झाडांच्या गोलाईच्या आकारानुसार शेतकऱ्यांना अनुदानाचा प्रस्ताव

झाडांच्या गोलाईच्या आकारानुसार शेतकऱ्यांना अनुदानाचा प्रस्ताव

पुणे: दुष्काळावर मात करण्यासाठी शेतातील आणि बांधावरील झाडांची तोड न करता त्यांचे संवर्धन व संरक्षण करण्यासाठी शेतकऱ्यांना झाडांच्या गोलाईच्या आकारानुसार द्यावयाच्या अनुदान योजनेचा समावेश ट्री क्रेडिट योजनेत करण्याबाबतचा अभिप्राय अपर प्रधान मुख्य संरक्षक व केंद्रस्थ अधिकारी संजीव गौड यांनी शासनाला दिला आहे. ट्री क्रेडिट योजनेचा प्रस्ताव परिपक्व अवस्थेत असल्याचेही गौड यांनी पत्रात म्हटले आहे. गोंदिया जिल्ह्याचे तत्कालीन जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांनी दुष्काळावर मात करण्यासाठी शेतातील आणि बांधावरील झडांची तोड न करता त्यांच्या संवर्धन व संरक्षणासाठी झाडांच्या गोलाईनुसार १०० ते १ हजार रुपये अनुदान देण्याची योजना जिल्हापातळीवर आखली होती. तर, प्रायोगिक तत्त्वावर गोंदिया जिल्ह्यात ही योजना यशस्वी झाली, तर योजना राज्यस्तरीय करण्याचा प्रस्ताव शासनाला सादर केला होता. या योजनेबाबत शासने वन विभागाचा अभिप्राय मागविला होता. याबाबत वन विभागाने ट्री क्रेडिट योजनेचा संदर्भ घेत अशाप्रकारची योजना राबविण्याबाबत २०१६ मध्ये प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन बल प्रमुख) यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीने वनाधिकाऱ्यांच्या राज्यस्तरीय बैठकीमध्ये सादरीकरण केले होते. या प्रस्तावावर विविध विभागांनी वेळोवेळी दिलेल्या अभिप्रायावर ट्री क्रेडिट योजनेचा प्रस्ताव परिपक्व अवस्थेत तयार आहे. त्यामुळे या योजनेचा समावेश ट्री क्रेडिट योजनेत करण्याचा अभिप्राय अपर प्रधान मुख्य संरक्षक व केंद्रस्थ अधिकारी संजीव गौड यांनी शासनाला दिला आहे.

अशी होती योजना  गोंदिया जिल्ह्याचे तत्कालीन जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांनी सुचविलेल्या योजनेमध्ये शेतातील किंवा बांधावरील १०० सेमी गोलाईच्या झाडांना ३०० तर ३०० सेमीपेक्षा जास्त गोलाई असणाऱ्या झाडांना १ हजार रुपये अनुदान देण्यात यावे, असे प्रस्तावित केले होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com