परभणी जिल्ह्यात ‘पोकरां’तर्गत साडेसात हजारांवर प्रस्ताव प्रलंबित

proposals under 'pokera' are pending for seven and a half thousand  In Parbhani district
proposals under 'pokera' are pending for seven and a half thousand In Parbhani district

परभणी : ‘‘नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पा(पोकरा) अंतर्गतच्या कामांवर कृषी सहायकांच्या बहिष्कारामुळे शेतकऱ्यांचे ७ हजार ८५७ प्रस्ताव प्रलंबित आहेत.

जिल्ह्यातील २ हजार २१ शेतकऱ्यांना वैयक्तिक लाभाअंतर्गत विविध घटकांसाठी ४ कोटी २३ लाख १४ हजार ६५२ रुपये अनुदान वितरित करण्यात आले. या प्रकल्पांतर्गत १४ हजार ५८५ हेक्टरवरील मृदा व जलसंधारणाच्या ७१४ कामांचा २६ कोटी ९२ लाखाचा आराखडा तयार करण्यात आला आहे,’’ अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.

हवामान अनुकूल कृषी पद्धती नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत तीन टप्प्यांत जिल्ह्यातील २४६ ग्रामपंचायतीअंतर्गत २७५ गावांची निवड करण्यात आली. पहिल्या टप्प्यात ७६ आणि दुसऱ्या टप्प्यात १२७ ग्रामपंचायतीअंतर्गत ग्राम कृषी संजीवनी समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत.

या प्रकल्पांतर्गत हवामान अनुकूल कृषी पद्धती, यांत्रिकीकरण, आधुनिक शेती तंत्रज्ञानाची प्रात्यक्षिके, फळबाग लागवड, वृक्ष लागवड, क्षारपाड व चोपण जमिनीचे व्यवस्थापन, एकात्मिक शेती पद्धती, संरक्षित शेती, जमीन आरोग्य सुधारणा, बियाणेपुरवठा शृंखलांची कामगिरी वाढविणे, बियाणे हबसाठी पायाभूत सुविधांचा विकास, पाण्याचा कार्यक्षम वापर आदी घटक आणि उपघटकांचा समावेश आहे. त्यांच्या लाभासाठी शेतकऱ्यांनी एकूण ६५ हजार ९३२ अर्ज सादर केले.

ग्रामकृषी संजीवनी समित्यांनी ९ हजार ८७८ अर्जांना मंजुरी दिली. परंतु, दरम्यानच्या काळात कृषी सहायकांनी पोकराच्या कामांवर बहिष्कार टाकला होता. त्यामुळे विविध स्तरांवर शेतकऱ्यांचे  अर्ज ७ हजार ८५७ प्रस्ताव प्रलंबित आहेत.

फळबाग लागवडीसाठी ४३ लाभार्थ्यांना १४ लाख ३४ हजार १४५ रुपये, शेततळ्यांसाठी ३८ शेतकऱ्यांना १ कोटी २८ लाख ५३ हजार ८६५ रुपये, अस्तरीकरणासाठी २ शेतकऱ्यांना १ लाख ८३ हजार ३५८ रुपये, ठिबक संचासाठी ६३ शेतकऱ्यांना ३७ लाख ५ हजार २१९ रुपये, तुषार संचासाठी १२३ शेतकऱ्यांना १८ लाख ९६ हजार ३६१ रुपये, विजेवर चालणाऱ्या कृषिपंपासाठी ४०८ शेतकऱ्यांना ५० लाख ९० हजार १४८ रुपये, डिझेल पंपासाठी ४५ शेतकऱ्यांना ६ लाख ४ हजार ४४४ रुपये, पाइपलाइनसाठी ६६ शेतकऱ्यांना १ कोटी १२ लाख २८ हजार १८५ रुपये, बीजोत्पादनासाठी ६३ शेतकऱ्यांना ५३ लाख १ हजार १२७ रुपये अनुदान वितरित करण्यात आले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com