agriculture news in Marathi, proposal of soil and water test lab pending, Maharashtra | Agrowon

आटपाडी माती-पाणी परीक्षण प्रयोगशाळा प्रस्ताव दुर्लक्षित
टीम अॅग्रोवन
बुधवार, 24 जुलै 2019

निर्यातक्षम डाळिंब फळपीक आटपाडी तालुक्‍यात शेतकरी मोठ्या प्रमाणात घेतात. दोन वर्षात द्राक्षाचीही लागवड मोठ्या प्रमाणात झाली. त्यास अनसुरून माती पाणी परीक्षण प्रयोगशाळा आटपाडी बाजार आवारात व्हावी. त्याचा लाभ तालुक्‍यातील शेतकऱ्यांना होईल. 
- भाऊसाहेब गायकवाड, सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती

सांगली ः आटपाडी तालुक्‍यात डाळिंब व द्राक्षाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढल्याने माती- पाणी परीक्षण प्रयोगशाळा उभारण्याची गरज आहे. जिल्हा नियोजन मंडळाच्या माध्यमातून निधी मिळावा यासाठी आटपाडी कृषी उत्पन्न बाजार समितीने पालकमंत्री सुभाष देशमुख यांच्याकडे मागणीचा प्रस्ताव सादर केला आहे. सहा जुलै २०१८ रोजी प्रस्ताव देऊनही त्याची अंमलबजावणी झालेली नाही. 

आटपाडी तालुक्‍यात डाळिंब नगदी पिकाचे क्षेत्र दहा हजार हेक्‍टरहून अधिक आहे. निर्यातक्षम डाळिंब प्रत्येक वर्षी आटपाडी तालुक्‍यातील शेतकरी परदेशात पाठवत असतात. काही कोटींची उलाढाल होत असते. दिवसेंदिवस डाळिंब क्षेत्र वाढत आहे. त्याबरोबर द्राक्षाचेही क्षेत्र दोन वर्षात मोठ्या प्रमाणात वाढले आहे. दोन्ही नगदी पिकांमुळे तालुक्‍यातील शेतकऱ्यांची आर्थिक उलाढाल चांगली होत असल्याने तालुक्‍याच्या ठिकाणी माती पाणी परीक्षण प्रयोगशाळा गरजेची झाली आहे. 

माती व पाणी परीक्षण करण्यासाठी शेतकऱ्यांना जिल्ह्याच्या ठिकाणी जावे लागते. काही शेतकरी लांब अंतर असल्याने आर्थिक व वेळेअभावी माती पाणी परीक्षण टाळतात. परिणामी माती परीक्षण न करता उत्पन्न घेतात. यात शेतकऱ्यांचे उत्पादन घटून आर्थिक नुकसानही होत. याचा विचार घेऊन कृषी उत्पन्न बाजार समितीने जिल्हा नियोजन मंडळाच्या माध्यमातून माती पाणी परीक्षण प्रयोगशाळा मिळावी यासाठी पालकमंत्री सुभाष देशमुख यांच्याकडे निधी मिळावा यासाठी प्रस्ताव सहा जुलै २०१८ रोजी दिला आहे. मात्र बाजार समितीने दिलेला प्रस्ताव वर्ष झाले तरी अजून मंजूर झालेला नाही. 

इतर ताज्या घडामोडी
वांग्यावरील शेंडा व फळे पोखरणाऱ्या...वांगी पिकामध्ये येणाऱ्या शेंडा व फळे पोखरणारी...
पूरस्थितीतील द्राक्ष बागेचे व्यवस्थापनसां गली, कोल्हापूर व कर्नाटक शेजारील काही भागांत...
अकोल्यातील प्रकल्पात अत्यल्पच साठाअकोला : यंदाच्या पावसाळ्याचे सुमारे अडीच महिने...
सांगलीत गूळ ३३०० ते ४४०० रुपये...सांगली : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी...
अकोला जिल्ह्यात ६० हजार हेक्टर क्षेत्र...अकोला ः यंदाच्या खरीप हंगामात जिल्ह्यात असमतोल...
सिंधुदुर्गात कालव, जिताडा मस्त्यबीज...मुंबई : राज्यात सागरी उत्पादनवाढीस...
ठिबकला ८० टक्के अनुदान; आंदोलनाला...भोसे, जि. सोलापूर : राज्य शासनाने कोरडवाहू...
मांडाखळीत संत्रा बागांत फळगळपरभणी : कमी पाण्यामुळे जमिनीमध्ये ओलाव्याची...
रश्‍मी बागल यांचा शिवसेनेत प्रवेशसोलापूर : जिल्ह्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेसची...
माशांच्या पाच नव्या जातींचा घेतला शोध अरुणाचल प्रदेश राज्यातील इटानगर येथील राजीव गांधी...
कोल्हापुरात मोहीम स्वरूपात पंचनाम्यास...कोल्हापूर: महापुराच्या प्रलयानंतर आता...
सांगली जिल्हा बॅंकेच्या १२ शाखांचे...सांगली   ः महापुराचा फटका शेती आणि...
एकात्मिक शेती पद्धत वापरासाठी ‘कृषी’...मुंबई  : पीक उत्पादन वाढून शेतकऱ्यांचे...
पूरग्रस्तांसह अतिवृष्टीत पिके...कोल्हापूर   : पूरग्रस्तांसह अतिवृष्टीत...
युतीतील अनेक जण आमच्या संपर्कात ः अजित...यवतमाळ : राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस आणि...
मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन शरद पवार...मुंबई  ः कोल्हापूर, सांगली, सातारा या...
खानदेशात शेतीकामात मजूरटंचाईजळगाव : खानदेशात जुलैमधील अखेरचे १० दिवस व...
पोल्ट्रीधारकांना सवलतीच्या दरात धान्यविटा, जि. सांगली : पोल्ट्रीधारकांना...
नाशिक जिल्ह्यात पावसामुळे पूर्वहंगामी...नाशिक : संततधार सुरू असलेल्या पावसामुळे...
नांदेड जिल्ह्यात पीककर्जाचे ७३ हजारांवर...नांदेड : चालू आर्थिक वर्षाच्या (२०१९-२०) पहिल्या...