'तार कुंपणासाठी १५ वर्षे दीर्घ मुदतीचे कर्ज द्या'

'तार कुंपणासाठी १५ वर्षे दीर्घ मुदतीचे कर्ज द्या'
'तार कुंपणासाठी १५ वर्षे दीर्घ मुदतीचे कर्ज द्या'

अकोला  : मूर्तिजापूर तालुका दौऱ्यावर आलेल्या कृषिमंत्री दादा भुसे यांची प्रगती शेतकरी मंडळाचे अध्यक्ष राजू वानखडे, सेवकराम लहाने यांनी भेट घेत शेताला तार कुंपणासाठी १५ वर्षे दीर्घ मुदतीच्या कर्जासह इतर मागण्यांचे निवेदन दिले. मागण्यांवर सकारात्मक विचार करण्याचे आश्‍वासन या वेळी श्री. भुसे यांनी शेतकऱ्यांना दिले.  महिलांच्या शेतीशाळेला भेट देण्यासाठी कृषिमंत्री दौऱ्यावर आले होते. यावेळी शेतकऱ्यांनी भेट देऊन दिलेल्या निवेदनात म्हटले की, नाबार्डच्या अध्यक्षांशी चर्चा करून सध्या अस्तित्वात असलेले शेतकुंपण धोरण बदलावे. १५ वर्षे दीर्घ मुदतीचे कर्ज धोरण आखण्यास त्यांना सांगावे. यामुळे वन्यप्राण्यांकडून होणारी पिकांची नासाडी थांबविता येईल. शेतकऱ्यांच्या उत्पन्नाचे आर्थिक स्रोत मजबूत करून राष्ट्रीय उत्पन्नातही भर घालावी. अतिवृष्टीने बाधीत या तालुक्यातील १८ हजार शेतकऱ्यांना विमा भरपाई मिळावी. भावांतर योजना राबवावी. चारा छावण्यांऐवजी चारा डेपो देण्याचा धोरणात्मक निर्णय घ्यावा. ग्रामीण भागातील तसेच शेतरस्ते व्हावेत.  ॲग्रो प्रोड्यूसर कंपन्यांच्या आर्थिक सबलीकरणासाठी नाफेडमार्फत मूग, सोयाबीन, तूर, हरभरा खरेदी केंद्र सुरू करण्यासंदर्भात संबंधित यंत्रणेला निर्देश द्यावेत आदी मागण्या करण्यात आल्या. या निवेदनावर जनमंचाचे तालुकाध्यक्ष प्रा. सुधाकर गौरखेडे, देविदास बांगड, प्राचार्य श्रावण रणबावळे, कैलास साबळे, संदीप मानकर, भैया ठोकळ, कृष्णराव गावंडे, सागर मानकर, शुभम जवंजाळ, मुन्ना नाईकनवरे, विश्वनाथ गावंडे, नितीन गावंडे, अरुण बोंडे आदींच्या यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com