Agriculture news in marathi Protests in the Nagar, Holi of Bill in Akole | Agrowon

नगरला निदर्शने, अकोलेत विधेयकांची होळी

टीम अॅग्रोवन
शनिवार, 26 सप्टेंबर 2020

नगर : केंद्र सरकारने मंजूर केलेल्या तीन शेतकरी विधेयकांना कडाडून विरोध करून शुक्रवारी (ता.२५) नगर येथे निदर्शने करण्यात आली.

नगर : केंद्र सरकारने मंजूर केलेल्या तीन शेतकरी विधेयकांना कडाडून विरोध करून शुक्रवारी (ता.२५) नगर येथे निदर्शने करण्यात आली. अकोले येथे विविध संघटनांनी विधेयकांच्या प्रतीची होळी करून मोदी सरकारच्या भूमिकेचा निषेध करण्यात आला. सरकार शेतकरी, कामगारांच्या भावनांशी खेळत आहे. त्याची किंमत त्यांना मोजावी लागेल, असा इशारा किसान सभेचे सरचीटणीस डॉ. अजित नवले यांनी दिला. 

‘‘केंद्र सरकारने मंजूर केलेली विधेयके ही शेतकरी विरोधी आहेत. त्याला विरोध करण्यासाठी अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीने बंद पुकारला होता. नगर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करुन निदर्शने करण्यात आली. ‘रास्ता रोको’ करण्याचा प्रयत्न करणाऱ्या कार्यकत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. भारतीय कम्युनिष्ट पक्षाचे नेते अॅड. सुभाष लांडे, बन्सी सातपुते, भारती न्यालपेल्ली, बहिरनाथ वाकळे, अंबादास दौंड, तुषार सोनवणे, चंद्रकांत माळी, संतोष गायकवाड, दिपक सिरसाठ, सतिश निमसे, कार्तिक पासलकर, सतीश पवार, विजय केदारे आदीसह कार्यकर्ते सहभागी झाले होते. 

अकोले येथे अखिल भारतीय किसान सभा (माकप व भाकप), राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेना, छात्रभारती, युवा स्वाभिमान, स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी तहसिल कार्यालयावर मोर्चा काढून निदर्शेने केली. विधेयकांचीही होळी केली. शहरात मानवी साखळी करून विधेयकांचा निषेध करण्यात आला. 

डॉ. नवले, आमदार किरण लहामटे, हेरंब कुलकर्णी, विनय सावंत, शांताराम वाळुंज, कारभारी उगले, सदाशीव साबळे, नामदेव भांगरे, महेश नवले, सुरेश नवले, संपत नाईकवाडी, एकनाथ मेंगाळ, साहेबराव घोडे, चंद्रकांत नेहे, मच्छिंद्र धुमाळ, विनय धांडे आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते. सरकार शेतकरी, कष्टकरी कामगार यांच्या विरोधी निर्णय घेत भावनांशी खेळत आहे. सरकारने जनविरोधी भूमिका घेतली, तर त्याची किंमत मोजावी लागेल, असा इशारा नवले यांनी यावेळी दिला.


इतर ताज्या घडामोडी
गिरणा, हतनूरमधून मिळणार रब्बीसाठी...जळगाव ः जिल्ह्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या गिरणा...
खानदेशात कांदा लागवडीवर परिणाम होणारजळगाव ः खानदेशात उन्हाळ किंवा रब्बी हंगामातील...
उत्पादन घटल्याने झेंडूच्‍या फुलांनी...नाशिक : दसरा सणाच्या पार्श्वभूमीवर झेंडू फुलांना...
महाबीजच्या सौर ऊर्जाचलित गोदामाचे...अकोला ः महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाद्वारे...
बॅलन्सशीट डोळ्यांसमोर ठेवून दिवाळी...माळेगाव, जि. पुणे ः माळेगाव कारखाना प्रशासनाने...
कृषी अधिकाऱ्यांनी मुख्यालय सोडू नये ः...अमरावती : मोर्शी तालुक्‍यात जून ते ऑगस्ट या...
नांदेडमधील शेतकऱ्यांचा अतिवृष्टीने...नांदेड : जिल्ह्यात यंदा सप्टेंबर महिन्यात...
नगरमध्ये कापसाची व्यापाऱ्यांकडून अल्प...नगर ः कापसाला पाच हजार आठशे पन्नास रुपयांचा हमीदर...
गुलटेकडी येथे ‘तोलणारां’चे धरणे आंदोलनपुणे ः गुलटेकडी येथील बाजार समितीमधील भुसार...
नाशिकमध्ये वालपापडी, घेवड्याची आवक वाढलीनाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
मराठवाड्यातील उपयुक्त पाणीसाठा ९३...औरंगाबाद : मराठवाड्यातील ८७६ लघू-मध्यम, मोठ्या...
पंतप्रधानांनी घेतली ‘जय सरदार’ची दखल बुलडाणा ः शेतकऱ्यांकडून मका खरेदी केल्यानंतर...
कोल्हापुरात दसरा सोहळा साध्या पध्दतीने...कोल्हापूर ः कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर यंदाचा दसरा...
हिंमत असेल तर सरकार पाडून दाखवाः उद्धव...मुंबई: राज्यातील आघाडी सरकार पाडण्यासाठी नेहमी...
डाळिंब फळबागेचे हंगामनिहाय नियोजनतेलकट डागासाठी, पिठ्या ढेकूण किंवा बागेतील...
सूक्ष्म सिंचन पद्धतीवर कांदा लागवडकांदा सिंचनासाठी सूक्ष्म सिंचन पद्धतीचा वापर...
सोलापुरात घेवडा, वांग्याचे दर पुन्हा...सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
नगरमध्ये गवार, वांग्याच्या दरात तेजीनगर ः नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न...
इगतपुरी, सिन्नर तालुक्यात पावसामुळे...नाशिक : दसरा व दिवाळी सणाची बाजारपेठ समोर ठेऊन...
सांगली जिल्ह्यात अतिवृष्टीचा १७ हजार...सांगली : जिल्ह्यात गेल्या पंधरा दिवसांपूर्वी...