सोलापूर जिल्ह्यातील छावणीच्या अनुदानासाठी २८ कोटींचा प्रस्ताव

सोलापूर जिल्ह्यातील छावणीच्या अनुदानासाठी २८ कोटींचा प्रस्ताव
सोलापूर जिल्ह्यातील छावणीच्या अनुदानासाठी २८ कोटींचा प्रस्ताव

सोलापूर : जिल्ह्यात सुरू करण्यात आलेल्या १७४ चारा छावण्यांतील जनावरांना चारा व अन्य सोईसुविधा पुरवणाऱ्या छावणीचालकांना द्यावयाच्या अनुदानापोटी जवळपास २८ कोटी रुपयांचा प्रस्ताव राज्य शासनाकडे जिल्हा प्रशासनाने पाठवला आहे.

नव्यानेच छावणीतील मोठ्या जनावरांना प्रति जनावर १०० रुपये आणि लहान जनावरांना ५० रुपये याप्रमाणे अनुदान देण्याचे जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार हे अनुदान छावणीचालकांना मिळणार आहे, अशी माहिती प्रशासकीय सूत्रांकडून मिळाली. 

जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांपासून दुष्काळाची तीव्रता वाढली आहे. पिण्याच्या पाण्यासह जनावराच्या चाऱ्याचा मोठा प्रश्‍न निर्माण झाला आहे. त्या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यात जवळपास १७४ चारा छावण्या सुरू करण्यात आल्या आहेत. आणखी काही भागांतून मागणी होते आहे. या छावण्यांमध्ये सध्या मोठी १ लाख १ हजार ३४३, तर १५ हजार २२९ लहान जनावरे आहेत.

माढा, सांगोला, मंगळवेढा, अक्कलकोट, बार्शी, माळशिरस, करमाळा या तालुक्‍यांत या छावण्या सुरू आहेत. त्यातील जनावरांची संख्या आणि त्यापोटी द्यावयाचे अनुदान याचा सविस्तर प्रस्ताव जिल्हा प्रशासनाने तयार करून शासनाकडे पाठवला आहे. यापूर्वी मोठ्या जनावरांना प्रतिजनावर ९० रुपये आणि लहान जनावरांना ४५ रुपये देण्यात येत होते, पण शासनाने या महिन्यापासून त्यात वाढ करून ही रक्कम अनुक्रमे १०० रुपये आणि ५० रुपये केली आहे. त्यानुसारच हे पैसे छावणीचालकांना मिळणार असल्याची माहिती मिळाली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com