agriculture news in marathi, provid three percent prompt repayment incentive to farmers uptil 31may2020 : Government instruct Nabard | Agrowon

कर्जापोटी दंडव्याज नको; केंद्राकडून नाबार्डला सूचना

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 2 एप्रिल 2020

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना शेती कर्जापोटी दंडव्याज आकारू नये, तसेच नवे अल्पमुदत कर्ज वेळेत वाटप करण्याची दक्षता घ्यावी, असे केंद्रीय कृषी मंत्रालयाने नाबार्डला सांगितले आहे.

पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना शेती कर्जापोटी दंडव्याज आकारू नये, तसेच नवे अल्पमुदत कर्ज वेळेत वाटप करण्याची दक्षता घ्यावी, असे केंद्रीय कृषी मंत्रालयाने नाबार्डला सांगितले आहे.

केंद्राने नाबार्डला काहीही सूचना दिल्या तरी रिझर्व्ह बॅंकेची भूमिका पाहून इतर बॅंका आपले धोरण ठरवतात. त्यामुळे केंद्राने नाबार्डबरोबरच रिझर्व्ह बॅंकेला देखील कृषी कर्जाबाबत दक्षता घेण्याचे लेखी कळविले आहे. त्यामुळे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकांनी या घडामोडींचे स्वागत केले आहे.  

केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या पत पुरवठा विभागाचे सहसचिव डॉ.आशिषकुमार भुतानी यांनी रिझर्व्ह बॅंक आणि नाबार्डला ३० मार्चला पत्र पाठवून काही मुद्दे लक्षात आणून दिले आहेत. रिझर्व्ह बॅंकेने कोणतीही संदिग्धता खाली ठेवू नये असा हेतू कृषी मंत्रालयाचा असल्याचे बॅंकांचे म्हणणे आहे.  

कृषी सहसचिवांनी म्हटले आहे की, “ केंद्र सरकारने कृषी कर्ज पुरवठा व वसुलीच्या प्रक्रियेत केलेल्या हितकारक बदलांचा फायदा शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी नाबार्ड व रिझर्व्ह बॅंकेने आपल्या कक्षेतील बॅंकांना सूचित करावे. १ मार्च ते ३१ मे या कालावधीतील वसूलपात्र कर्जांच्या बाबत दिलेली सवलत शेतकऱ्यांना मिळण्यासाठी पावले टाकावीत.”

मूळ आदेश असा आहे...
कोरोनामुळे सुरू असलेल्या लॉकडाऊनच्या स्थितीनंतर देशभर उद्भवलेल्या कृषी कर्ज वसुलीबाबत केंद्र सरकारने काढलेल्या मूळ आदेशाचे पालन व्हावे, असे केंद्रीय कृषी मंत्रालयाला वाटते. सरकारच्या मूळ आदेशानुसार एक मार्च ते ३१ मे या दरम्यान असलेल्या सर्व कर्जांवरील वसुलीचे हप्ते तीन महिने लांबणीवर टाकण्यात आलेले आहेत. कृषी मंत्रालयाने या आदेशाचा अर्थ लावताना यात बॅंकांनी शेतीची मध्यम मुदत कर्ज ( कृषी मुदत कर्ज, रिटेल कर्ज व पीक कर्ज) तसेच बॅंकांनी खेळत्या भांडवलासाठी दिलेले कर्ज याचा समावेश आहे, असे म्हटले आहे. तसेच अशा बॅंका म्हणजे व्यापारी बॅंका ( प्रादेशिक ग्रामीण बॅंका, लघू वित्तीय बॅंका, स्थानिक बॅंका) तसेच सहकारी बॅंका असल्याचे नमूद केले गेले आहे.  अर्थात, यामुळे अल्पमुदत पीक कर्जफेड वेळेत करणाऱ्या शेतकऱ्यांना व्याजदरात चार टक्के सवलत देण्यासाठी जी प्रक्रिया राबविली जाते तिला देखील मुदतवाढ मिळाली आहे. 

दिलासा देणारा निर्णय
केंद्राने नाबार्ड व रिझर्व्ह बॅंकेला कृषी कर्ज वसुलीबाबत तीन महिन्याची मुदत वाढवून देणारा आदेश काढल्याने राज्यातील जिल्हा बॅंकांनी समाधान व्यक्त केले आहे. कारण, लॉकडाऊनमध्ये फसलेला शेतकरी यामुळे थकबाकीदार होणार नाही तसेच व्याज सवलत योजनेला देखील पात्र राहील, असे बॅंकिंग क्षेत्रातील जाणकारांचे म्हणणे आहे. राज्यात सध्या एक लाखापर्यंतचे पीक कर्ज सहा टक्के दराने येत असले तरी ते शेतकऱ्यांना शून्य टक्के व्याजाने मिळते. कारण, प्रत्येकी तीन-तीन टक्के व्याज हिस्सा केंद्र व राज्य सरकारकडून दिला जातो. तीन लाखापर्यंतचे कर्ज मात्र सहा टक्के दराने येते व ते राज्यात शेतकऱ्यांना दोन टक्के व्याजाने मिळते. यात केंद्र यासाठी तीन  टक्के व राज्याकडून एक टक्का असे चार टक्के व्याज सरकारकडून भरले जाते. त्यामुळे उर्वरित दोन टक्के व्याजाने कर्जपुरवठा होतो. यात केवळ पुणे आणि सातारा जिल्हा मध्यवर्ती बॅंक आपल्या सभासद शेतकऱ्यांचे उर्वरित दोन टक्के व्याज देखील स्वनिधीतून भरतात. यामुळे तीन लाखापर्यंतचे पीक कर्ज देखील शून्य टक्के दराने पुणे, सातारा भागात मिळते. या दोन्ही जिल्ह्यांमधील शेतकरी थकबाकीदार होणार नाही तसेच बॅंकांच्या शून्य टक्के सवलतीला देखील पात्र असतील.


इतर अॅग्रो विशेष
मॉन्सून कर्नाटकात दाखल, कारवार,...पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून)...
‘चक्रीवादळ’ ओसरले; खानदेशासह पश्‍चिम...पुणे : अरबी समुद्रात आलेले ‘निसर्ग’ चक्रीवादळ...
जीवनावश्‍यक वस्तू कायदा, मुक्त शेतीमाल...नवी दिल्ली : आत्मनिर्भर भारत योजनेत जाहीर...
एक लाख लोकांना सुरक्षितस्थळी हलविले मुंबई: निसर्ग चक्रीवादळामुळे नुकसान होऊ नये...
टोळधाड मध्यप्रदेशात, ड्रोन पोचला...नागपूर ः गेल्या दहा दिवसांपासून विदर्भातील...
प्रवाह सुरळीत झाल्यानंतर मॉन्सूनची...पुणे : नैर्ऋत्य मोसमी वारे (मॉन्सून) सोमवारी (ता....
वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी पुणे: अरबी समुद्रात आलेल्या निसर्ग चक्रीवादळाचा...
‘निसर्ग’चे किनारपट्टीलगत थैमानपुणे : अरबी समुद्रात महाराष्ट्राच्या किनाऱ्यालगत...
कमी पावसाच्या प्रदेशात रुजल्या...औरंगाबाद जिल्ह्यातील इतिहास प्रसिद्ध दौलताबाद...
शास्त्रीय तंत्राद्वारे वाढवली कांद्याची...अवर्षणग्रस्त येवला तालुक्यातील (जि. नाशिक)...
पडीक जमिनीत फुलवली साडेतीन हजार झाडांची...माहुळंगे (ता. देवगड, जि. सिंधुदुर्ग) येथील अनिल...
‘निसर्ग’चक्रीवादळ अलिबागनजीक...पुणे : अरबी समुद्रात महाराष्ट्राच्या किनाऱ्यालगत...
चक्रीवादळ अलिबागजवळ १ ते ३च्या दरम्यान...पुणे : अरबी समुद्रात महाराष्ट्राच्या किनाऱ्यालगत...
दीडपट 'एमएसपी' म्हणजे निव्वळ धूळफेक :...पुणे: मोदी सरकारने खरिपासाठी जाहीर केलेल्या किमान...
टोळधाडीवर दोन दिवसात नियंत्रण मिळविणार नागपूर ः पूर्व विदर्भातील जिल्ह्यांमध्ये गेल्या...
‘निसर्ग’ चक्रीवादळ आज अलिबागजवळ धडकणार पुणे : अरबी समुद्रात महाराष्ट्र, कर्नाटकच्या...
मॉन्सून कर्नाटकात आज धडकणारपुणे : नैर्ऋत्य मोसमी वारे (मॉन्सून) सोमवारी (ता....
बॅंकांसाठी आठ-अ, फेरफार उतारे थेट...पुणे: सातबारा संगणकीकरण उपक्रमाला लॉकडाउनमुळे...
कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पाऊस पुणे: अरबी समुद्रात तयार झालेल्या ‘निसर्ग’...