Agriculture news in marathi Provide additional funds for Jigav, demand to the Governor | Agrowon

जिगावसाठी अतिरीक्त निधी द्या, राज्यपालांकडे मागणी

टीम अॅग्रोवन
बुधवार, 16 सप्टेंबर 2020

बुलडाणा : जिल्ह्यातील महत्वाकांक्षी जिगाव प्रकल्पास अनुशेषासाठी राखीव निधी व्यतिरिक्त अतिरिक्त निधीच्या तरतुदीसाठी विशेष बाब म्हणून विचार व्हावा, अशी मागणी सोमवारी (ता.१४) झालेल्या बैठकीत राज्यपालांकडे करण्यात आली.

बुलडाणा : जिल्ह्यातील महत्वाकांक्षी जिगाव प्रकल्पास अनुशेषासाठी राखीव निधी व्यतिरिक्त अतिरिक्त निधीच्या तरतुदीसाठी विशेष बाब म्हणून विचार व्हावा, अशी मागणी सोमवारी (ता.१४) झालेल्या बैठकीत राज्यपालांकडे करण्यात आली. या मागणीवर राज्यपाल भगतसिंह कोश्‍यारी यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. 

पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या विनंतीवरून जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्या उपस्थितीत राजभवनवर बैठक झाली. यावेळी जलसंपदा विभागाचे प्रधान सचिव लोकेश चंद्र, मलकापूरचे आमदार राजेश एकडे उपस्थित होते. 

राज्यातील जलसंपदा प्रकल्पांना गती मिळावी, यासाठी काही प्रकल्प राष्ट्रीय प्रकल्प म्हणून घोषित करता येऊ शकतील काय, याच्याही शक्यता तपासण्याचे राज्यपालांनी यावेळी सांगितले. जिल्ह्यातील अनुशेष दूर करण्यासाठी जिगाव प्रकल्पाला गती देण्याची आवश्यकता आहे, असे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी सांगितले. 

भूसंपादन आणि पुनर्वसनासाठी विशेष बाब म्हणून ४९०६.५० कोटी अतिरिक्त निधी लागणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. जिगांव प्रकल्पामुळे बुलडाणा जिल्ह्याची सिंचन क्षमता ही १९ टक्क्यावरून २५ टक्के वाढेल. हा प्रकल्प राज्यासाठी महत्वपूर्ण ठरेल, असे डॉ. शिंगणे यांनी सांगितले. डॉ. शिंगणे यांनी राज्यपालांना जिजाऊचे तैलचित्र भेट दिले.

या प्रकल्पाचा केंद्र शासनाच्या बळीराजा जलसंजिवनी योजनेअंतर्गत मार्च २०१७ पासून समावेश आहे. राज्यपालांच्या सिंचनअनुशेष दूर करण्याच्या योजनांमध्ये जिगांवचा समावेश आहे. विदर्भातील दुष्काळ प्रवण आणि शेतकरी आत्महत्याग्रस्त भागातील हा प्रकल्प आहे. 
 


इतर ताज्या घडामोडी
सोलापूर जिल्ह्यात मराठा आरक्षणासाठी...सोलापूर  : मराठा समाजाला आरक्षण...
मुक्त विद्यापीठात कृषीविषयक अभ्यासक्रम...नाशिक : ‘‘यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त...
सोलापूर जिल्ह्यात दहा हजार हेक्‍टरवर...सोलापूर : जिल्ह्यात गेल्या तीन-चार दिवसांपासून...
सोलापूर जिल्हा बॅंक देणार अल्प मुदतीचे...सोलापूर : सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी...
परभणी, हिंगोलीत ओल्या दुष्काळाचे सावटपरभणी : परभणी, हिंगोली जिल्ह्यातील अनेक मंडळांत...
जळगाव जिल्ह्यात उडीद, मूग खरेदीची...जळगाव : शासकीय उदीद, मूग खरेदीसंबंधीची प्राथमिक...
परभणीत भरपाईसाठी ‘स्वाभिमानी’ची पिकांसह...परभणी : अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे अतोनात नुकसान...
नाशिक जिल्ह्यात खरिपासह भाजीपाला पिके...नाशिक : जिल्ह्याच्या सर्वदूर भागात शनिवारी (...
`औरंगाबाद जिल्ह्यातील नुकासानग्रस्त...औरंगाबाद : सतत सुरू असलेल्या पावसाने कोणत्या...
ऊसतोडणी दर ठरविताना उत्पादकांवरील बोजा...पुणे : दहा लाख ऊसतोडणी कामगारांच्या वतीने विविध...
मराठा आरक्षणावरील अंतरिम स्थगिती उठवावीमुंबई : मराठा आरक्षणासंदर्भात सर्वोच्च...
‘मुळा’तून विसर्ग बारा हजार क्युसेकवर...नगर ः नगर जिल्ह्यातील मुळा धरणाच्या पाणलोटात पाऊस...
शेतकऱ्यांना कॉर्पोरेट कंपन्यांच्या...कोल्हापूर : पाशवी बहुमताच्या बळावर भलेही तुम्ही...
मोताळा तालुक्यात वादळी पावसाने नुकसानबुलडाणा ः जिल्ह्यात शनिवारी (ता. १९) वादळी...
नाशिकमध्ये वाटाण्याची आवक कमीच; दरात...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
नागपूर जिल्ह्यात पुराचा २९ हजार...नागपूर : पुरामुळे जिल्ह्यात २९ हजार २६२...
सोलापुरात पितृपंधरवड्यामुळे गवार,...सोलापूर ः पितृपंधरवड्यामुळे सोलापूर कृषि उत्पन्न...
डाळिंब फळपिकातील तेलकट डाग व्यवस्थापनसोलापूर, सांगली, नाशिक आणि नगर यासारख्या...
औरंगाबादमध्ये मूग, उडीद, ज्वारी,...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत...
बार्शी बाजार समितीत उडीद, मूग हमीभाव...सोलापूर : बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...