नियमित पाण्यासह सुविधा पुरविणार : नाईक

सिंधुदुर्ग ः पुनर्वसन झालेल्या गावठणात नियमित पाणीपुरवठा करण्यासोबत प्रत्येक गावठणात एक विंधनविहीर खोदण्यात येईल.
 To provide facilities with regular water: Naik
To provide facilities with regular water: Naik

सिंधुदुर्ग  ः ‘‘पुनर्वसन झालेल्या गावठणात नियमित पाणीपुरवठा करण्यासोबत प्रत्येक गावठणात एक विंधनविहीर खोदण्यात येईल. याशिवाय विविध पायाभुत सुविधांची पुर्तता लवकर करण्यात येईल,’’ असे आश्‍वासन पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता बी. जी. नाईक यांनी अरूणा प्रकल्पग्रस्तांना दिले.

अकराशे कोटीवर खर्च झालेल्या अरूणा प्रकल्पाच्या घळभरणीचे काम जानेवारी २०१९ मध्ये सुरू झाले. मे २०१९ मध्ये ते पूर्ण झाले. घळभरणीपूर्वी प्रकल्पग्रस्तांचे १०० टक्के पुनर्वसन करण्यात यावे, अशी मागणी प्रकल्पग्रस्तांची होती. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांच्या एका गटाने सहा महिने सातत्याने आंदोलन छेडले. परंतु, तरीही प्रकल्पाची घळभरणी करण्यात आली. अरूणा प्रकल्पामुळे आखवणे, नागपवाडी, भोम ही तीन गावे बाधित झाली.

या तीनही गावातील प्रकल्पग्रस्तांसाठी मांगवली, कुभांरवाडी, कुसुर, हेत किंजळीचा माळ येथे पुनवर्सन भुखंड निर्माण करण्यात आले. बहुतांशी प्रकल्पग्रस्तांचे पुनवर्सन मांगवली तिठा येथे करण्यात आले. 

दरम्यान, तेथे नियमित पाणीपुरवठा सुरू करावा, रस्त्याची दुरूस्ती करावी, प्रत्येक गावठणात विंधन विहीर खोदावी, स्ट्रीट लाईटचे काम पूर्ण करावे, शाळेच्या छप्पराला लागलेली गळती काढावी, प्रकल्पग्रस्तांना शेतजमीन उपलब्ध करून द्यावी, प्रकल्पाचे पाणी प्रकल्पग्रस्तांना द्यावे, आदी मागण्यांसह २३ नागरी सुविधांसाठी नाईक यांची भेट घेण्यात आली. यावेळी कृती समितीचे अध्यक्ष आकाराम नागप, सेक्रेटरी डॉ. जगन्नाथ जामदार, अनिल नागप, संतोष नागप, अभय कांबळे, संजय कांबळे उपस्थित होते. 

ज्या रस्त्याचे काम निकृष्ट झाले आहे, त्या रस्त्यांची दुरूस्ती देखील करून देण्यात येईल, असे आश्‍वासन नाईक यांनी दिले. यावेळी प्रकल्पग्रस्तांनी विविध मागण्यांचे निवेदन अधिकाऱ्यांना दिले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com