agriculture news in Marathi provide agricultural inputs on village level Maharashtra | Agrowon

ग्राम पातळीवर शेतकऱ्यांना कृषी निविष्ठा पुरवा : कृषी आयुक्तांचे पत्र

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 30 एप्रिल 2020

या खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना बियाणे, खते, कीटकनाशकांचा पुरवठा वेळेवर होणे गरजेचे आहे. कोरोनामुळे प्रत्येक जिल्ह्यात संचारबंदी सुरु आहे.

अकोला ः या खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना बियाणे, खते, कीटकनाशकांचा पुरवठा वेळेवर होणे गरजेचे आहे. कोरोनामुळे प्रत्येक जिल्ह्यात संचारबंदी सुरु आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी कृषी केंद्रांवर जाऊन कृषी निविष्ठा खरेदी केल्यास गर्दी होऊ शकते. यातून विषाणूचा फैलाव होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना ग्राम पातळीवर कृषी निविष्ठा पुरविण्याचे नियोजन करण्याचे निर्देश कृषी आयुक्तांनी यंत्रणांना दिले आहेत. 

याबाबत कृषी आयुक्तांनी सोमवारी (ता.२७) एक सविस्तर पत्र विभागीय कृषी सहसंचालक तसेच सर्व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांना पाठवले आहे. यात म्हटले की, राज्यातील खरीप नियोजनाबाबत सर्व जिल्ह्यांच्या आढावा बैठका व्हीडिओ कॉन्फरन्सद्वारे घेण्यात आल्या. खरीप हंगाम लवकर सुरू होत असल्याने शेतकऱ्यांना बियाणे, खते आणि कीटकनाशकांचा पुरवठा सुद्धा वेळेत होणे आवश्यक आहे. 

राज्यामध्ये कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर सर्व जिल्ह्यांमध्ये सध्या संचारबंदी जाहीर करण्यात आली असून, अशा स्थितीत शेतकऱ्यांनी कृषी सेवा केंद्रांवर येऊन कृषी निविष्ठा खरेदी केल्यास जास्त गर्दी होऊ शकते.

कोरोना विषाणूचा फैलाव मोठ्या प्रमाणात होऊ शकतो. त्यामुळे ज्याप्रमाणे शेतकरी गटांमार्फत भाजीपाल्याचा पुरवठा शहरांमध्ये कृषी विभागाच्या समन्वयाने करण्यात आला, त्याच धर्तीवर कृषी सेवा केंद्र आणि शेतकरी गट/शेतकरी उत्पादक कंपनी यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कृषी निविष्ठांचा पुरवठा शेतावर करण्याचे बैठकीत नियोजन आखण्यात आले. त्यानुसार लवकरात लवकर कार्यवाही करावी. 

यासाठी शेतकऱ्यांनी त्यांच्या भागातील आत्माअंतर्गत गटाकडे नोंदणी करावी. शेतकऱ्यांनी त्यांचे नाव, पत्ता, सर्वे नंबर/गट नंबर, मोबाईल क्रमांक, आधार क्रमांक, ज्या कृषी सेवा केंद्रामधून निविष्ठा खरेदी करायच्या आहेत त्यांचे नाव व कृषी निविष्ठांची मागणी गटाकडे करावी.

निविष्ठांची नोंदणी गटांकडे झाल्यानंतर गटप्रमुखच बियाणे, खते, कीटकनाशकांची खरेदी करतील. ज्या विक्रेत्यांना शक्य असेल ते मोबाईल ॲप तयार करून शेतकऱ्यांची मागणी नोंदवून घेतील व मोठी मागणी असल्यास कृषी निविष्ठा थेट शेतकऱ्यांपर्यंत पोचवतील. 

वाहतूक परवाने देणार 
कृषी सेवा केंद्र ते शेतकरी गट या वाहतुकीकरिता कृषी विभागाचे अधिकारी परवाने कृषी विभागामार्फत गटांकरिता उपलब्ध करून देतील. मात्र आर्थिक बाबी शेतकरी गटामार्फत हाताळण्यात येतील. तालुका स्तरावर यासाठी कालबद्ध कार्यक्रम आखून ३१ मे पूर्वी शेतकऱ्यांना निविष्ठांचा पुरवठा होईल असे नियोजन करावे, असेही आयुक्तांनी म्हटले आहे. 
 


इतर अॅग्रो विशेष
ऊस गाळप यंदा वाढणार कोल्हापूर: गेल्या वर्षी महापूर व अवर्षणामुळे...
चिकन, अंड्यांची मागणी वाढली, दरात...नगर ः कोरोना व्हायरस संसर्गाच्या पार्श्वभूमीवर...
ऊस तोडणी कामगारांच्या मागण्यांबाबत साखर...पुणे: राज्यातील ऊस तोडणी व वाहतूक कामगारांच्या...
शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत जाणार लालपरी सोलापूर : एक लाखांहून अधिक कर्मचारी, साडेसतरा...
राज्यात सर्वदूर हलक्या पावासाची शक्यतापुणे ः राज्यातील अनेक भागांत कमी अधिक स्वरूपात...
मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पाऊस पुणे ः उत्तर भारतात परतीच्या पावसासाठी पोषक...
सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी : कृषिमंत्री...कन्नड, जि. औरंगाबाद: अतिवृष्टीमुळे झालेल्या पीक...
तीनशे टन हळद बांगलादेशाला निर्यात नांदेड : शेतीमालास अधिकचा दर मिळावा, यासाठी...
मुहूर्ताचा कापूसच कवडीयुक्त अकोला: यंदा दसऱ्याआधीच कापूस वेचणीचा मुहूर्त अनेक...
कृषी उपसंचालकानेच घातली कृषी उपक्रमांना...यवतमाळ: आत्महत्याग्रस्त अशी जागतिक स्तरावर ओळख...
महिला गट बनवितो ३० प्रकारचे मसालेइटकरे (ता.वाळवा,जि.सांगली) येथील उपक्रमशील महिला...
मराठवाड्यात काही ठिकाणी मुसळधारपुणे : राज्यातील बहुतांशी भागातील पावसाचे...
राज्यात हलक्या पावसाची शक्यतापुणे : काही दिवस राज्यात मुसळधार पाऊस...
एक हजार प्राध्यापकांनी वयाची साठी...पुणे: राज्यातील कृषी विद्यापीठांमधील...
सूक्ष्म अन्न उद्योगांना मिळणार आता दहा...पुणे: राज्यात लवकरच पंतप्रधान सूक्ष्म अन्न उद्योग...
कृषी, कामगार विधेयकांची राज्यात...पुणे : केंद्र सरकारने घाईघाईत मंजूर करुन घेतलेली...
शेतकरी आंदोलनाचे सात राज्यांत पडसादचंडीगड ः केंद्र सरकारच्या कृषी विधेयकांना विरोध...
सोयाबीन बियाणे प्लॉटना फटकाऔरंगाबाद: सध्याचे पावसाचे प्रमाण व त्यामुळे...
केळी विमा निकषांबाबत उत्सुकताजळगाव ः राज्य सरकारच्या चुकांमुळे हवामानावर...
अडीच हजार हेक्टर भातशेती सततच्या...सिंधुदुर्ग ः हळवी आणि भिजवणीची लागवड केलेली...