agriculture news in marathi Proposals submitted for the Farmers Award sent back | Page 2 ||| Agrowon

शेतकरी पुरस्कारासाठी दाखल केलेले प्रस्ताव पाठवले परत

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 9 सप्टेंबर 2021

गेल्या वर्षी सादर केलेले प्रस्ताव यंदा काढलेल्या नव्या नियमानुसार नसल्याचे कारण देत परत पाठविण्यात आले असून, हे प्रस्ताव शेतकऱ्यांकडून सुधारित पाठवावेत, असे कृषी विभागाकडून कळविण्यात आले आहे.

अकोला : शेतीत विविध प्रयोग करणाऱ्या, उत्पादन वाढीतून आर्थिकदृष्‍ट्या सक्षम होण्यासाठी प्रयत्नरत असलेल्या शेतकऱ्यांच्या पाठिवर कृषी विभागाच्या पुरस्कारातून कौतुकाची थाप पडत असते. म्हणूनच दरवर्षी शेकडोच्या संख्येने शेतकरी या पुरस्कारांसाठी प्रस्ताव सादर करीत असतात. मात्र गेल्या वर्षी सादर केलेले प्रस्ताव यंदा काढलेल्या नव्या नियमानुसार नसल्याचे कारण देत परत पाठविण्यात आले असून, हे प्रस्ताव शेतकऱ्यांकडून सुधारित पाठवावेत, असे कळविण्यात आले आहे. जवळपास वर्षभरानंतर हा प्रकार घडल्याने शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त होत आहे.

कृषी विभागाकडून कृषिभूषण, जिजामाता कृषिभूषण, सेंद्रिय शेती कृषिभूषण, शेतीमित्र, शेतीनिष्ठ अशा विविध प्रकारचे पुरस्कार देण्यात येतात. या पुरस्कारासाठी शेतकरी प्रस्ताव सादर करतात. अशाच प्रकारे गेल्या वर्षात जिल्ह्यातील आठ ते दहा शेतकऱ्यांनी पुरस्कारासाठी जिल्ह्याच्या कृषी विभागामार्फत विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयाकडे प्रस्ताव पाठवले होते. यासाठी अनेकांनी हजारोंचा खर्चही केला. कागदपत्रांची जुळवाजुळव केली. प्रस्ताव दाखल केलेल्या शेतकऱ्यांची समित्यांनी भेट देऊन शिफारससुद्धा केली होती. अशा प्रकारच्या संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करीत हे प्रस्ताव देण्यात आले होते. 

मध्यंतरी शासनाकडून शेतकऱ्यांच्या पुरस्कारांची घोषणाही करण्यात आली होती. त्यामध्ये जिल्ह्यातून दाखल केलेल्या प्रस्तावांमधील शेतकऱ्यांची नावे दिसून आली नव्हती. परिणामी, शेतकऱ्यांमध्ये आपले नाव कधी येईल याबाबत उत्सुकता बनलेली होती. असे असताना, आता मात्र कृषी विभागाकडून त्यांचे प्रस्ताव फेटाळत परत पाठवण्यात आले आहेत. हे प्रस्ताव यंदा फेब्रुवारी महिन्यात काढलेल्या नव्या नियम, प्रपत्रानुसार नसल्याचे कारण देण्यात आले. संबंधितांचे प्रस्ताव नव्या नियमानुसार द्यावेत, असेही सुचविण्यात आल्याचे समजते. आता या शेतकऱ्यांना पुन्हा प्रस्ताव बनविण्यासाठी खर्च करावा लागेल. 

प्रस्ताव २०२० मध्ये, नियम आला २०२१ मध्ये !
मिळालेल्या माहितीनुसार शेतकऱ्यांनी पुरस्कारासाठी २०२० मध्ये प्रस्तावाच्या फाइल कृषी विभागाकडे सादर केल्या होत्या. तर शासनाचे नवे परिपत्रक यंदा फेब्रुवारी महिन्यात आले. त्यामुळे नवीन नियम लागू होण्याआधी दाखल केलेल्या प्रस्तांवाना फेटाळण्याचे नेमके कारण काय, असा प्रश्‍न आता शेतकरी विचारत आहेत.


इतर ताज्या घडामोडी
शेतकऱ्यांना बियाण्यांबाबत स्वावलंबी...औरंगाबाद : ‘‘शेतकऱ्यांना बियाण्यांच्या बाबतीत...
परभणी, हिंगोली जिल्ह्यात पंधरा...परभणी  : परभणी, हिंगोली जिल्ह्यातील १५...
परभणी जिल्ह्यात अतिवृष्टिग्रस्तांसाठी...परभणी ः जिल्ह्यात जुलै महिन्यात झालेल्या...
लखीमपूर हिंसाचार : आशिष मिश्राला ‘नोटीस...लखीमपूर, उत्तरप्रदेश ः येथील हिंसाचारप्रकरणी...
सत्तेचा दुरुपयोग सगळ्यांनाच दिसतो आहे...सोलापूर : ‘‘निवडणुकी आधी मला ईडीची नोटीस पाठवली,...
बुलडाण्यात खरीप हंगामात ९५० कोटी...बुलडाणा : अतिवृष्टी, पूर परिस्थितीने यंदाच्या...
साडेचार हजार रुपयांचा पहिला हप्ता उसाला...कुडित्रे, जि. कोल्हापूर : यंदा उसाला उत्पादन...
वादळी पावसामुळे ऊस उत्पादकांचे लाखोंचे...आर्णी, जि. यवतमाळ : संततार पाऊस, वादळाचा...
सांगली जिल्ह्यात रब्बीच्या पेरण्या सुरू सांगली : जिल्ह्यात रब्बी हंगामातील पेरण्यांना...
पुणे बाजार समिती सेस प्रवेशद्वारावर ...पुणे : गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समिती सह...
आंबा, काजू विमा परतावा मंडलनिहाय जाहीर सिंधुदुर्गनगरी : फळपीक विमा योजनेचा परतावा...
कंबोडियाची शाही नांगरणीशेती व्यवसायावर भर देणाऱ्या कंबोडियामध्ये...
कोरडवाहूमध्ये चिंचेची वनशेतीऔषधी गुणांमुळे चिंचेला भारतीय खजूर असे म्हणतात....
छापेमारीच्या हेतूबाबत आयकर विभागच सांगू...मुंबई ः राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांशी...
मराठवाड्यातील २३१ मंडलांत पाऊसपरभणी ः मराठवाड्यातील २३१ मंडलांत बुधवारी (ता. ६...
पुणे जिल्हा बँकेतर्फे रब्बी पीककर्ज...पुणे : खरीप हंगामात सप्टेंबरमध्ये चांगला पाऊस...
रत्नागिरी : आंबा, काजू विमा परतावा ५३...रत्नागिरी ः वातावरणातील बदलामुळे नुकसान झालेल्या...
शेतकऱ्यांची वीज कापली; लोकप्रतिनिधी...जळगाव ः जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत...
आंबा प्रक्रिया उद्योग उभारण्यासाठी...रत्नागिरी ः पंतप्रधान सूक्ष्म अन्नप्रक्रिया...
सोलापूर जिल्हा परिषद अध्यक्षांवर...सोलापूर : नराळे (ता. सांगोला) येथील आरोग्य...