‘कोरोना’च्या चाचणी, रोगनिदानासाठी तांत्रिक यंत्रसामग्री, सुविधा उपलब्ध करून द्या

परभणी ः परभणी येथील पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालयातील सूक्ष्मजीवशास्त्र विभागाअंतर्गंतच्या जैवतंत्रज्ञान प्रयोगशाळेत ‘कोरोना’ विषाणू चाचणी, रोगनिदानासाठी आवश्यक तांत्रिक कर्मचारी वर्ग आणि यंत्रसामग्री आदी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ८१ लाख ६४ हजार रुपये निधीची गरज आहे. जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून हा खर्च करता येईल. या प्रयोगशाळेस आवश्यक खर्चास मान्यता देण्यात यावी यासाठी जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी आरोग्य विभागाच्या प्रधान सचिवांकडे प्रस्ताव सादर केला आहे.
Provide facilities for Corona testing, diagnostics and technical equipment

महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठअंतर्गंत परभणी येथील पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालयातील सूक्ष्मजीवशास्त्र विभागाअंतर्गत सुसज्ज अशी जैवतंत्रज्ञान प्रयोगशाळा आहे.या ठिकाणी रोगनिदान विषयक सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध आहेत.विभागातील शास्त्रज्ञ सातत्याने विषाणू विषयक संशोधन तसेच प्राण्यांच्या साथीच्या

आजारांचे निदान करण्यामध्ये तज्ज्ञ आहेत. या प्रयोगशाळेस अधिक बळकट करून या ठिकाणी ‘कोरोना’ विषाणूच्या निदानाची सुविधा उपलब्ध करणे शक्य आहे. त्याअनुषंगाने पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता तथा प्राचार्य डाॅ.नितीन मार्कंडेय, सूक्ष्मजीवशास्त्र विभाग प्रमुख डाॅ. आनंद देशपांडे यांनी जिल्हा प्रशासनास प्रस्ताव सादर केला. त्यात प्रयोगशाळेसाठी तांत्रिक कर्मचारी वर्ग तसेच त्यासाठी लागणारी यंत्रसामग्री आदी बाबींसाठी ८१ लाख ६४ हजार रुपये निधीची गरज आहे. त्यात यंत्रसामग्रीसाठी ५३ लाख ८ हजार रुपये, आवश्यक रसायनासाठी २२ लाख रुपये, मनुष्यबळासाठी ६ लाख ८४ हजार रुपये आदी खर्चाचा समावेश आहे. 

आर्थिक पाठबळ मिळाल्यानंतर या प्रयोगशाळेत ‘कोरोना’ संशयितांच्या घशातील स्त्राव (थ्रोट स्वॅाब) ची तपासणी करून तत्काळ रोगनिदान करता येऊ शकते. सामाजिक आरोग्याच्या दृष्टीने या प्रस्तावाचा विचार करुन पशुवैद्यक महाविद्यालयातील शास्त्रज्ञांना या ‘कोरोना’ विषाणूच्या साथीमध्ये जनतेला मदत करण्याची संधी द्यावी अशी विनंती डाॅ. मार्कंडेय आणि डाॅ. देशपांडे यांनी केली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com