बंदिस्त शेळीपालनासाठी खाद्य पुरवठा करा

कोरोना टाळेबंदीमध्ये बंदीस्त तसेच मुक्त शेळीपालन करणाऱ्या शेळ्यांसाठी खाद्य पुरवठा खंडीत झाला आहे. यामुळे हा खाद्य पुरवठा तातडीने सुरु करावा.
Goat Farming.
Goat Farming.

पुणे: कोरोना टाळेबंदीमध्ये बंदीस्त तसेच मुक्त शेळीपालन करणाऱ्या शेळ्यांसाठी खाद्य पुरवठा खंडीत झाला आहे. यामुळे हा खाद्य पुरवठा तातडीने सुरु करावा, अशी मागणी गोट फार्मस असोसिएशनने मुख्यमंत्र्यांसह पशुसंवर्धन मंत्र्यांकडे केली आहे. दिवसेंदिवस कमी होत असलेल्या पशुखाद्यामुळे शेळ्यांचे कुपोषण होऊन, वजन देखील घटण्याचा धोका निर्माण झाला आहे.  याबाबतचे निवेदन असोसिएशनचे सचिव पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांच्यासह पशुसंवर्धन आयुक्त सच्चिंद्र प्रतापसिंह यांना दिले आहे.  निवेदनात म्हटले आहे की, २०१९ च्या पशुगणनेनुसार राज्यात १ कोटी ६ लाख शेळ्या मेंढ्या असून, शेळी पालनात राज्याचा क्रमांक देशात ६ वा आहे. तर या व्यवसायावर अवलंबून असणाऱ्या कुटुंबाची संख्या सुमारे २० लाख एवढी आहे. मात्र सध्याच्या कोरोना टाळेबंदीमुळे पशुखाद्य, चाऱ्याच्या वाहतुकीचा प्रश्‍न निर्माण झाला असून, पशुखाद्य संपत चालले आहे. यामुळे शेळ्यामेंढ्यांचे कुपोषण होऊन वजन घटण्याचा धोका निर्माण झाला आहे. तर भविष्यातील आर्थिक मंदीचा फटका देखील बसणार असून, शेळ्या मेंढ्याचे दर देखील कमी होण्याचा धोका आहे. यामुळे भविष्यात मांस उत्पादनात घट होऊ नये यासाठी १०० टक्के अनुदानावर तीन महिने पशुखाद्य आणि चारा उपलब्ध करु द्यावे.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com