agriculture news in marathi, Proposed hectare production of 12 quintals of rabi jawar | Agrowon

रब्बीत ज्वारीचे १२ क्‍विंटलपर्यंत हेक्‍टरी उत्पादन प्रस्तावित
टीम अॅग्रोवन
बुधवार, 26 सप्टेंबर 2018

औरंगाबाद : पावसाअभावी खरीप जवळपास हातचा गेल्यात जमा असलेल्या मराठवाड्यात यंदा जवळपास १९ लाख हेक्‍टरवर रब्बीचे क्षेत्र प्रस्तावित करण्यात आले आहे. अर्थात पाऊस येण्यावरच सारे गणित अवलंबून आहे. मात्र, कृषी विभागाने केलेल्या नियोजनात यंदाच्या प्रस्तावित रब्बी क्षेत्रातून ज्वारीचे १०.३६ ते १२ क्‍विंटलपर्यंत हेक्‍टरी उत्पादन प्रस्तावित करण्यात आले आहे.

औरंगाबाद : पावसाअभावी खरीप जवळपास हातचा गेल्यात जमा असलेल्या मराठवाड्यात यंदा जवळपास १९ लाख हेक्‍टरवर रब्बीचे क्षेत्र प्रस्तावित करण्यात आले आहे. अर्थात पाऊस येण्यावरच सारे गणित अवलंबून आहे. मात्र, कृषी विभागाने केलेल्या नियोजनात यंदाच्या प्रस्तावित रब्बी क्षेत्रातून ज्वारीचे १०.३६ ते १२ क्‍विंटलपर्यंत हेक्‍टरी उत्पादन प्रस्तावित करण्यात आले आहे.

नुकत्याच पार पडलेल्या विभागीय कृषी संशोधन व सल्लागार समितीच्या बैठकीत सविस्तर माहिती  देण्यात आली. कृषीच्या औरंगाबाद, जालना व बीड या तीन जिल्ह्यांत रब्बीत प्रामुख्याने ज्वारी, गहू, मका व हरभरा आदी पिके घेतली जातात. शिवाय लातूर, उस्मानाबाद, हिंगोली, परभणी व नांदेड या पाच जिल्ह्यांंत ज्वारी, गहू, मका, हरभरा, तीळ, करडई, जवस, सूर्यफूल आदी पिके घेतली जातात.

साडेतीन लाख क्‍विंटल बियाण्यांची मागणी
मराठवाड्यातील औरंगाबाद व लातूर कृषी विभागाकडून यंदाच्या रब्बी हंगामासाठी ३ लाख ५० हजार क्‍विंटल विविध प्रकारच्या बियाण्यांची मागणी नोंदविण्यात आली आहे. त्यामध्ये लातूर कृषी विभागांतर्गत पाच जिल्ह्यांसाठी २ लाख ४४ हजार क्‍विंटल तर औरंगाबाद विभागांतर्गत तीन जिल्ह्यांसाठी १ लाख ६ हजार क्‍विंटल बियाण्यांचा समावेश आहे.

पीकनिहाय प्रस्तावित उत्पादकता (हेक्‍टरी) क्‍विंटलमध्ये
पीक लातूर विभाग औरंगाबाद विभाग
ज्वारी १२ १०.३६
गहू १६.०८ १६.०८
मका १४.८१ ३७.०८
हरभरा ११.८५ १२.३९
करडई ८.५० ०००
जवस ३.१० ०००
सूर्यफूल ७.५५ ०००

 

इतर बातम्या
ईशान्यकडील राज्ये का नाकारतात...कोल्हापूर : वाहतूक खर्चामुळे महाग पडत असल्याने...
नगर : नुकसान भरपाईसाठी एकशे पस्तीस...नगर : जिल्ह्यात ऑक्टोबर ते नोव्हेंबर या...
जळगाव जिल्ह्यात 'येथे' सुरु झाली...जळगाव ः खानदेशात भारतीय कापूस महामंडळाने (...
केंद्रीय पथक आज करणार पीकहानीची पाहणीपुणे ः मॉन्सूनोत्तर पावसामुळे राज्यात शेतीच्या...
‘दाणेदार’ खताच्या मागे ‘मालदार’ हालचालीपुणे : राज्यात १९७० ते २००० या तीन दशकांमध्ये...
योजना, निधीची कमी नाही, मग शेतीचे प्रश्...औरंगाबाद : योजना, निधी, यंत्रणा, सुविधा,...
धक्कादाय ! चक्क दाताखाली दाणे ठेवत...उमरखेड, यवतमाळ : मॉन्सूनोत्तर पावसाच्या...
कोकण, मध्य महाराष्ट्रात गारठा कमीपुणे: विदर्भ, मराठवाड्यात तापमान कमी झाल्याने...
शेतकऱ्यांचे ३० कोटी परत करा; पुण्यात...पुणे: पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमधील डाळिंब...
'या' बाजार समितीत शेतकऱ्यांना अल्प दरात...अकोला : सध्या कोणत्याही शासकीय योजनेचा फायदा...
जळगाव जिल्ह्यात सर्वच नुकसानग्रस्तांना...जळगाव : अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना...
केंद्रीय पथक आज मराठवाड्यात पीक...औरंगाबाद : मराठवाड्यात ऑक्‍टोबर-...
फळबागांची लागवड खोळंबण्यास ‘तो’ ठरला...पुणे : मागील दोन ते तीन महिन्यांत जोरदार पाऊस...
सांगलीत बेदाणा लिलावास प्रारंभसांगली : दिवाळीच्या महिन्याच्या सुटीनंतर बाजार...
अमरावती जिल्ह्याला २४ टक्‍के...अमरावती : मॉन्सूनोत्तर पावसाचा जिल्ह्यात ८० टक्‍...
परभणी विभागात २८ हजार क्विंटल...परभणी : महाबीजच्या परभणी विभागातील सहा...
हमीभावासाठी 'सीसीआय'ला द्या कापूस : ॲड...वर्धा : ‘‘शेतकऱ्यांनी आधारभूत किमतीपेक्षा कमी...
जळगाव जिल्हा परिषदेत निधीवाटपावरून आरोप...जळगाव : जिल्हा परिषद सेस फंड, शिक्षण, महिला-...
वऱ्हाडला पीक नुकसानभरपाईचा २६५ कोटींचा...अकोला : ऑक्टोबरमध्ये झालेल्या अतिपावसाचा फटका...
पुणे विभागात रब्बीसाठी अडीच लाख टन खते...पुणे : रब्बी हंगामात शेतकऱ्यांना खतांची अडचण येऊ...