खरिपात पंधरा दिवसांत पीककर्ज द्या : डॉ. राजेंद्र भोसले

खरिपात पंधरा दिवसांत पीककर्ज द्या : डॉ. राजेंद्र भोसले
खरिपात पंधरा दिवसांत पीककर्ज द्या : डॉ. राजेंद्र भोसले

सोलापूर : शेतीला प्राधान्याने आणि हंगाम सुरू होताच पहिल्या पंधरा दिवसांत कर्ज द्यावे, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी येथे दिले.

जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्या अध्यक्षतेखाली खरीप हंगामपूर्व आढावा बैठक झाली. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी बँक ऑफ इंडियाचे क्षेत्रीय व्यवस्थापक प्रदीप कांबळे, बँक ऑफ महाराष्ट्रचे क्षेत्रीय व्यवस्थापक किणीकर, नाबार्डचे जिल्हा व्यवस्थापक प्रदीप झिले, अग्रणी व्यवस्थापक रामचंद्र चंदनशिवे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बसवराज बिराजदार आदी उपस्थित होते.

डॉ. भोसले म्हणाले, ''शेतीसाठी कर्ज देण्यासाठी नियोजन केले जाते. पण, गेल्या दोन वर्षांत शेती कर्जवाटपाचे उद्दिष्ट साध्य होत नाही. मात्र यंदा शेतीसाठी कर्जपुरवठ्याचे उद्दिष्ट कोणत्याही परिस्थितीत साध्य केले पाहिजे. बँकांनी ग्राहकांच्या शंका समाधानासाठी लोकशाही दिनाच्या धर्तीवर उपाययोजना राबवावी.''

खरीप हंगामासाठी आवश्यक ती तयारी करण्यात यावी. रासायनिक खतांची मागणी आणि बियाणे यांचा पुरवठा सुरळीत व्हावा, यासाठी सज्ज राहावे. रासायनिक खताची मागणी आणि पुरवठा यांच्यात ताळमेळ साधला जावा, खताचे वितरण पॉस मशिनच्या द्वारेच कटाक्षाने केले जावे, असेही भोसले यांनी सांगितले.यंदाच्या हंगामात ४१३ गावांत खरीप पेरणी आणि ११४४ गावांत रब्बी पेरणीचे नियोजन आहे. एकूण ११.७३ लाख हेक्टर जमीन लागवडी खाली आणली जाणार असल्याचे बिराजदार यांनी सांगितले.

या वेळी वार्षिक पतपुरवठा आराखडाही जाहीर करण्यात आला. बँक ऑफ इंडियाचे अधिकारी अमोल सांगळे यांनी वार्षिक पतपुरवठ्याबाबत माहिती दिली. तत्पूर्वी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बसवराज बिराजदार यांनी खरीप हंगामाच्या तयारीबाबत सादरीकरण केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com