Agriculture news in marathi Proposal to run irrigation scheme on solar energy: Jayant Patil | Page 3 ||| Agrowon

सिंचन योजना सौरऊर्जेवर चालविण्याबाबत प्रस्ताव द्या ः जयंत पाटील

टीम अॅग्रोवन
सोमवार, 19 एप्रिल 2021

टेंभू, ताकारी व म्हैसाळ उपसा सिंचन योजनांच्या पाणीवाटपाची व पाणीपट्टी वसुलीसाठीची व्यवस्था कार्यक्षम, तसेच प्रभावी करावी. या योजना सौरऊर्जेवर चालविण्याबाबतचा प्रस्ताव तयार करावा, अशा सूचना जलसंपदा, लाभक्षेत्र विकासमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी दिल्या. 

सांगली ः टेंभू, ताकारी व म्हैसाळ उपसा सिंचन योजनांच्या पाणीवाटपाची व पाणीपट्टी वसुलीसाठीची व्यवस्था कार्यक्षम, तसेच प्रभावी करावी. या योजना सौरऊर्जेवर चालविण्याबाबतचा प्रस्ताव तयार करावा, अशा सूचना जलसंपदा, लाभक्षेत्र विकासमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी दिल्या. 

सांगली पाटबंधारे विभाग येथील विश्रामगृहात शनिवारी (ता. १७) पालकमंत्री श्री. पाटील यांनी टेंभू, ताकारी व म्हैसाळ उपसा सिंचन प्रकल्प योजनांबाबत आढावा घेतला. त्या वेळी ते बोलत होते. सांगली पाटबंधारे मंडळाचे अधीक्षक अभियंता एम. जे. नाईक, उपअधीक्षक अभियंता अमर सूर्यवंशी, कार्यकारी अभियंता ज्योती देवकर, कार्यकारी अभियंता अभिनंदन हारूगडे, सचिन पवार, सूर्यकांत नलवडे, कुमार पाटील, राजन डवरी उपस्थित होते. 

पालकमंत्री पाटील म्हणाले, की सिंचन योजनांच्या पाणीवाटपाबाबत व पाणीपट्टी वसुलीबाबत योग्य नियोजन करावे. टंचाईच्या काळात पाणी देण्यासाठी त्याचा साठा करण्याबाबत योग्य नियोजन करावे, अशा सूचना देऊन त्यांनी सांगली, वाळवा, कासेगाव, समडोळी येथील पूरसंरक्षक कामे, डिग्रज, बोरगाव कोल्हापूर पद्धतीचा बंधारा दुरुस्ती कामे, आरफळ व कृष्णा कालवा लायनिंग कामे, मंत्रालयीन स्तरावरील प्रलंबित प्रस्तावांचा आढावा घेतला. तसेच सिंचन योजनांची विद्युत देयक स्थिती, पाणीपट्टी वसुली, विविध बंदिस्त नलिका कामे, प्रगतिपथावरील व प्रस्तावित कामे, योजनांची सद्यःस्थिती, भूसंपादन आदींबाबत सविस्तर आढावा घेऊन संबंधितांना योग्य नियोजन करण्याचे निर्देश दिले. 

तसेच क्षारपड जमिनीसंदर्भात कवठेपिरान, डिग्रज, बोरगांव, आष्टा, उरुण- इस्लामपूर या गावांचे सर्व्हे पूर्ण झाले असून, प्रति हेक्‍टरी खर्च मापदंड शासनास त्वरीत सादर करण्याच्या सूचना ही श्री. पाटील यांनी या वेळी दिल्या. 


इतर ताज्या घडामोडी
सोलापूरच्या कृषी विभागात कोरोनाचा शिरकावसोलापूर ः जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा विळखा वरचेवर...
पंढरपूरला आणखी २०० बेड वाढवणार ः भरणेसोलापूर : ‘‘पंढरपुरातील वाढत्या कोरोना...
केहाळ येथे भुईमुगाची उन्हाळी हंगामात...परभणी ः जिल्ह्यातील केहाळ (ता. जिंतूर) येथील...
नाशिकच्या उत्तरपूर्व भागात टँकर सुरूनाशिक : जिल्ह्याच्या अनेक भागात समाधानकारक पाऊस...
लातूर कृषी विभागातील पाच जिल्ह्यांत...लातूर : लातूर कृषी विभागातील पाच जिल्ह्यांत...
परभणीत कपाशी क्षेत्र घटण्याची शक्यतापरभणी ः ‘‘जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात...
सोलापुरात माल उतरण्यासाठी भुसार बाजारात...सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
सातारा : कांदा बी सदोष निघाल्याने...विसापूर, जि. सातारा : खासगी कृषी फार्म, व्यापारी...
विमा कंपनी विरोधात शेतकऱ्यांमध्ये रोषगोंदिया : खरीप हंगामात अतिवृष्टी, संततधार पाऊस व...
सोयाबीन बियाण्यांची खरिपासाठी जुळवाजुळवअकोला : येत्या हंगामासाठी शेतकरी घरगुती सोयाबीन...
‘कुरनूर’मधून पाण्याचे दुसरे आवर्तन सोडलेसोलापूर ः अक्कलकोट तालुक्यातील कुरनूर धरणातून...
पंढरपुरातील दोन्ही भक्त निवासे कोरोना...सोलापूर ः पंढरपूर शहर आणि तालुक्यातील कोरोना...
कोरोना सुपरस्प्रेडर रोखण्यासाठी पुणे...पुणे : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ग्रामीण भागात...
सांगलीत साखरेचे उत्पादन १३ लाख...सांगली जिल्ह्यातील साखर कारखान्यांच्या गळीत...
‘पंदेकृवि’चा दीक्षान्त समारंभ अखेर पुढे...अकोला ः डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचा...
ऑक्सिजन, रेमडेसिव्हिरचा पुरवठा करा ः...मुंबई ः महाराष्ट्राला अधिक ऑक्सिजनची गरज असून,...
बाजार समिती कर्मचाऱ्यांना विम्यासाठी ‘...पुणे ः कोरोना संकटात बाजार समिती कर्मचाऱ्यांचा ५०...
डाळिंब प्रक्रिया, मुल्यवर्धन तंत्रज्ञान...औरंगाबाद : डाळिंब पिकापासून जास्त आर्थिक नफा...
वन्यप्राण्यांपासून पीक वाचवण्यासाठी...मंडणगड, जि. रत्नागिरी ः वन्य प्राण्यांच्या...
यंदा कर्तव्य असणाऱ्यांसाठी ६४ मुहूर्त नागपूर : कोरोनामुळे वेळेवर तारखांत बदल करावा लागत...