agriculture news in Marathi, proposal for subsidy basis on tree circle, Maharashtra | Page 2 ||| Agrowon

झाडांच्या गोलाईच्या आकारानुसार शेतकऱ्यांना अनुदानाचा प्रस्ताव
टीम अॅग्रोवन
शनिवार, 24 ऑगस्ट 2019

पुणे: दुष्काळावर मात करण्यासाठी शेतातील आणि बांधावरील झाडांची तोड न करता त्यांचे संवर्धन व संरक्षण करण्यासाठी शेतकऱ्यांना झाडांच्या गोलाईच्या आकारानुसार द्यावयाच्या अनुदान योजनेचा समावेश ट्री क्रेडिट योजनेत करण्याबाबतचा अभिप्राय अपर प्रधान मुख्य संरक्षक व केंद्रस्थ अधिकारी संजीव गौड यांनी शासनाला दिला आहे. ट्री क्रेडिट योजनेचा प्रस्ताव परिपक्व अवस्थेत असल्याचेही गौड यांनी पत्रात म्हटले आहे.

पुणे: दुष्काळावर मात करण्यासाठी शेतातील आणि बांधावरील झाडांची तोड न करता त्यांचे संवर्धन व संरक्षण करण्यासाठी शेतकऱ्यांना झाडांच्या गोलाईच्या आकारानुसार द्यावयाच्या अनुदान योजनेचा समावेश ट्री क्रेडिट योजनेत करण्याबाबतचा अभिप्राय अपर प्रधान मुख्य संरक्षक व केंद्रस्थ अधिकारी संजीव गौड यांनी शासनाला दिला आहे. ट्री क्रेडिट योजनेचा प्रस्ताव परिपक्व अवस्थेत असल्याचेही गौड यांनी पत्रात म्हटले आहे.

गोंदिया जिल्ह्याचे तत्कालीन जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांनी दुष्काळावर मात करण्यासाठी शेतातील आणि बांधावरील झडांची तोड न करता त्यांच्या संवर्धन व संरक्षणासाठी झाडांच्या गोलाईनुसार १०० ते १ हजार रुपये अनुदान देण्याची योजना जिल्हापातळीवर आखली होती. तर, प्रायोगिक तत्त्वावर गोंदिया जिल्ह्यात ही योजना यशस्वी झाली, तर योजना राज्यस्तरीय करण्याचा प्रस्ताव शासनाला सादर केला होता. या योजनेबाबत शासने वन विभागाचा अभिप्राय मागविला होता.

याबाबत वन विभागाने ट्री क्रेडिट योजनेचा संदर्भ घेत अशाप्रकारची योजना राबविण्याबाबत २०१६ मध्ये प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन बल प्रमुख) यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीने वनाधिकाऱ्यांच्या राज्यस्तरीय बैठकीमध्ये सादरीकरण केले होते. या प्रस्तावावर विविध विभागांनी वेळोवेळी दिलेल्या अभिप्रायावर ट्री क्रेडिट योजनेचा प्रस्ताव परिपक्व अवस्थेत तयार आहे. त्यामुळे या योजनेचा समावेश ट्री क्रेडिट योजनेत करण्याचा अभिप्राय अपर प्रधान मुख्य संरक्षक व केंद्रस्थ अधिकारी संजीव गौड यांनी शासनाला दिला आहे.

अशी होती योजना 
गोंदिया जिल्ह्याचे तत्कालीन जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांनी सुचविलेल्या योजनेमध्ये शेतातील किंवा बांधावरील १०० सेमी गोलाईच्या झाडांना ३०० तर ३०० सेमीपेक्षा जास्त गोलाई असणाऱ्या झाडांना १ हजार रुपये अनुदान देण्यात यावे, असे प्रस्तावित केले होते.

टॅग्स

इतर अॅग्रो विशेष
अन्नद्रव्यांचा वापर हवा संतुलितचशेतकऱ्यांनी माती आणि पाणी परिक्षणाबरोबरच...
मराठवाडा वॉटर ग्रिडचा संशयकल्लोळ! चिमणीचा खोपा ते राजवाडा, असे निवाऱ्याचे अनेक...
‘एफएमओ’चा सह्याद्री फार्म्सला १२०...नाशिक : शेतकरी उत्पादक कंपन्यांनी स्वतःच्या...
लष्करी अळीच्या नुकसानीचे पंचनामे का...औरंगाबाद : ‘‘शेती तोट्यात गेली, गावचं अर्थकारण...
जायकवाडी धरणातून पाण्याचा विसर्गजायकवाडी, जि. औरंगाबाद : जायकवाडी धरणामधून...
थकबाकीदार सूतगिरणीच्या संचालकांवर राज्य...मुंबई: कोट्यवधींचे कर्ज थकवल्याप्रकरणी राज्य...
रेशीम विभागाचा सुधारित आकृतीबंध...जालना: झपाट्याने वाढत असलेल्या रेशीम उद्योग व...
अमेरिकन लष्करी अळीकडून ४० टक्के मका फस्तपुणे: राज्यात मका पिकावर अमेरिकन लष्करी अळीचे...
लष्करी अळी आटोक्यात: कृषी विभागपुणे : राज्यात दोन लाख ६७ हजार हेक्टर क्षेत्रातील...
प्रतिकूलतेतून मेघाताईंची शेतीत भरारीपरभणी जिल्ह्यातील झरी (ता. परभणी) येथील...
सोलापुरात हिरव्या मिरचीचा बाजार कडक सोलापुरात हिरव्या मिरचीचा बाजार कडक ! गेल्या...
अनुदान अर्जांच्या पूर्वसंमतीची पद्धत...पुणे : राज्यातील शेतकऱ्यांची गैरसोय टाळण्यासाठी...
कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात...पुणे : राज्यात पावसाला पोषक हवामान होत असल्याने...
महाराष्ट्राप्रमाणे आम्हालाही विकसित...पुणे : महाराष्ट्रातील शेतकरी पीक उत्पादन...
कांदा खाणाऱ्यांचा विचार करता, मग...नाशिक : कांद्यातील भाववाढीला आळा घालण्यासाठी...
द्राक्षपंढरीत गोड्या छाटण्यांना सुरवातनाशिक : चालू वर्षीच्या द्राक्ष हंगामाला सुरवात...
युरियाशिवाय शेती विचार रुजला तरच...नागपूर ः सेंद्रिय शेतीचा विचार गेल्या अनेक...
...अखेर ऊसतोड कामगार महामंडळ स्थापनमुंबई ः गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या...
जलसमृद्धी बक्षीस योजनेतील चौथ्या आणि...पुणे : ॲग्रोवन जलसमृद्धी बक्षीस योजनेची सोडत...
नागपूर जिल्हा बॅंक घोटाळा निकाली...नागपूर ः नागपूर जिल्हा मध्यवर्ती बॅंकेतील...