Agriculture news in marathi Protection of milk by law ‘White Revolution Struggle’ to give | Agrowon

दुधाला कायद्याने संरक्षण देण्यासाठी ‘धवलक्रांती संघर्ष’

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 22 जून 2021

रविवारी (ता. २७) शेतकऱ्यांनी शहरांकडे जाणारा दूध पुरवठा बंद करावा. संकलन केंद्रात दूध देऊ नका, असे आवाहन ‘फोरम ऑफ इंटलेकच्युअल्स’चे अध्यक्ष सतीश देशमुख यांनी केले.  

पुणे : शेतकऱ्यांकडून दूध खरेदी करताना गाईच्या दुधासाठी ४३ रुपये प्रती लिटर व म्हशीच्या दुधासाठी ६२ रुपये प्रती लिटर दर जाहीर करा. त्याला कायद्याचे संरक्षण देण्यासाठी धवलक्रांती संघर्ष करण्याची गरज आहे. येत्या रविवारी (ता. २७) शेतकऱ्यांनी शहरांकडे जाणारा दूध पुरवठा बंद करावा. संकलन केंद्रात दूध देऊ नका, असे आवाहन ‘फोरम ऑफ इंटलेकच्युअल्स’चे अध्यक्ष सतीश देशमुख यांनी केले.  

 देशमुख म्हणाले, ‘‘आपल्या परिश्रमाने दुधाचा महापूर आणून, भारताला दुग्ध उत्पादनामध्ये, गेली वीस वर्षापासून, जगामध्ये प्रथम क्रमांकावर नेऊन ठेवलेल्या शेतकऱ्यांच्या हातात काय आले, हा प्रश्न अनुत्तरीत आहे. त्यामुळे श्वेतक्रांती का नासली, हा मुद्दा महत्वाचा आहे. महाराष्ट्रात दूध उत्पादकांची वर्षाला १४,६९१ कोटी रुपयांची लूट होत आहे.

या समस्येवर कायमस्वरूपी धोरण ठरविण्याऐवजी, अतिरिक्त दुधाचा कांगावा करून, पुन्हा एकदा दूध संघांच्या घशात दुधाच्या भुकटीचे अनुदान घालण्याचा शासन विचार करीत आहे. दुधाला एफआरपी द्यावी, अशी मागणी आहे. त्यामुळे सरकारचे या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी, दूध संघाच्या संघटित लुटीचा निषेध करण्यासाठी, दूध उत्पादकांना न्याय मिळण्यासाठी शहरांचा दूध पुरवठा बंद करावा.’’ 
या आहेत मागण्या

  •   ताज्या खर्चावर आधारित १५ टक्के नफा धरून दुधाला एफआरपी द्या
  •   दुध भेसळ माफियांवर भरारी पथक व्हॅनसकडून तपासणी करून कडक कारवाई करा
  •   दूध उत्पादनाचा अद्ययावत खर्च काढण्यासाठी चार कृषी विद्यापीठे व एका खासगी संस्थेला निर्देश द्या
  •   दुधाची फॅट मोजणीतील लूट थांबविण्यासाठी यंत्राच्या अचूकतेच्या तपासणीसाठी निरीक्षकांची नियुक्ती करा
  •   ग्राहकांसाठी गाईच्या दुधासाठी किमान विक्री किंमत ५४ रुपये प्रती लिटर निर्धारित करा

इतर बातम्या
७२ तासांची सक्ती नको ः आयुक्तपुणे ः विमा कंपन्यांनी कामकाजात तातडीने सुधारणा...
पीकविमा योजनेच्या मूळ उद्देशालाच हरताळपुणे ः पंतप्रधान पीकविमा योजनेच्या माध्यमातून...
अखेर ‘इफ्को टोकियो’ विरोधात गुन्हा दाखलअमरावती : राज्य शासनाने केलेल्या करारानुसार इफ्को...
पळवाटांमुळे पीकविमा भरपाई दुरापास्तशेतकऱ्यांकडून पीकविम्याचा हप्ता भरतेवेळी...
अमरावतीतील २३ हजार हेक्टर शेती बाधित अमरावती : संततधार पावसाने जिल्ह्यातील ५०० गावे...
विमा कंपन्यांबाबत सरकारची बोटचेपी भूमिकापीकविमा योजनेमुळे शेतकऱ्यांऐवजी पीकविमा कंपन्याच...
खामगाव बाजार समितीच्या  कारभाराविरुद्ध...बुलडाणा : खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
केंद्र स्थापन करणार शेतकरी उत्पादक... नवी दिल्ली ः केंद्र सरकारने देशात सुमारे...
सांगलीत ४१ हजार हेक्टरवरील पिके...सांगली : गेल्या आठवड्यात झालेल्या पाऊस,...
धरणांतील पाण्याच्या विसर्गात घटपुणे : राज्यात पावसाचा जोर ओसरू लागल्याने धरणांत...
पुण्यात पंचनामे गतीने सुरूपुणे : जिल्ह्यात नुकसानीचे पंचनामे करण्यास वेग...
परभणी ः मूग, उडदाच्या पीक स्पर्धेसाठी...परभणी ः कृषी विभागातर्फे खरीप हंगामापासून...
रत्नागिरी ‘झेडपी’चे  ८० कोटींचे नुकसान रत्नागिरी : अतिवृष्टीने चिपळूण, खेड, संगमेश्वरसह...
सांगोल्यातील रोगग्रस्त डाळिंब बागांची...सांगोला, जि. सोलापूर : वातावरणात होणारे बदल आणि...
पशुसंवर्धन विकासासाठी पशुपालक,...नाशिक : ‘‘आत्मनिर्भर भारत अंतर्गत २०२०-२१...
खानदेशात भिज पाऊसजळगाव : खानदेशात गेले दोन दिवस अनेक भागात हलका ते...
पशुचिकित्साकांच्या कामबंद  आंदोलनाचा...रिसोड, जि. वाशीम : पशुचिकित्सा व्यावसायिकांनी १६...
हिंगोलीत विमा कंपनीचा अनागोंदी कारभारहिंगोली ः जिल्ह्यात पंतप्रधान पीकविमा योजना...
नाशिक विभागात मिळाल्या १६३१ भूमिहीनांना...नाशिक : कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व...
नुकसानभरपाईपोटी मिळाले २७० रुपयेपाचोरा, जि. जळगाव : खडकदेवळा (ता. पाचोरा) येथील...