द्राक्ष उत्पादकांना शासकीय मदत द्या : बागायतदार संघाची मागणी

द्राक्ष उत्पादकांना शासकीय मदत द्या
द्राक्ष उत्पादकांना शासकीय मदत द्या

नाशिक : जिल्ह्यातील सटाणा, मालेगाव, देवळा, निफाड, दिंडोरी या तालुक्यांमध्ये द्राक्ष बागांचे मोठे नुकसान झाले आहे. अशा परिस्थितीत द्राक्ष उत्पादकांना उभारी देण्यासाठी शासकीय मदत द्यावी, अशी एकमुखी मागणी द्राक्ष बागायतदार संघाच्या संचालकांनी बैठकीत केली. 

नाशिक विभागातील चांदवड, मालेगाव, नाशिक, दिंडोरी, देवळा या तालुक्यांतील विविध भागांत जाऊन महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाच्या पदाधिकाऱ्यांनी नुकतीच पाहणी केली. संघाचे अध्यक्ष राजेंद्र पवार, उपाध्यक्ष, शिवाजी पवार, मध्यवर्ती संशोधन समितीचे अध्यक्ष अरविंद कांचन, पुणे विभागीय अध्यक्ष राम धावणे, कोशाध्यक्ष कैलास भोसले, सोलापूर विभागीय अध्यक्ष आशिष काळे, नाशिक विभागीय अध्यक्ष रवींद्र बोराडे, माजी अध्यक्ष अशोक गायकवाड, माणिकराव पाटील, मानद सचिव अरुण मोरे यांच्यासह विभागीय संचालक उपस्थित होते. या वेळी दौऱ्याचा समारोप झाल्यानंतर बुधवारी (ता. ६) ओझर मिग येथे द्राक्ष बागायतदार संघाच्या कार्यालयात बैठक झाली. 

कायमस्वरूपी योजना आखून संस्थात्मक पातळीवर भांडवल उभे करण्याचा प्रयत्न असून, त्या माध्यमातून विमा कंपन्यांसोबत काम करण्याचा प्रयत्न असल्याची भूमिका राजेंद्र पवार यांनी मांडली. नुकसानीबाबत तातडीने कृषी आयुक्त व सचिवांना भेटून द्राक्ष उत्पादकांना मदत देण्यासाठी शासकीय मदतीची मागणी करण्यात येईल असे श्री. पवार यांनी सांगितले. 

पीकविम्याबाबत नाशिक विभागीय संचालक यतीन कदम म्हणाले, की संघाने पुढाकार घेऊन विम्याबाबत जनजागृती करावी. विमा हा बंधनकारक असावा. त्यातून शेतकऱ्यांचे प्रबोधन व्हावे, शेतकऱ्यांनी विमा योजनेत सहभाग नोंदवला तर मोठ्या पातळीवर त्याचे चांगले परिणाम होतील आणि त्याचा फायदा शेतकऱ्यांना होईल. यासाठी संघाने मध्यस्थी करावी.

बैठकीतील प्रमुख मागण्या

  • शेतकऱ्यांना १०० टक्के नुकसानभरपाई द्यावी.
  • जुने कर्ज माफ करून नवीन पीककर्ज उपलब्ध करून द्यावे. 
  • द्राक्षबागांकरिता पीक संरक्षण यंत्रणा उभी करून शासनाने अनुदान द्यावे. 
  • आर्थिक आपत्तीमध्ये दीर्घकालीन धोरणांची अंमलबजावणी करावी. 
  • द्राक्षबागांसंबंधी असलेल्या जाचक अटी शिथिल कराव्यात. 
  • पंचनाम्यांना गती देण्यासाठी करण्यासाठी ड्रोनचा वापर करावा. 
  • जुन्या अधिसूचनेप्रमाणे १५ ऑक्टोबरपासून बाधित बागांना विमा भरपाई द्यावी.
  • रासायनिक कीटकनाशके आणि खतांवरील जीएसटी कमी करावा.
  • द्राक्ष बागायतदार संघाच्या संस्थात्मक पातळीवर मांडण्यात आलेल्या मागण्या सरकार आणि कृषी विभागाकडे मांडण्यात येतील. लोकप्रतिनिधींना सोबत घेऊन मागण्यांबाबत पाठपुरावा करण्यात येईल. राज्यातील अनेक ठिकाणी द्राक्षबागा व इतर पिकांचे नुकसान झाले असून, शेतकऱ्यांना कसा दिलासा देत येईल यासाठी प्रयत्न केले जातील. - राजेंद्र पवार, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघ, पुणे

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com