, 18 एप्रिल 2021

साखरेला प्रतिक्विटल शंभर रुपये वाहतूक अनुदान देण्याचा प्रस्ताव साखर आयुक्तालयाने राज्य शासनापुढे ठेवला आहे. हे अनुदान मिळाल्यास राज्यातील साखर कारखान्यांना जलद गतीने साखर विक्री करणे शक्य होईल, असा अंदाज आयुक्तालयाचा आहे. 

कोल्हापूर : पूर्वेकडील राज्यांनी वाहतूक खर्चात बचत होत असल्याने उत्तर प्रदेशातील साखरेला प्राधान्य दिले आहे. याचा फटका राज्यातील साखर कारखान्यांना बसत आहे. वाहतूक खर्चामुळे राज्यातील साखर मागणी अभावी ठप्प राहत आहे. यामुळे साखरेला प्रतिक्विटल शंभर रुपये वाहतूक अनुदान देण्याचा प्रस्ताव साखर आयुक्तालयाने राज्य शासनापुढे ठेवला आहे. हे अनुदान मिळाल्यास राज्यातील साखर कारखान्यांना जलद गतीने साखर विक्री करणे शक्य होईल, असा अंदाज आयुक्तालयाचा आहे. 

यंदा राज्यात १०० लाख टनांहून अधिक साखर उत्पादित होत आहे. हमीभावापेक्षा कमी दराला मागणी असल्याने कारखाने साखर विक्रीसाठी झगडत आहेत. यातच पूर्वेकडील राज्यांनी साखरेसाठी उत्तर प्रदेशाच्या साखरेला पसंती दिली आहे. ही राज्ये उत्तर प्रदेशला जवळ असल्याने त्यांना उत्तर प्रदेशची साखर स्वस्त पडते. यामुळे उत्तर प्रदेशचा साखर विक्रीचा वेग महाराष्ट्रापेक्षा अधिक आहे. शासनाने वाहतूक खर्चासाठी अनुदान द्यावे, अशी मागणी साखर उद्योगाने वारंवार केली होती. अखेर या बाबतचा प्रस्ताव साखर आुयक्तालयाने चार दिवसांपूर्वीच तयार करुन शासनापुढे ठेवला आहे. हे अनुदान मिळाल्यास वाहतुकीचा ताण हलका होऊन राज्यातील साखर गतीने पूर्वेकडील राज्यांना जाऊ शकेल, असा अंदाज साखर उद्योगातील सूत्रांचा आहे. 

वाहतूक खर्चामुळे दहा लाख टनांचा फटका 
राज्यात तयार होणाऱ्या साखरेपैकी ३० टक्के साखरेची राज्यात विक्री होते. ६५ ते ७० टक्के साखर बाहेरच्या राज्यात विकावी लागते. महाराष्ट्र व उत्तरप्रदेश या दोन्ही राज्यांना स्वत:च्या राज्यात तयार होणारी साखर ही बाहेरच्या राज्याला द्यावीच लागते. या दोन राज्याशिवाय इतर राज्यांत उत्पादित होणारी साखर त्या त्या राज्यापुरती पुरेशी होते. गुजरातसारखी राज्ये महाराष्ट्राकडूनही साखर खरेदी करतात. बहुतांशी साखर रेल्वेने बाहेरच्या राज्यांना जाते. महाराष्ट्रापेक्षा क्विंटलला शंभर ते दीडशे रुपये स्वस्त पडत असल्याने पूर्वेकडील राज्ये उत्तर प्रदेशच्या साखरेला पंसती देत आहेत. यामुळे राज्याची वर्षाला सुमारे दहा लाख टन साखर विक्री अभावी राहत आहे. याचा मोठा फटका राज्यातील कारखान्यांना बसत आहे. परिणामी, कोट्याइतकी साखर विक्री करताना दमछाक होते. 

साखर आयुक्तालयाने याबाबतचा प्रस्ताव शासनास चार दिवसांपूर्वी पाठविला आहे. साखर विक्रीची गती वाढावी व शिल्लक साखरेचा ताण कमी व्हावा हा या प्रस्तावामागचा उद्देश आहे. 
- संजय भोसले, 
साखर सहसंचालक


इतर अॅग्रो विशेष
जिद्द, चिकाटी, प्रयोगशीलतेतून...नाशिक जिल्ह्यातील सातमाने (ता. मालेगाव) येथील...
राज्यात ठिकठिकाणी मुसळधारेचा इशारा पुणे : महाराष्ट्राची कोकण किनारपट्टी ते कर्नाटक...
रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये...पुणे : कोकणात कमी दाबाच्या क्षेत्रामुळे धुवाधार...
अकोला कृषी विद्यापीठात ६० टक्के पदे...अकोला ः या जिल्ह्यात कृषी खात्यात कर्मचाऱ्यांची...
पंढरपुरात पुन्हा एकदा भक्तिसागर भरू दे...पंढरपूर, जि. सोलापूर : पंढरपुरात पुन्हा एकदा...
निधीअभावी सिंचन विहीर योजनेला खीळ नागपूर : विभागातील सहा जिल्ह्यांमध्ये १३ हजार...
दूध भेसळीची चर्चा डेअरी उद्योगावर संकट...पुणे ः शेतकऱ्यांच्या दुधाला कमी भाव मिळत असल्याची...
पेरा अंतिम टप्प्यात; कर्जाची प्रतीक्षा...पुणे ः राज्यात खरीप पेरा शेवटच्या टप्प्यात...
वैशिष्ट्यपूर्ण वाणांसह तंत्रज्ञान...वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने सोयाबीनचे...
विदर्भात जोर वाढणार पुणे : मुंबईसह, कोकणातील बहुतांश भागात मुसळधार...
कोकण, मध्य महाराष्ट्रात संततधारपुणे : कोकणातील बहुतांश भागांत पावसाचा कहर सुरू...
संसद अधिवेशन : पहिल्याच दिवशी सरकारची...नवी दिल्ली ः संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या...
सिंधुदुर्गात संततधार सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरूच...
खासगी कृषी महाविद्यालयांमधील वेतन...पुणेः राज्यातील खासगी विनाअनुदानित कृषी...
देशात साखरेच्या शिल्लक साठ्यात घट कोल्हापूर: गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत यंदाच्या...
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांना...सिंधुदुर्गनगरी ः डॉ. पंजाबराव देशमुख कर्ज व्याज...
गुलाब, लिली, शेवंतींनं अर्थकारण केलं...शिरसोली (ता.जि.जळगाव) येथील रामकृष्ण, श्रीराम व...
प्रत्यक्ष राबणाऱ्या हातांच्या मदतीला...नेपाळची सीमा, हिमालयात सतत होणारे वातावरणीय बदल...
कृत्रिम रेतनातून उच्च दर्जाच्या...नागपूर : दुधाचे उत्पादन आणि पशुधन वाढविण्यासाठी...
मध्य, उत्तर महाराष्ट्रात पावसाची ओढ पुणे : पावसाचा हंगाम सुरू होऊन तब्बल दीड महिना...