कीटकनाशक सुधारणा विधेयकात विक्रेत्यांचे हित जपा : माफदा

Protect vendors' interest in pesticide reform bill
Protect vendors' interest in pesticide reform bill

औरंगाबाद : कीटकनाशक सुधारणा विधेयक २०१८ मध्ये राज्यातील विक्रेत्यांवर अन्याय होऊ नये यासाठी दहा बाबींकडे महाराष्ट्र फर्टिलायझर्स पेस्टीसाईड्‌स सीड्‌स डीलर्स असोसिएशन(माफदा)ने लोकप्रतिनिधींचे लक्ष वेधले आहे. यासाठी लोकप्रतिनिधींना निवदेन देण्याची मोहीम हाती घेण्यात आल्याची माहिती माफदाचे अध्यक्ष जगन्नाथ काळे यांनी दिली. 

औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांना या संदर्भात नुकतेच माफदाच्या वतीने निवेदन सादर करण्यात आले. या वेळी माफदाचे अध्यक्ष जगन्नाथ काळे, सचिव विपिन कासलीवाल यांच्यासह माफदाचे पदाधिकारी व सदस्यांची उपस्थिती होती. केंद्र शासनाकडून कीटकनाशक औषधे सुधारित नियमावली तयार करण्यात आली आहे. त्यासाठीचे कीटकनाशक सुधारणा विधेयक संसदेच्या चालू अधिवेशनामध्ये पटलावर मान्यतेसाठी प्रस्तावित आहे. या विधेयकातील तरतुदी कीटकनाशक औषधांची विक्री करणाऱ्या विक्रेत्यांसाठी अडचणी निर्माण करणाऱ्या आहेत. 

अशा आहेत मागण्या 

  • शैक्षणिक अर्हतेबाबत विधेयक मंजूर होईपर्यंतच्या व सध्या परवानाधारक असलेल्यांना सुट मिळावी. 
  • तपासणीसाठीचा नमूना अप्रमाणीत झाल्यास विक्रेत्याचा परवाना निलंबीत न करता संबंधीत मालाच्या बॅच नंबरचे कीटकनाशक विक्रीसाठी प्रतिबंधीत करावे. 
  • कोणतेही कीटकनाशक अप्रमाणीत झाल्यास शिक्षा अथवा दंड होण्याची तरतूद विक्रेत्यांसाठी अन्यायकारक
  • कीटकनाशक उपयुक्‍त न झाल्यास वा त्याचा विपरीत परिणाम झाल्यास याविषयीच्या जबाबदारीतून घाऊक अथवा किरकोळ विक्रेता हा शब्द रद्द करावा. 
  • अर्ज केल्यापासून महिनाभरात परवाना मिळण्याची सोय करावी
  • परवाना अधिकाऱ्यांनी दिलेल्या निर्णयावर अपिलाचा निर्णय देण्याचा कालावधी कमी करावा
  • अप्रमाणीत कीटकनाशके विक्री झाल्यास उत्पादक कंपनीने खरेदीदारांना ती रक्‍कम शेतकऱ्यांना अदा करण्याची तरतूद असावी
  • कीटकनाशक औषधे विक्री परवानाधारकास कोणत्याही कंपनीचे कोणतेही उत्पादन विक्री करण्यासाठी परवानगी घेण्यास सुट मिळावी. दरवर्षी प्रीन्सीपल सर्टीफीकेट परवान्यासोबत जोडणे बंधनकारक नियम थांबवावा. 
  • हस्तलिखीत पद्धतीने ऐवजी संगणकीय पद्धतीने स्टॉक रजीस्टर ठेवण्यास मान्यता द्यावी.
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com