agriculture news in Marathi, Provide fodder by number of livestock | Agrowon

पशुधन संख्येनुसार चारा उपलब्ध करून द्या

टीम अॅग्रोवन
शनिवार, 19 जानेवारी 2019

परभणी ः परभणी जिल्ह्यात गेल्या काही वर्षांत पशुधन संख्येत वाढली झाली आहे. त्यामुळे चारा, वैरणीची गरजदेखील वाढली आहे. त्यामुळे पशुसंवर्धन विभागाने आधीच्या पशुगणनेनुसार पशुधनाची संख्येनुसार येत्या जूनपर्यंत चारा उपलब्ध असेल, असा जिल्हा प्रशासनास सादर केलेला अहवाल दिशाभूल करणारा आहे. दुष्काळी स्थितीमुळे चाऱ्याची उपलब्धता खूप कमी राहणार आहे. त्यामुळे येत्या जिल्ह्यातील शेतकरी, पशुपालकांना येत्या जूनपर्यंत पशुधनाचा सांभाळ करण्यासाठी निर्माण होणारा चाऱ्याचा तुटवडा भरून काढण्यासाठी नियोजन करण्यात यावे, अशी मागणी अखिल भारतीय किसान सभेतर्फे कॉम्रेड विलास बाबर यांनी केली आहे.

परभणी ः परभणी जिल्ह्यात गेल्या काही वर्षांत पशुधन संख्येत वाढली झाली आहे. त्यामुळे चारा, वैरणीची गरजदेखील वाढली आहे. त्यामुळे पशुसंवर्धन विभागाने आधीच्या पशुगणनेनुसार पशुधनाची संख्येनुसार येत्या जूनपर्यंत चारा उपलब्ध असेल, असा जिल्हा प्रशासनास सादर केलेला अहवाल दिशाभूल करणारा आहे. दुष्काळी स्थितीमुळे चाऱ्याची उपलब्धता खूप कमी राहणार आहे. त्यामुळे येत्या जिल्ह्यातील शेतकरी, पशुपालकांना येत्या जूनपर्यंत पशुधनाचा सांभाळ करण्यासाठी निर्माण होणारा चाऱ्याचा तुटवडा भरून काढण्यासाठी नियोजन करण्यात यावे, अशी मागणी अखिल भारतीय किसान सभेतर्फे कॉम्रेड विलास बाबर यांनी केली आहे.

कृषी विद्यापीठे तसेच पशुवैद्यकीय महाविद्यालयातील तज्ज्ञांनी जनावरांची वजनानुसार प्रतिदन लागणाऱ्या चाऱ्याची गरज निश्चित केलेली आहे. त्यानुसार पशुसंवर्धन विभागाने जिल्ह्यतील पशुधनासाठी चाऱ्याचे नियोजन करणे आवश्यक आहे. चारा उपलब्धतेचे नियोजन करताना पशुसंर्वधन विभागाने २०१२ च्या पशुगणनेनुसार जिल्ह्यातील एकूण ४ लाख २४ हजार ४०४ पशुधन घटकांसाठी महिन्याला ७६ हजार ३९३ टन चाऱ्यानुसार तसेच विविध पिकांपासून उपलब्ध होणाऱ्या अपेक्षित ६ लाख ९८ हजार ३७३ टन चारा येत्या जूनपर्यंत उपलब्ध राहील, असा अहवाल सादर केलेला आहे.

जिल्ह्यातील दुष्काळी स्थितीमुळे खरीप ज्वारी, बाजरी पासून अत्यंत कमी चारा उपलब्ध झाला आहे. रब्बी ज्वारीचे क्षेत्र कमी झाले आहे. त्यामुळे येत्या जूनपर्यंत पुरेल एवढा चारा उपलब्ध होण्याची अजिबात शक्यता नाही. त्यामुळे पशुसंवर्धन विभागाने जूनपर्यंत चारा पुरेल असा जिल्हा प्रशासनास सादर केलेला अहवाल दिशाभूल करणारा आहे.

७ वर्षांमध्ये पशुधनाच्या संख्येत तीन पटीने वाढ
वास्तविक पाहाता २०१२ ते २०१९ या ७ वर्षांमध्ये जिल्ह्यातील पशुधनाची संख्या तीन पटीने वाढली आहे. २०१२ मध्ये शासकीय दुग्ध योजनेअंतर्गत प्रतिदिन ११ हजार १२३ लिटर दूध संकलन होत असे. सध्या प्रतिदिन ५० हजार लिटर दूध संकलन होत आहे. यावरून पशुधनाची संख्या वाढल्याचे स्पष्ट होत आहे. पशुधनाची वाढलेली संख्या आणि तज्ज्ञांनी निश्चित केलेल्या चाऱ्याच्या गरजेनुसार २०१२ मधील पशुगणनेतील पशुधनास महिन्याला २ लाख ६१ हजार टन चारा लागेल.


इतर ताज्या घडामोडी
कोल्हापूर बाजार समिती नोकर भरतीविरोधात...कोल्हापूर: येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत...
नगर : मक्‍याला हमीभावापेक्षा कमी दर...नगर ः रब्बी हंगामामध्ये शासनाच्या किमान आधारभूत...
सातारा जिल्ह्यात खरिपाच्या ८२.८५ टक्के...सातारा  ः पावसाचा काहीसा जोर वाढल्याने...
पुणे बाजार समितीसह उपबाजार ...पुणे  ः ‘कोरोना’च्या फैलावामुळे शहरातील...
नगर जिल्ह्यात एक लाख १७ हजार हेक्टरवर...नगर  ः जिल्ह्यात यंदा जुलैच्या पहिल्याच...
अमरावतीत बियाणे कंपनीकडून ९०१ बॅग, २२...अमरावती : जिल्ह्यात सोयाबीन बियाणे उगवणीबाबत १...
कोविड-१९ रुग्णांच्या वास, चव संवेदनांवर...कोविड १९ च्या आजारातून बरे झाल्यानंतरही सुमारे ९०...
खानदेशात दुबार पेरणीसाठी ताग, बाजरी,...जळगाव  ः खानदेशात दुबार पेरणी आटोपली आहे....
जळगावमधील सिंचन प्रकल्पांची कामे...जळगाव  ः जिल्ह्यात तापी व गिरणा नदीवर...
निकृष्ट बियाणेप्रकरणी सर्व कंपन्यांवर...नगर: जिल्ह्यात गेल्या एक महिन्याच्या कालावधीत...
बॅंकांनी पीककर्ज प्रकरणे तत्काळ मार्गी...वर्धा  ः जिल्ह्यात पात्र शेतकऱ्यांपैकी एकही...
गोंदिया जिल्ह्यात युरियाची टंचाईगोंदिया  ः पावसामुळे धान रोवणीला वेग आल्याने...
औरंगाबाद जिल्ह्यात खतांचा पुरवठा सुरळीत...औरंगाबाद : जिल्ह्यात ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर...
अकोल्यात तूर सरासरी ५८०० रुपये क्विंटलअकोला  ः  येथील कृषी उत्पन्न बाजार...
सांगली जिल्ह्यातील तीन केंद्रांवर २०२३...सांगली  ः जिल्ह्यात हमीभावाने मका खरेदीसाठी...
रत्नागिरी जिल्ह्यात भात, नाचणी पिकासाठी...रत्नागिरी  : रत्नागिरी जिल्ह्यात भात, नाचणी...
आरोग्यदायी दालचिनीमसाल्यांच्या पदार्थांत, घरात मसाला करताना...
कोकण, कोल्हापूर पट्ट्यात मुसळधार...कोकण व कोल्हापूर भागावर १००२ तर महाराष्ट्रावर...
कोल्हापुरात दिड हजार, खते, बियाणे...कोल्हापूर  : बियाण्यांच्या उगवणीप्रश्नी...
सांगली जिल्ह्यात दोन लाख १९ हजार हेक्‍...सांगली : जिल्ह्यात पावसांचा खंड असला तरी  ...