संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात केळी पिकाला पीकविमा द्या

फळपिक विमा योजनेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा आणि काजू पिकांसह सावंतवाडी आणि दोडामार्ग तालुक्यातील केळी पिकाचा समावेश करण्यात आला आहे.
संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात केळी पिकाला पीकविमा द्या
संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात केळी पिकाला पीकविमा द्या

वैभववाडी, जि. सिंधुदुर्ग : फळपिक विमा योजनेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा आणि काजू पिकांसह सावंतवाडी आणि दोडामार्ग तालुक्यातील केळी पिकाचा समावेश करण्यात आला आहे. परंतु केळी पिकाचा फळपिक विमा योजनेत संपूर्ण जिल्ह्यात समावेश केलेला नाही, तो करण्यात यावा असा ठराव जिल्हा परिषदेच्या कृषी समिती सभेत करण्यात आला. जिल्हा परिषद कृषी समितीची सभा सभापती राजेंद्र म्हापसेकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या सभेला जिल्हा कृषी अधिकारी सुधीर चव्हाण, समिती सदस्य रणजित देसाई, अमरसेन सावंत, वर्षा पवार, सुधीर नकाशे, नितेश राहुल, जिल्हा कृषी अधीक्षक एस. एन. म्हेत्रे आदी उपस्थित होते. आंबा आणि काजू पिकांचा फळपीक विमा योजनेत संपूर्ण जिल्ह्यात समावेश आहे. तर केवळ सावंतवाडी आणि दोडामार्ग तालुक्यांतच केळी पिकाचा विमा योजनेत समावेश आहे. १ ऑक्टोबर ते ३० नोव्हेंबर या कालावधीत विमा कंपनीमार्फत फळपिक विमा योजना राबविण्यात येणार आहे. या योजनेत संपूर्ण जिल्ह्यातील केळी पिकाचा समावेश करण्यात यावा असा ठराव सभेत करण्यात आला. या वर्षी आंबा पिकाकरिता हेक्टरी ७ हजार, काजू पिकासाठी ५ हजार, तर केळी पिकांसाठी ७ हजार रुपये विमा हप्ता निश्तिच करण्यात आला असल्याची माहिती श्री. म्हेत्रे यांनी सभेत दिली. उद्योगांच्या आधुनिकीकरणासाठी अनुदान केंद्र शासनामार्फत पंतप्रधान सूक्ष्म उद्योग उन्नयन योजना कार्यान्वित केली असून, या योजनेचा लाभ वैयक्तिक लाभार्थी, बचत गट आणि शेतकरी कंपन्यांना देण्यात येणार आहे. या योजनेतर्गत अन्नप्रकिया उद्योग उभारणे, उद्योगस्तर वृद्धी, विस्तारीकरण व आधुनिकीकरण करता येणार आहे. आंबा, काजू, फणस, कोकम प्रकिया उद्योग, याशिवाय मसाले उद्योग, मांस प्रकिया, दूध प्रकिया अशा जुन्या उद्योगांच्या विस्तारीकरण व आधुनिकीकरणासाठी अनुदान दिले जाणार आहे. कुक्कुटपालन, शेळीमेंढीपालन, गाय-म्हैस पालन, खाणावळ, अन्नप्रक्रिया या उद्योगांना योजनेचा लाभ मिळणार नसल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com