`नांदेड जिल्ह्यातील नुकसानग्रस्तांना सरसकट पीकविमा द्या`

नांदेड: अतिवृष्टी तसेच परतीच्या पावसामुळे यंदा सोयाबीनसह कापूस, मूग, उडीद, ज्वारी ही खरिपाच्या पिकांसह बागायती पिके भुइसपाट झाली आहेत.
 Provide comprehensive crop insurance to the affected people in Nanded district
Provide comprehensive crop insurance to the affected people in Nanded district

नांदेड : अतिवृष्टी तसेच परतीच्या पावसामुळे यंदा सोयाबीनसह कापूस, मूग, उडीद, ज्वारी ही खरिपाच्या पिकांसह बागायती पिके भुइसपाट झाली आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना सरसकट पीकविमा द्यावा, अशी मागणी शरद जोशीप्रणित शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आली.

मुख्यमंत्री, कृषिमंत्री, अर्थमंत्री, पालकमंत्री, कृषी आयुक्त यांच्याकडे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत ही मागणी करण्यात आली.  जिल्ह्यातील नऊ लाख शेतकऱ्यांनी खरिपात पीकविमा योजनेत विमा उतरवला. यानंतर अतिवृष्टी तसेच परतीच्या पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना ७२ तासांच्या आत नुकसानीचे दावे दाखल करा, असे आदेश दिले.

त्यानुसार शेतकऱ्यांनी विमा कंपनीच्या वेबसाइटवर रात्र-रात्र जागून काढली, परंतु ती साईट बंद असल्यामुळे जिल्ह्यातील फक्त ६३ हजार शेतकऱ्यांचेच दावे दाखल करण्यात आले. उर्वरित आठ लाख ३७ हजार शेतकऱ्यांचे नुकसानीचे दावे दाखल होऊ शकले नाही. त्यामुळे जिल्ह्यातील इतर शेतकऱ्यांना विमा मिळत नाही.

सरकारने तहसीलमार्फत व कृषी विभागामार्फत अतिवृष्टीचे पंचनामे करून तसा अहवाल सरकारला दाखल केला. तो सरकारी अहवाल ग्राह्य धरून जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सरसकट पीकविमा मंजूर करा. शासन दखल घेत नसेल, तर शेतकरी संघटना जिल्हाभर रस्ता रोको आंदोलन करून राज्य सरकारचा जाहीर निषेध करणार आहे, असेही निवेदनात म्हटले आहे.

शेतकरी संघटनेचे माजी प्रदेशाध्यक्ष गुणवंत पाटील हंगरगेकर, जिल्हाप्रमुख शिवाजी शिंदे, ॲड. धोंडीबा पवार, मराठवाडा शेतकरी प्रतिनिधी प्रा. शिवाजी मोरे, आर.डी. कदम, आर. पी. कदम, निधानजी वाघ, शंकर मेकाले, गोविंदराव लोंढे, शिवराज पाटील थडीसावळीकर, व्यंकटराव पाटील वडजे, रामराव पाटील कोंढेकर, विठ्ठलराव जाधव, किशनराव इळेगांवकर उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com