सोलापुरातील कांदा उत्पादकांच्या अनुदानासाठी सहा कोटींचा प्रस्ताव

सोलापुरातील कांदा उत्पादकांच्या अनुदानासाठी सहा कोटींचा प्रस्ताव
सोलापुरातील कांदा उत्पादकांच्या अनुदानासाठी सहा कोटींचा प्रस्ताव

सोलापूर : राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कांद्याला प्रतिक्विंटल २०० रुपये अनुदान देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. ज्या शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर कांदा लागवडीच्या नोंदी नाहीत; अशांसाठी तलाठ्याचे प्रमाणपत्र ग्राह्य धरण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यानुसार दुसऱ्या टप्प्यात जिल्ह्यातील सात हजार ३४७ शेतकऱ्यांना त्याचा लाभ होणार आहे. या शेतकऱ्यांसाठी सहा कोटी ३३ लाख रुपयांची मागणी पणन विभागाकडे करण्यात आली आहे. 

जिल्ह्यातील जवळपास साडेसात हजार शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यात आठ कोटी रुपयांचे अनुदान वाटप करण्यात आले. सातबाऱ्यावर कांदा लागवडीची नोंद नसल्याने शेतकरी या योजनेतून वंचित राहण्याची शक्‍यता होती. शेतकऱ्यांनी केलेल्या मागणीनुसार तलाठ्याचे प्रमाणपत्र ग्राह्य धरण्याचा निर्णय सरकारने घेतला. या निर्णयामुळे जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. 

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत कांदा विक्री केलेल्या सहा हजार ७९७ शेतकऱ्यांना पाच कोटी ७८ लाख रुपयांचे अनुदान मागण्यात आले आहे. कुर्डुवाडी बाजार समितीमधील १७७, पंढरपूर ५६, बार्शी १४७, करमाळा सात आणि मंगळवेढा बाजार समितीत कांदा विक्री केलेल्या १६३ शेतकऱ्यांना या अनुदानाचा लाभ मिळेल.

दरम्यान, याबाबत जिल्हा उपनिबंधक कुंदन भोळे म्हणाले, ‘‘या योजनेतून एकही पात्र शेतकरी वंचित राहू नये, यासाठी आमचे प्रयत्न आहेत. पात्र शेतकऱ्यांना शासनाच्या अनुदानाची मदत लवकरात लवकर मिळवून देण्यासाठी पाठपुरावा केला जाईल.’’

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com