ग्रामीण भागात आरोग्यसेवा द्या : भगतसिंह कोश्यारी

ग्रामीण भागात आरोग्यसेवा द्या : भगतसिंह कोश्यारी
ग्रामीण भागात आरोग्यसेवा द्या : भगतसिंह कोश्यारी

नाशिक : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातून पदवी घेतलेल्या वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या स्नातकांनी राष्ट्राप्रती समर्पण भावनेने काम करीत ग्रामीण भागात आरोग्य सेवा द्यावी, असे आवाहन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापिठाच्या एकोणिसाव्या दीक्षान्त समारंभ मंगळवार (ता. २१) रोजी पार पडला. या वेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला विद्यापीठाचे प्र-कुलपती तथा वैद्यकीय शिक्षणमंत्री अमि़त देशमुख, पालकमंत्री छगन भुजबळ, कुलगुरू डॉ. दिलीप म्हैसेकर, प्रतिकुलगुरू डॉ. मोहन खामगावकर, डॉ. तात्याराव लहाने, ‘आयुष’चे संचालक कुलदीप राज कोहली, कुलसचिव डॉ. के. डी. चव्हाण, परीक्षा नियंत्रक डॉ. अजित पाठक आदी उपस्थित होते.  श्री. कोश्यारी म्हणाले, की समाजसेवेला प्राधान्य देऊन सेवाभावनेने कार्य केल्यास वैद्यकीय क्षेत्रातील खरे समाधान विद्यार्थ्यांना मिळविता येईल. भारतीय प्राचीन पंरपरेने आयुर्वेदासारखी मोठी देणगी आपल्याला दिली आहे. अशा पारंपारिक ज्ञानाला पुनरुज्जीवित करण्याचे प्रयत्न व्हावेत, त्याचबरोबर आंतरविद्याशाखीय दृष्टिकोन ठेवून वैद्यकीय क्षेत्रातील ज्ञान मिळविण्याचा स्नातकांनी प्रयत्न करावा, व्यापकज्ञान प्राप्त रुग्णसेवेच्या क्षेत्रात आदर्श कार्य घडेल, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला.  श्री. भुजबळ म्हणाले, की पदवी प्राप्त विद्यार्थ्यांनी समाजसेवेसाठी आपल्या ज्ञानाचा उपयोग करावा आणि आपल्या कार्याने विद्यापीठाचे नाव देशपातळीवर पोचविण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी. नाशिक येथे आरोग्य विज्ञान विद्यापीठ असताना वैद्यकीय महाविद्यालय आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू व्हावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. कुलगुरू म्हैसेकर म्हणाले, की राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विद्यापीठांबरोबर सामंजस्य करार करण्यासाठी विद्यापीठाने आंतरराष्ट्रीय शैक्षणिक केंद्र सुरू केले आहे. आदिवासी व ग्रामीण भागातील जनतेच्या आरोग्य संवर्धनासाठी विद्यापीठाने ‘सर्वांसाठी परिपूर्ण आरोग्य’ हा उपक्रम सुरू केला आहे. विद्यापीठाच्या परीक्षांचे निकाल ३० दिवसांच्या कालावधीत जाहीर करण्यात आले आहेत, अशी माहिती त्यांनी दिली. दीक्षान्त समारंभात ६२ गुणवतांना सुवर्ण पदके आणि १४ विद्यार्थ्यांना पीएचडी प्रदान करण्यात आली.  राष्ट्रभाषेत प्रिस्क्रिप्शन लिहा डॉक्टरांनी लिहलेली प्रिस्क्रिप्शन फक्त मेडिकलवाल्यांना समजते. ती इतरांनी कळायला हवी म्हणून राष्ट्रभाषेत लिहावी,’’ असे आवाहन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com