जालना जिल्ह्यात खरीप पेरणी पावणेसहा लाख हेक्टरवर प्रस्तावित

जालना : येत्या खरीप हंगामात जिल्ह्यात ५९१२९३ हेक्टरवर पेरणी प्रस्तावित आहे. त्यासंबंधीचा आढावा नुकताच राज्याचे आरोग्यमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांच्या उपस्थितीत घेण्यात आला.
Proposed kharif sowing on 5. 90 lakh hectares in Jalna district
Proposed kharif sowing on 5. 90 lakh hectares in Jalna district

जालना : येत्या खरीप हंगामात जिल्ह्यात ५९१२९३ हेक्टरवर पेरणी प्रस्तावित आहे. त्यासंबंधीचा आढावा नुकताच राज्याचे आरोग्यमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांच्या उपस्थितीत घेण्यात आला. 

जिल्ह्यात खरिपाचे सरासरी पेरणी क्षेत्र ५ लाख ६९ हजार २६० हेक्टर आहे. २०१९ च्या खरीप हंगामात ६ लाख १ हजार ४३१ हेक्‍टरवर खरिपाची पेरणी झाली होती. येत्या खरीप हंगामात सर्वाधिक २ लाख ७६ हजार १०० हेक्‍टरवर कपाशीची, ९५ हजार ८६१ हेक्‍टरवर सोयाबीनची, ६० हजार ४०३ हेक्‍टरवर मक्याची, ४६ हजार ८८ हेक्‍टरवर तुरीची, तर उर्वरित क्षेत्रावर इतर पिकांची पेरणी अपेक्षित आहे. 

कपाशीसाठी १२ लाख ७९ हजार ७५० बियाण्यांची पाकिटांची गरज भासेल. विविध कंपन्यांद्वारे १३ लाख ८५ हजार ९४६ कपाशी बियाणे पाकिटे उपलब्ध होणे अपेक्षित आहे. सोयाबीनसाठी २६ हजार ४७१ क्विंटल बियाण्यांची गरज असेल. महाबीजसह इतर कंपन्यांद्वारे २६ हजार ७७२ क्विंटल बियाणे, तुरीसाठी १७७८ क्विंटल बियाणे अपेक्षित आहे. मक्यासाठी ८२०८ क्विंटल बियाणे लागेल. मक्याचे ८२०९ क्विंटल बियाणे विविध स्रोतातून आणण्याचेकृषी विभागाचे नियोजन आहे. 

सद्यःस्थितीत जिल्ह्यात मार्चअखेर शिल्लक ४८ हजार ९३६ मेट्रिक टन, नव्याने आलेले २३९०० मेट्रिक टन खत विचारात घेता ७२ हजार ८३६ मेट्रिक टन रासायनिक खत उपलब्ध आहे. खरीप २०१९ मध्ये २ लाख १८ हजार २४८ मेट्रिक टन रासायनिक खतांचा पुरवठा झाला. तर, यंदासाठी १ लाख ६५ हजार १९० मेट्रिक टन खताचे आवंटन जिल्ह्यासाठी मंजूर आहे. 

घरचे बियाणे वापरा 

शेतकऱ्यांना सोयाबीनचे घरचे बियाणे वापरावे, यासाठी कृषी विभागाने मोहीम हाती घेतली आहे. शेतकऱ्यांनी घरातील बियाण्यांची उगवण क्षमता तपासून बीजप्रक्रिया करावी. ते बियाणे पेरणीसाठी वापरावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब शिंदे यांनी केले. 

११२० कोटींच्या कृषी पतपुरवठ्याचे उद्दिष्ट 

२०१९ - २० च्या खरीप हंगामात जिल्ह्यासाठी १५०० कोटींचे कृषी पतपुरवठ्याचे उद्दिष्ट विविध बँकांना देण्यात आले. त्या तुलनेत ५६३ कोटी २३ लाख रुपयांच्या उद्दिष्टांची पूर्ती बँकांनी केली. यंदा मात्र विविध बँकांना ११२० कोटींचे पतपुरवठ्याचे उद्दिष्ट दिले आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com