Agriculture news in marathi, Provide immediate assistance to flood victims: Guardian Minister Deshmukh | Agrowon

पूरग्रस्तांना तत्काळ मदत द्या :पालकमंत्री देशमुख
टीम अॅग्रोवन
शनिवार, 17 ऑगस्ट 2019

सोलापूर  : ‘‘जिल्ह्यातील पूरग्रस्तांना तत्काळ आर्थिक मदत द्या,’’ अशा सूचना पालकमंत्री विजय देशमुख यांनी गुरुवारी (ता. १५) येथे दिल्या.

स्वातंत्र्य दिनाच्या ध्वजारोहण कार्यक्रमानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील पूरस्थितीचा आढावा घेण्याबाबत देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, पोलिस आयुक्त अंकुश शिंदे, महापालिका आयुक्त दीपक तावरे, पोलीस अधीक्षक मनोज पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ, अतिरिक्त पोलिस उपायुक्त विजय मगर, अधीक्षक अभियंता संतोष शेलार, अधीक्षक अभियंता धीरज साळे आदी उपस्थित होते.

सोलापूर  : ‘‘जिल्ह्यातील पूरग्रस्तांना तत्काळ आर्थिक मदत द्या,’’ अशा सूचना पालकमंत्री विजय देशमुख यांनी गुरुवारी (ता. १५) येथे दिल्या.

स्वातंत्र्य दिनाच्या ध्वजारोहण कार्यक्रमानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील पूरस्थितीचा आढावा घेण्याबाबत देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, पोलिस आयुक्त अंकुश शिंदे, महापालिका आयुक्त दीपक तावरे, पोलीस अधीक्षक मनोज पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ, अतिरिक्त पोलिस उपायुक्त विजय मगर, अधीक्षक अभियंता संतोष शेलार, अधीक्षक अभियंता धीरज साळे आदी उपस्थित होते.

देशमुख म्हणाले, ‘‘पंढरपूर आणि माळशिरस तालुक्यात पुराचा फटका बसला आहे. या तालुक्यासह इतर तालुक्यातील पूरग्रस्तांना रोख मदतीचे वाटप करा. शेतीचे, घराच्या नुकसानीचे पंचनामे करून मदतीसाठी शासनाकडे अहवाल पाठवावा.’’

दरम्यान, हिप्परगा तलावात पाणी सोडण्याबाबतही चर्चा झाली. ‘‘महापालिकेने हिप्परगा तलावात पाणी सोडण्यासाठी पंप बसवले आहेत. पण जलसंपदा विभागाकडून पाणी कालव्यात पाणी सोडले जात नसल्यामुळे हिप्परगा तलावात पाणी सोडता येत नाही,’’ असे तावरे यांनी सांगितले. यावर कालव्यात पाणी सोडण्याबाबत जलसंपदा विभागाने आवश्यक कार्यवाही करावी, अशा सूचना देशमुख यांनी साळे यांना दिल्या.

निवासी उपजिल्हाधिकारी अजित देशमुख, नगररचना सहाय्यक संचालाक प्रभाकर नाळे, तहसिलदार श्रीकांत पाटील आदी उपस्थित होते.

पंढरपुरातील पूरग्रस्त कुटुंबांच्या खात्यावर मदत जमा

पूरस्थितीमुळे झालेल्या नुकसानीसाठी पंढरपूर 
तालुक्यातील ९७५ कुटुंबांच्या बँक खात्यांवर प्रत्येकी १० हजार रुपयांप्रमाणे ९७ लाख ५० हजार रुपये जमा करण्यात आले, अशी माहिती तहसीलदार मधुसूदन बर्गे यांनी दिली. या पुरामुळे नदी काठावरील ४३ गावांत व पंढरपूर शहरात पूरस्थिती निर्माण झाली. पूरस्थितीमुळे बाधित झालेल्या नागरिकांना घरातील भांडी, कपडे, घरगुती वस्तूच्या नुकसानीकरिता शासनाच्या वतीने मदत देण्यात येत आहे.

पूरस्थितीमुळे तालुक्यात एकूण ४ हजार ७९० कुटुंब बाधित झाली. आतापर्यंत ३ हजार ६५४  कुटूंबांचे पंचनामे झाले असून, त्यापैकी ९७५ बाधितग्रस्त कुटुंबांच्या बँक खात्यावरती ९७ लाख ५० हजार रुपये जमा करण्यात आले. तसेच त्यांना  २८६.७ क्विंटल गहू व २८६.७ तांदूळ पुरविण्यात आले. तालुक्यातील पात्र पूरबाधितग्रस्त प्रत्येक कुटुंबांला शासनाच्या वतीने मदत देण्यात येणार आहे. ही मदत थेट बाधितग्रस्तांच्या बँक खात्यावर जमा करण्यात येईल, असेही बर्गे यांनी सांगितले.

इतर बातम्या
कापडे, हळनोर, कांबळे यांना यंदाचा ‘डॉ....पुणे ः ‘सकाळ माध्यम समूहा’तील ‘ॲग्रोवन’चे...
आचारसंहितेच्या धास्तीने जिल्हा परिषदेत...पुणे : आगामी विधानसभा निवडणुकीच्या...
नगर जिल्ह्यात टंचाईग्रस्तांना ३८३...नगर  : पावसाची रोहिणी, मृग, आर्द्रा,...
मराठवाड्यात २६ तालुक्‍यांत...औरंगाबाद  : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांतील...
मराठवाड्यात हलक्या पावसाची हजेरीऔरंगाबाद, नांदेड : मराठवाड्यातील ३०९ मंडळांमध्ये...
महाजनादेश यात्रेत सावधगिरी म्हणून...नाशिक : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी...
साताऱ्यात यंदा ऊस हंगाम तीन महिनेच सातारा : अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या पूर...
दरकवाडीच्या दावणीला चाराप्रश्‍नाने...औरंगाबाद : आधी दुष्काळ मग खरिपातील चारा पिकांवर...
संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम पथकाची...कोल्हापूर : महापुरामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी...
सत्ताधाऱ्यांच्या चुकीच्या धोरणांने तरुण...बीड : सत्ताधाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या हिताचा...
कृषी संजीवनी प्रकल्पात पाच हेक्टरपर्यंत...मुंबई : जागतिक बँकेच्या अर्थसाह्याने राबविण्यात...
बदल्यांचा धूमधडाका सुरूचपुणे : राज्यात खरीप हंगाम शेवटच्या टप्प्यात...
वानच्या पाण्यावर पहिला हक्क शेतकऱ्यांचाअकोला : शेती सिंचनासाठी निर्माण करण्यात आलेल्या...
विमा कंपनी कार्यालयात शेतकऱ्यांचा ठिय्यासोलापूर ः पीकविम्याच्या पैशाबाबत सातत्याने...
मक्यावरील लष्करी अळीच्या प्राथमिक...नागपूर : राज्यातील मका पिकावर आलेल्या अमेरिकन...
कृषी विद्यापीठांच्या संशोधन, विकासासाठी...मुंबई ः कृषी विद्यापीठाच्या संशोधन व विकासासाठी...
कोल्हापूर जिल्ह्यात पंधरा टक्के...कोल्हापूर : जिल्ह्यात सुमारे पंधरा टक्के...
शेतकऱ्यांच्या समुपदेशनासाठी राज्यात ...नागपूर : शेतकऱ्यांना पेरणी ते काढणीपर्यंत...
कोकण, मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर...पुणे : बंगालच्या उपसागर आणि अरबी समुद्रात तयार...
कोल्हापूरच्या घाटमाथ्यावर अतिवृष्टीचा...पुणे : कोकण, घाटमाथा, मध्य महाराष्ट्राच्या पश्‍...