पीक कर्जवाटप करा : आमदार भांबळे

पीक कर्जवाटप करा : आमदार भांबळे
पीक कर्जवाटप करा : आमदार भांबळे

परभणी : जिंतूर आणि सेलू या दुष्काळग्रस्त तालुक्यांत चारा छावण्या सुरू करा. पाणीटंचाई निवारणार्थ उपाययोजनांची अमंलबजावणी करावी. शेतकऱ्यांना नवीन पीक कर्जवाटप सुरू करावे. तसे आदेश बॅंकांना द्यावेत, आदी मागण्या राष्ट्रवादी काॅँग्रेसचे आमदार विजय भांबळे यांनी सोमवारी (ता. ३) जिल्हाधिकारी पी. शिवशंकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केल्या. 

जिंतूर तालुक्यातील सहा मंडळातील शेतकऱ्यांच्या खात्यावर दुष्काळाची आर्थिक मदत तत्काळ जमा करावी. २०१८-१९ च्या खरीप हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांना पीकविमा नुकसानभरपाई द्यावी. शेतकऱ्यांचे आर्थिक शोषण करणाऱ्या कंपन्यांविरुद्ध गुन्हे दाखल करावे, असेही निवेदनात स्पष्ट केले आहे.  

जिंतूर, सेलू तालुक्यांत गेल्या तीन महिन्यांपासून भीषण पाणी, चाराटंचाई आहे. त्यामुळे गावनिहाय आराखडे तयार करून चारा छावण्या, पाण्याची व्यवस्था करावी. खरिपाची पेरणी जवळ येऊन ठेपली आहे. परंतु अद्याप पीक कर्जवाटप सुरू नाही. शेतकऱ्यांकडे पेरणीसाठी पैसै नाहीत. त्यामुळे तत्काळ सर्व बॅंकांना पीक कर्जवाटप करण्याचे आदेश द्यावेत, अशा मागण्या भांबळे यांनी केल्या. 

जिल्हा परिषद अध्यक्षा उज्ज्वला राठोड, प्रसाद बुधवंत, सदस्य मीना राऊत, शालिनी राऊत, इंदुबाई घुगे, अजय चौधरी, ममता मते, अरुणा काळे, नमिता बुधवंत, संगीता घोगरे, रामराव उबाळे, अशोक काकडे आदी या वेळी उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com