agriculture news in marathi provide balanced diet to cattle | Agrowon

जनावरांना द्या संतुलित आहार

डॉ. श्रद्धा राऊत  डॉ. शरद दुर्गे
गुरुवार, 29 ऑक्टोबर 2020

गाई, म्हशींसाठी, संतुलित आहार नियोजन केल्यास त्यांची शारीरिक वाढ, प्रजननात तसेच दूध उत्पादनात वाढ होते. गाई-म्हशींसाठी लागणारी चाऱ्याची मात्रा त्यांच्या वजनाप्रमाणे ठरवली जाते. 
 

गाई, म्हशींसाठी, संतुलित आहार नियोजन केल्यास त्यांची शारीरिक वाढ, प्रजननात तसेच दूध उत्पादनात वाढ होते. गाई-म्हशींसाठी लागणारी चाऱ्याची मात्रा त्यांच्या वजनाप्रमाणे ठरवली जाते. 

जनावरांच्या समतोल आहारामध्ये वैरण, हिरवा चारा, खनिज पदार्थ, जीवनसत्वे, पाणी यांचा समावेश होतो. पावसाळी दिवसांमध्ये मुख्यतः हिरवा चारा जनावरांना जास्त प्रमाणात दिला जातो. परंतू जनावरांना हिरवा आणि वाळलेला चारा योग्य प्रमाणात देणे गरजेचे आहे.

जनावरांच्या चाऱ्यामध्ये वाळलेला चारा आणि हिरवा चारा असे दोन प्रकार असतात. हिरव्या चाऱ्यामध्ये प्रामुख्याने ज्वारी, मका, बाजरी, संकरीत नेपियर, गिनीगवत, ओट, दिनानाथ, यशवंत, जयवंत गवत हा एकदल चारा आणि चवळी, लसून घास, बरसीम, स्टायलो हा द्विदल चारा दिला जातो. पोषणमूल्यांच्या दृष्टीने द्विदल चारा जास्त सकस असतो.

खाद्य नियोजन 

 • गाई,म्हशींसाठी, संतुलित आहार नियोजन केल्यास त्यांची शारीरिक वाढ, प्रजननात तसेच दूध उत्पादनात वाढ होते. गाई-म्हशींसाठी लागणारी चाऱ्याची मात्रा जनावरांच्या वजनाप्रमाणे ठरवली जाते. 
 • गाईसाठी तिच्या वजनाच्या २.५ टक्के तर म्हशीसाठी तिच्या वजनाच्या ३ टक्के पाणी विरहित चारा (चोथा) मिळणे आवश्यक आहे. म्हणजेच ताज्या उपलब्ध चाऱ्यामध्ये असणारे पाणी हे त्या चाऱ्याच्या वजनातून वजा केले तर पाणी विरहित चाऱ्याचे (चोथा) वजन मिळेल.
 • पाणी विरहित चाऱ्याचे वरीलप्रमाणे विभाजन केल्यानंतर ताज्या पाणीयुक्त चाऱ्यामध्ये  खालील तक्त्यात दिल्याप्रमाणे रुपांतर करावे. 

चयापचयात संतुलन 

 • चौकटीत दिल्याप्रमाणे चारा विभाजन करत असताना गाई वजनाच्या ४०० किलोच्या २.५ टक्के म्हणजे १० किलो पाणीविरहित चारा दररोज लागेल. जर संपूर्ण हिरवा चारा दिला तर ९० टक्के पाणी गृहीत धरल्यास हे चाऱ्याचे प्रमाण १०० किलो होईल. एवढा चारा गाय एका दिवसात खाऊ शकणार नाही. किंबहुना चारा गरजेपेक्षा कमी खाल्ला 
 • जाईल. 
 • जेवढा चारा खाल्ला जाईल त्यात ९० टक्के पाणी असल्याने तो गायीच्या पोटातील विघटनाच्या प्रक्रियेला कमी वेळ उपलब्ध होईल. त्यातील पोषक घटक शोषून घेण्याआधीच शरीराबाहेर फेकला  जाईल. 
 • खाल्लेल्या चाऱ्याचे प्रमाण हे पोटाच्या क्षमतेबाहेर असेल आणि त्यात मुखत्वे पाणी असेल, म्हणून हिरव्या चाऱ्याच्या पुरवठ्यावर नियंत्रण गरजेचे आहे.

 

चाऱ्याचा प्रकार/ पाणी विरहित चाऱ्याची टक्केवारी   एकूण पाणीयुक्त चारा प्रतिदिवस
वाळलेला चारा : ४.४ किलो (९० टक्के चारा; १० टक्के पाणी)   ४.९ किलो
हिरवा चारा ः २.३ किलो 
(१० टक्के चारा; ९० टक्के पाणी )
 हिरवा एकदल चाराः १.६५ किलो   १६.५ किलो
हिरवा द्विदल चारा ः ०.५५ किलो  ५.५ किलो
खुराक : ३.३ किलो (९० टक्के खुराक; १ टक्के पाणी)   ३.७ किलो

टीप 
शेजारील तक्त्यात दिलेली चाऱ्याची मात्रा ही बंदीस्त गोठा पध्दतीने करण्यात येणाऱ्या गायपालनासाठी आहे. चरायला जाणाऱ्या गाईसाठी ही चाऱ्याची मात्रा कमी लागेल. याप्रमाणे गाईच्या वजनानुसार लागणारी चाऱ्याची मात्रा ठरवता येते.

 हिरव्या चाऱ्याचे महत्व 

 • चारा चवदार असल्यामुळे जनावरे आवडीने खातात.
 • द्विदल चाऱ्यामधून खनिजे व प्रथिनांचा पुरवठा होतो.
 • जनावरांच्या शरीरात जीवनसत्व ‘अ ’(कॅरोटीन) पुरवठा होऊन  रातांधळेपणा टाळण्यास मदत होते. त्वचा सतेज व उत्तम राहते.

सतत हिरवा चारा देणे टाळा 

 • सतत दिल्या जाणाऱ्या हिरव्या चाऱ्यामुळे जनावरांमध्ये विविध समस्या निर्माण होतात. हिरव्या, लुसलुसीत गवतामध्ये सोडियमचे प्रमाण कमी आणि पोटॅशियमचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे मॅग्नेशियम शरीरातून शोषून घेण्यामध्ये अडथळा निर्माण होतो. त्यामुळे जनावरांच्या शरीरामध्ये मॅग्नेशियमची कमतरता निर्माण होऊन मॅग्नेशियम टीटॅनी हा आजार होतो.
 • जनावरांच्या आहारात हिरव्या चाऱ्यासोबतच वाळलेळा चारा समावेश करणे आवश्यक आहे. ज्यामुळे त्यांना लागणाऱ्या पोषक घटकांची कमतरता भरून निघते.  जनावरे एकाच ठिकाणी चारल्यामुळे त्या ठिकाणी चाऱ्याची वाढ पूर्णपणे होत नाही. चारा किंवा जास्त तंतुमय पदार्थ असलेला चारा खाण्यात येतो. अशा चाऱ्यामधून  जनावरांची शरीर पोषण व उत्पादनासाठी पोषणमुल्यांची गरज पूर्ण होत नाही.

संपर्क  ः डॉ. श्रद्धा राऊत, ९२७०७०६००३,  
(पशुपोषण आहारशास्त्र विभाग,पशुवैद्यक व पशुविज्ञान महविद्यालय,उदगीर, जि. लातूर)


इतर कृषिपूरक
दूधनिर्मिती अन् प्रत टिकविण्यासाठी...दुधाचा दर हा गुणवत्तेवर अवलंबून असतो. त्यामुळे...
देशी, जर्सी, एचएफ गाईंचे अर्थशास्त्रशेतीला पूरक म्हणून पशुपालन हा व्यवसाय...
शिफारशीनुसार जनावरांना लसीकरण आवश्यक...जनावरे आजारी पडल्यामुळे दूध उत्पादनात घट, गर्भपात...
उन्हाळ्यातील म्हशींचे व्यवस्थापन जनावरांसाठी पुरेसे पाणी, खाद्याची व्यवस्था ठेवावी...
जनावरातील मूतखड्यावर गोखरू, कुलशी...मूतखडा हा आजार जनावरांमध्ये मोठ्या प्रमाणात...
नियोजन चारा, खाद्यमिश्रणाचे..जनावरांना वर्षभर लागणाऱ्या पशुखाद्य घटक, हिरवा...
शेळीपालनातील महत्त्वाच्या बाबीआपल्या गोठ्यातील शेळी स्थानिक जातीची असली तरी...
उन्हाळ्यातील जनावरांचे व्यवस्थापनगोठ्यामध्ये जनावरांना हालचाल करण्यासाठी...
फलोत्पादनासाठी शासनाच्या योजनाकृषी विभागातर्फे फलोत्पादनवाढीसाठी विविध योजना...
अळिंबी स्पॉन करताना घ्यावयाची काळजीसंशोधनाच्या आधारे भारतामध्ये अळिंबी स्पॉनसाठी...
पैदाशीच्या बोकडाचे व्यवस्थापनशेळीपालकांनी आपल्या प्रक्षेत्रावर जातिवंत बोकड...
मृदूअस्थी ः दुधाळ गाई- म्हशीतील आजारमृदूअस्थी आजार दुधाळ व गाभण गाई-म्हशींना निव्वळ...
शाश्वत गिनी पालनासाठी नवे तंत्रज्ञानस्थानिक पातळीवर गिनी, तितारी आणि चित्रा या...
सातत्यपूर्ण दूध उत्पादन देणारी निली...निली रावी म्हशीची दूध उत्पादन क्षमता ही मुऱ्हा...
जनावरातील लिस्टेरियोसिस आजारलिस्टरियोसिस आजारामध्ये जनावरे मान एकीकडे खेचून...
कोंबड्यांमधील उष्माघातावरील उपचारउन्हाळ्यात कोंबड्यांना खाद्य सकाळी व संध्याकाळी...
मत्स्य बीज खरेदी, संचयन करतानाची काळजीमत्स्य जिरे ते मत्स्य बोटुकलीपर्यंतचा काळ...
जनावरांच्या आहारात असावीत खनिज द्रव्येपचनसंस्था, प्रजनन संस्था किंवा शरीराच्या प्रत्येक...
निकृष्ट चाऱ्याचे मूल्यवर्धननिकृष्ट चाऱ्याचे रूपांतर सकस व असलेल्या...
अळिंबी स्पॉन निर्मिती प्रयोगशाळेची...चांगल्या प्रतीचे शुद्ध स्पॉन तयार करण्यासाठी...