Agriculture news in marathi Protesting farmers enter Delhi | Page 2 ||| Agrowon

आंदोलक शेतकरी दिल्लीत दाखल

टीम अॅग्रोवन
शनिवार, 28 नोव्हेंबर 2020

दिल्लीत प्रवेश करण्यास मजाव केल्यामुळे शेतकरी संतप्त झाले होते. अखेर शुक्रवारी (ता. २७) दुपारी पोलिसांनी आंदोलकांना दिल्लीच्या बुराडी भागातील मोकळ्या जमिनीवर एकत्र येण्यास आणि शांततामय रीतीने निदर्शने करण्यास परवानगी देण्यात आली.

चंडीगड/ नवी दिल्ली  : केंद्राच्या कृषी कायद्यांचा विरोध करीत पंजाबमधील आंदोलक शेतकरी राजधानी दिल्लीच्या सीमेवर धडकल्यामुळे मोठा तणाव निर्माण झाला होता. दिल्लीत प्रवेश करण्यास मजाव केल्यामुळे शेतकरी संतप्त झाले होते. अखेर शुक्रवारी (ता. २७) दुपारी पोलिसांनी आंदोलकांना दिल्लीच्या बुराडी भागातील मोकळ्या जमिनीवर एकत्र येण्यास आणि शांततामय रीतीने निदर्शने करण्यास परवानगी देण्यात आली. त्यामुळे तणाव काही प्रमाणात निवळला आहे. 

दरम्यान, बुराडी येथे शेतकरी टॅक्टरसह अन्य वाहनांनी एकत्र येत आहेत. शेतकऱ्यांचे चक्काजाम आंदोलन बंद झाल्यामुळे दिल्ली-हरिद्वार महामार्ग सुरू करण्यात आला आहे. दिल्लीत शेतकरी आंदोलन अधिक व्यापक होण्याची शक्यता आहे. शनिवारी (ता.२८) उत्तर प्रदेशातील शेतकरी दिल्लीत दाखल होण्याची शक्यता आहे. 

पहाटे दिल्लीच्या सीमेवर धडकले 
शेतकरी आंदोलन शुक्रवारही (ता. २७) सुरूच राहिले. रात्रभर ठिय्या मारून बसलेले शेतकरी शुक्रवारी पहाटे पुन्हा घोषणा देत हरियाना-दिल्लीच्या सीमेवरील सिंघुु आणि टिकरी येथे धडकले. सीमेवर तैनात पोलिसांनी त्यांना अडविले. शेतकऱ्यांना पांगविण्यासाठी पोलिसांनी अश्रू धुरांची नळकांडी फोडली. पंजाबमधील शेतकऱ्यांचा आणखी एक गट बहादूरगड येथे पोहोचला होता. दिल्लीच्या फरिदाबाद आणि गुडगावच्या सीमेवरही पोलिस तैनात करण्यात आले आहेत.

‘अश्रू धुरानी स्वागत’
पंजाबमधील फतेहगड साहिब येथील शेतकरी सिंहु सीमेवर पोहचले. ते म्हणाले, ‘आम्ही दिल्लीत प्रवेश करू. आमच्या या आंदोलनाचे स्वागत दिल्ली पोलिसांनी अश्रू धुराची नळकांडी फोडून केले.’ शेतकऱ्यांवरील कारवाईचा निषेध काँग्रेस नेते राहुल गांधी, प्रियांका गांधी, माकपचे सरचिटणीस सीताराम येचुरी, दिल्लीचे मुख्यमंत्री  केजरीवाल यांनी केला आहे.

योगेंद्र यादव यांना अटक 
शेतकरी संघटनांनी दावा केला आहे की, शुक्रवारी (ता. २७) रात्रीपर्यंत सुमारे पन्नास हजार शेतकरी आंदोलनात सहभागी होतील. ‘स्वराज इंडिया’चे अध्यक्ष योगेंद्र यादव यांच्यासह पन्नास शेतकऱ्यांना गुरुग्राम पोलिसांनी अटक केली आहे. यादव शेतकऱ्यांसह हरियानातून दिल्लीकडे निघाले होते. दिल्ली पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून दिल्लीतील नऊ स्टेडियमचे तात्पुरत्या तुरुंगात रूपांतर करण्याची परवानगी मागितली होती. मात्र ही मागणी फेटाळून लावली आहे.


इतर ताज्या घडामोडी
देवना साठवण तलावाचा प्रलंबित प्रश्न...नाशिक : येवला तालुक्यातील अवर्षणप्रवण उत्तरपूर्व...
‘बर्ड फ्लू’ रोखण्यासाठी ९० दिवस...परभणी ः जिल्ह्यात बर्ड फ्लूचा प्रसार आणि संसर्ग...
अतिवृष्टीचा मदत आठवड्यात मिळणारसोलापूर : गेल्यावर्षी ऑक्टोबर महिन्यात झालेल्या...
महावितरणच्या आदेशामुळे वीज ग्राहक...सोलापूर : कोरोनाच्या साथीमुळे घटलेले आर्थिक...
भंडारा जळीत प्रकरणाचा अहवाल शासनाकडे नागपूर : भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयातील शिशू...
उन्हाळी सोयाबीन लागवडीस गतीअकोला : यंदाच्या खरीप सोयाबीन काढणीच्या वेळेस...
वारणेत उभारणार पशुवैद्यकीय महाविद्यालय...वारणानगर, जि. कोल्हापूर : येथील वारणा सहकारी...
बेदाणा पॅकिंगसाठीच्या बॉक्सच्या दरात...सांगली ः बेदाणा, डाळिंबासह अन्य फळभाज्यांच्या...
यवतमाळ : पोल्ट्रीत चार हजार कोंबड्यांचा...यवतमाळ : कोरोनाच्या संकटातून सावरू पाहणाऱ्या...
रिसोडमध्ये कांदा बीजोत्पादनाकडे कल रिसोड, जि. वाशीम : तालुक्यात यंदा कांदा...
औरंगाबादेत सर्वच पक्षांकडून गुलालाची...औरंगाबाद : मतदानाची प्रक्रिया शांततेत पार...
पुणे जिल्ह्यात संमिश्र निकाल; दावे-...पुणे ः जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये...
साताऱ्यात स्थानिक आघाड्यांचा जल्लोषसातारा ः दोन दिवसांपूर्वी मतदान झाले. गेले दोन...
नांदेड जिल्ह्यात प्रस्थापितांनी सत्ता...नांदेड : नांदेड जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीचे...
नाशिक जिल्ह्यात प्रस्थापितांना धक्कानाशिक : जिल्ह्यात एकूण ६२१ ग्रामपंचायतीच्या...
माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या...यवतमाळ : माजी मुख्यमंत्री व जलक्रांतीचे प्रणेते...
परभणी जिल्ह्यात संमिश्र यशपरभणी ः परभणी जिल्ह्यातील मतदान झालेल्या ४९८...
भाजपचे ४४, शिवसेनेचे २२ ग्रामपंचायतीवर...सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यातील ७० ग्रामपंचायतीपैकी...
नागपुरात संत्रा दरात तेजीनागपूर ः आंबिया बहाराचा हंगाम अंतिम टप्प्यात...
सांगलीत भाजपला धक्का;  महाविकास आघाडीला...सांगली : ग्रामपंचायतींच्या निवडणूक निकालात...