Agriculture news in Marathi Provide high quality seeds: Collector Yedge | Agrowon

उत्कृष्ट दर्जाचे बियाणे उपलब्ध करून द्यावे ः जिल्हाधिकारी येडगे

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 7 मे 2021

दैनंदिन पाठपुरावा करून जिल्ह्यात बियाणे, खते आदींची कमतरता पडणार नाही, याबाबत कृषी विभागाने सूक्ष्म नियोजन करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिल्या.

यवतमाळ : चांगली उगवणक्षमता असलेले बियाणे तसेच उत्कृष्ट दर्जाच्या कृषी निविष्ठा शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्याची जबाबदारी कृषी विभागाची आहे. त्यासाठी दैनंदिन पाठपुरावा करून जिल्ह्यात बियाणे, खते आदींची कमतरता पडणार नाही, याबाबत कृषी विभागाने सूक्ष्म नियोजन करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय कृषी निविष्ठा संनियंत्रण समितीच्या बैठकीत ते बोलत होते. या वेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नवनाथ कोळपकर, जिल्हा परिषद कृषी विकास अधिकारी राजेंद्र माळोदे, ‘महाबीज’चे जिल्हा व्यवस्थापक अशोक ठाकरे आदी उपस्थित होते.

जास्तीत जास्त उगवणक्षमता असलेल्या घरगुती सोयाबीन बियाण्यांचा वापर करण्याचे शेतकऱ्यांना आवाहन करा, असे सांगून जिल्हाधिकारी श्री. येडगे म्हणाले, की महाबीजने जिल्ह्याला सोयाबीन बियाण्यांचा पर्याप्त स्वरूपात पुरवठा करावा. तसेच खासगी कंपन्यांकडून सुद्धा जास्तीत जास्त सोयाबीनचे बियाणे जिल्ह्याला उपलब्ध होईल, यासाठी पाठपुरावा करावा. जिल्ह्यात बोगस बियाण्यांचे वाटप होता कामा नये. अशी प्रतिष्ठाने शोधण्यासाठी टीममार्फत शोधमोहीम राबवा. तसेच चोरट्या मार्गानेसुद्धा बियाण्यांची वाहतूक न होऊ देण्यासाठी पोलिस विभागाची मदत घ्या. जिल्ह्यात अप्रामाणिक नमुने सापडल्यास तत्काळ कारवाई करा.

कृषी सहायक शेतकऱ्यांच्या बांधावर दिसले पाहिजे. त्यांच्यामार्फत शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन करून मोबाईल संदेशाच्या माध्यमातून सुद्धा कृषी विभागाने शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावे. जिल्ह्यात सर्व कृषी निविष्ठा वेळेत उपलब्ध होतील, यासाठी दक्ष राहावे. तसेच निविष्ठा वाटपाचे काम कोविड प्रतिबंधात्मक वर्तणुकीचे पालन करून करण्यात यावे, अशा सूचना दिल्या.

खरीप हंगामासाठी जिल्ह्यात सोयाबीनचे १ लाख ३१ हजार २४२ क्विंटल बियाणे, तूर १५००८ क्विंटल बियाणे, ज्वारी १०६५ क्विंटल, मूग ७७० क्विंटल, उडीद ७६० क्विंटल बियाण्यांची, तर कापसाच्या २५ लाख ५९ हजार २५६ पॅकेटची मागणी नोंदविण्यात आली आहे. जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात एक या प्रमाणे १६ भरारी पथकांची स्थापना तालुका कृषी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आली आहे.

 


इतर बातम्या
फळपीक विमा योजनेत त्रुटी, गोंधळसोलापूर ः पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा...
पूर्व विदर्भात मुसळधार शक्य पुणे : कोकण ते केरळ दरम्यान असलेले कमी दाबाचे...
पूर्वहंगामी द्राक्षाचे विमा कवच चारपट...नाशिक : गेल्या काही वर्षांत नैसर्गिक आपत्तीमुळे...
‘एचटीबीटी’ बियाण्याची पाळेमुळे...पुणे ः देशात अवैध तणनाशक सहनशील ‘एचटीबीटी’ कापूस...
डाळिंब विमा अर्जासाठी १४ जुलैपर्यंत...सांगली : पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत पुनर्रचित...
उसासाठी यंदाची ‘एफआरपी’ जाहीर कराकोल्हापूर : यंदाच्या गळीत हंगामातील उसाची एफआरपी...
कांदा व्यापाऱ्याकडून शेतकऱ्याला मारहाण नाशिक : जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये कांद्याची...
शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड  ...नाशिक : राज्यात खरीप हंगामास सुरुवात झाली असून,...
अमरावती जिल्हा परिषदेची सभा...अमरावती : पीकविमा भरपाई, समृद्धी महामार्गाच्या...
संत्रा आयात शुल्क कपातीसाठी प्रयत्न करा...नागपूर : विदर्भाचे मुख्य फळपीक असलेल्या...
दूधदरप्रश्‍नी वैजापूर बाजार समितीच्या...औरंगाबाद : दूध उत्पादकांच्या मागण्याच्या...
खेडमध्ये बटाटा लागवडीस वेगचास, जि. पुणे : खेड तालुक्यात बटाटा लागवडीस...
स्थानिक काजूची आवक आजरा तालुक्यात...आजरा, जि. कोल्हापूर : आजरा बाजारपेठेत स्थानिक...
लाभार्थी शेतकऱ्यांचे अनुदान तातडीने अदा...बुलडाणा : शासन शेतकऱ्यांचा जीवनस्तर उंचविण्यासाठी...
पुणे बाजार समितीची ‘प्रादेशिक’ अधिसूचना...पुणे : पुणे बाजार समितीची निवडणूक टाळून सत्ता एका...
कांद्याची २५ दिवसांत विक्रमी अकरा लाख...नाशिक : जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार...
खानदेशात युरियाप्रश्नी प्रशासनाची धावपळजळगाव :  खानदेशात खरिपाला सुरवात होत असतानाच...
‘डीएससी’त अडथळे  आणल्यास कारवाई करापुणे ः राज्यातील सरपंच व ग्रामसेवकांचे संगणकीय...
खानदेशात बाजार समित्यांचे कामकाज पूर्ववतजळगाव :  खानदेशात बाजार समित्यांचे कामकाज...
विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन ५, ६ जुलै... मुंबई : कोरोना संकटाची सध्याची स्थिती पाहता आणि...