Agriculture news in Marathi Provide electricity for farming twelve hours a day | Page 2 ||| Agrowon

शेतीसाठी दिवसा बारा तास विद्युतपुरवठा करा : मंत्री सुनील केदार

टीम अॅग्रोवन
सोमवार, 18 ऑक्टोबर 2021

शेतीचे विद्युत कनेक्शन खंडित करू नये. या काळात शेतकऱ्यांना दिवसा बारा तास नियमित विद्युतपुरवठा करा, अशा सूचना पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास, क्रीडा व युवक कल्याणमंत्री सुनील केदार यांनी दिल्या.

नागूपर : शेतकऱ्यांचे धानाचे पीक गर्भात आहे, ते निसवण्याच्या स्थितीत आहे. अशा परिस्थितीत त्यांचे शेतीचे विद्युत कनेक्शन खंडित करू नये. या काळात शेतकऱ्यांना दिवसा बारा तास नियमित विद्युतपुरवठा करा, अशा सूचना पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास, क्रीडा व युवक कल्याणमंत्री सुनील केदार यांनी दिल्या.

कामठी व मौदा तालुक्यांतील विजेच्या लोडशेडिंगमुळे धान पिकाचे होणाऱ्या नुकसानीबाबत उपाययोजनेसाठी विदर्भ को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशनच्या कार्यालयात रविवारी (ता. १७) बैठकीचे आयोजन करण्यात आले, त्या वेळी श्री. केदार  बोलत होते. 

जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन सभापती तापेश्‍वर वैद्य, सदस्या अवंतिका लेकुरवाडे, नरेश ठाकरे, कार्यकारी अभियंता श्री. दोडके, महावितरणचे वरिष्ठ अधिकारी या वेळी उपस्थित होते.

शेतकऱ्यांच्या शेतीला या परिस्थितीत विद्युतपुरवठा खंडित केल्यास पाण्याच्या अभावी धान पिकाचे अतोनात नुकसान होईल. त्यामुळे शेतकऱ्यांना वीज देयक अदा करण्यासाठी १५ दिवसांची सवलत देण्यात यावी. कोणतीही पूर्वसूचना न देता विद्युत कनेक्शन कपात करू नये. अवैद्य विद्युतपुरवठा धारकांचा लेखी अहवाल सादर करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

विद्युत देयक वसुलीसाठी लवकरच शिबिराचे आयोजन करून शेतकऱ्यांकडून वसुली करण्यात येणार आहे. यामध्ये प्रलंबित देयकांची रक्कम अदा करण्याचे त्यांनी सांगितले. या वेळी नागेश्‍वर नगर, शिवनी, नेरी, भूगाव आदी गावांच्या समस्या मंत्री महोदयांनी जाणून घेतल्या. त्यावर लवकरच तोडगा काढण्यात येणार आहे. सर्व ग्रामपंचायतींनी चालू महिन्याचे विद्युत देयक तत्काळ भरावे. जेणेकरून स्ट्रीट लाइट बंद होणार नाही व ग्रामस्थांना रात्री ये-जा करताना त्रासापासून मुक्तता मिळेल. बरेचशा गावात चुकीच्या रीडिंगच्या आधारावर अनियमित देयक देण्यात आल्याचे या वेळी सांगण्यात आले. त्याबाबत योग्यती चौकशी करून अहवाल सादर करण्याच्या सूचना श्री. केदार यांनी दिल्या. या वेळी लोकप्रतिनिधी, पदाधिकारी उपस्थित होते.


इतर अॅग्रो विशेष
कृषी विजबिले अवास्तवअकोला ः ग्रामीण भागात सध्या एकीकडे रब्बीची लगबग...
अवकाळीच्या सावटामुळे द्राक्ष पट्ट्यात...नाशिक : गेल्या काही वर्षांपासून पूर्वहंगामी...
हापूस आंब्याचा हंगाम धोक्यातरत्नागिरी ः कोरोनातील बिकट परिस्थितीचा सामना करत...
अभ्यासपूर्ण व्यवस्थापनातून दर्जेदार...जळके (ता.जि. जळगाव) येथील राजेश पाटील यांनी केळी...
आदर्श असावा तर खडतरे कुटुंबासारखामुक्त गोठा पद्धत, नेटके व्यवस्थापन, कुटुंबाची एकी...
कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात...पुणे : राज्याच्या किमान तापमानाचा पारा १५...
शेवगा २००० रुपये प्रतिदहा किलोपुणे ः पुणे बाजार समितीमध्ये रविवारी (ता.२८)...
धुळीमुळे शेतकऱ्यांचे ‘पांढरे सोने’...गुमगाव, जि. नागपूर : कोतेवाडा, सोंडेपार शिवारातील...
तांदूळ महागणार ; अवकाळी पावसामुळे...नागपूर : नवीन तांदळाच्या हंगामास सुरुवात झाली आहे...
कामे पूर्ण केलेल्या शेतकरी गटांचे ...पुणेः समूह शेती योजनेत भाग घेतलेल्या शेतकरी...
अनुदान वितरणासाठीची नवी प्रणाली सर्वत्र...पुणे ः कृषी योजनांसाठी दिलेल्या निधीचा उपयोग...
 पन्नास एकरांवर शुगरबीट लागवड कोल्हापूर : महापुराने अस्वस्थ झालेल्या शेतकऱ्याला...
  वखारच्या ऑनलाइन शेतीमाल तारण कर्जात...पुणे : राज्य वखार महामंडळाच्या ऑनलाइन (ब्लॉकचेन)...
डाळिंबाच्या सुकर वाटेसाठी गडकरी...जालना : संपूर्ण राज्यात महत्वाचे फळपीक असलेल्या...
वीज पुरवठा सुरळीत  करण्यासाठी इंदापुरात...पुणे ः जिल्ह्याच्या विविध तालुक्यातील थकबाकीदार...
सोयाबीन दराची घोडदौड सुरूच राहणार पुणे ः तेलबिया आणि खाद्यतेलाच्या दारातील...
शास्त्रीय पशुपालनातून मिळवले आर्थिक...कोल्हापूर जिल्ह्यातील सावर्डे (ता. हातकणंगले)...
जळगाव जिल्ह्यात बोंडअळीचा उद्रेकजळगाव ः जिल्ह्यात यंदा शेतकऱ्यांना अतिवृष्टीने...
राज्यात पावसाला पोषक हवामान पुणे : राज्याच्या किमान तापमानात आणखी घट झाल्याने...
पावसाला पोषक हवामानामुळे किमान तापमानात...पुणे : पावसाने उघडीप दिल्यानंतर राज्याच्या किमान...