agriculture news in marathi Provide infrastructure in Pune market committee, otherwise the market will be closed | Agrowon

पुणे बाजार समितीत पायाभूत सुविधा द्या, अन्यथा बाजार बंद

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 25 फेब्रुवारी 2021

पुणे ः पुणे बाजार समितीमधील भुसार विभागातील पायाभूत सुविधांपासून बाजार घटक वंचित आहेत. या सुविधा ३१ मार्चपर्यंत तातडीने द्या, अन्यथा बेमुदत बाजार बंद करू, असा इशारा दि पूना मर्चंटस चेंबरने बाजार समिती प्रशासनाला दिला आहे. 

पुणे ः पुणे बाजार समितीमधील भुसार विभागातील पायाभूत सुविधांपासून बाजार घटक वंचित आहेत. या सुविधा ३१ मार्चपर्यंत तातडीने द्या, अन्यथा बेमुदत बाजार बंद करू, असा इशारा दि पूना मर्चंटस चेंबरने बाजार समिती प्रशासनाला दिला आहे. 

प्रशासनाकडे सातत्याने मागणी करत असून प्रशासन मागण्यांकडे दुर्लक्ष्य करत असल्याचा आरोप चेंबरच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेमध्ये केला. अशोक लोढा, विजय मुथा, अनिल लुंकड, प्रवीण चोरबोले, वालचंद संचेती उपस्थित होते.

चेंबरचे अध्यक्ष पोपटलाल ओस्तवाल म्हणाले,‘‘भुसार विभागातील रस्त्यांवरील खड्ड्यांबाबत दोन वर्षांपासून पाठपुरावा करत आहे. मात्र प्रशासन कंत्राट दिल्याचे सांगून कंत्राटदाराच्या निकृष्ट कामाकडे दुर्लक्ष्य करत आहे. तीन वर्षापासून रस्त्याचे काम अर्धवट आहे. ठेकेदाराला १६ कोटींचे पेमेंट देखील केले आहे. 

पाणपोई बांधल्या त्या बंद आहेत. साइट पट्ट्यांचे कॉक्रींटीकरणाचे काम अर्धवट आहे.’’ ‘‘सीसीटीव्ही यंत्रणा खराब झाली आहे. वायफाय सेवा उपलब्ध नाही, आदी विविध सुविधांसाठी सातत्याने पाठपुरावा करत आहे. ही कामे तातडीने पूर्ण न झाल्यास बेमुदत बाजार ठेवणार आहोत,’’ असेही ओस्तवाल म्हणाले. 

‘जीएसटी’च्या जाचक अटींविरोधात उद्या बंद 

जीएसटीच्या जाचक अटींच्या विरोधात शुक्रवारच्या बंदला पाठिंबा आहे. या जाचक अटी दूर करण्यासाठी आम्ही सातत्याने केंद्र सरकारकडे मागणी करत आहोत. मात्र आता असह्य झाल्याने शुक्रवारी बंद ठेवणार असल्याचे ओस्तवाल यांनी सांगितले.


इतर ताज्या घडामोडी
नगर : पीकविमा योजनेत शेतकऱ्यांचा सहभाग...नगर : नैसर्गिक संकटाने तसेच अन्य कारणाने...
`दहिगाव उपसा सिंचन योजना सौरऊर्जेवर...सोलापूर ः करमाळा तालुक्यातील दहिगाव उपसा सिंचन...
पुणे बाजार समिती चक्राकार पद्धतीने सुरू...पुणे : कोरोना विषाणू बाधित रुग्णाच्या झपाट्याने...
देशी सीताफळाच्या बियाण्याची चोरीसोलापूर ः देशी सीताफळाच्या बियाण्याची चोरी...
पाण्याच्या उपलब्धतेमुळे उन्हाळी...पुणे : गेल्या वर्षी झालेल्या चांगल्या पावसामुळे...
हिंगोली ः सोयाबीनची अडीच लाख हेक्टरवर...हिंगोली ः जिल्ह्यात यंदा खरीप हंगामात ३ लाख ५८...
अमरावतीत खरिपाचे ७ लाख हेक्टर क्षेत्र...अमरावती : कृषी विभागाच्या खरीप हंगाम २०२१...
नाशिक बाजार समितीच्या ‘त्या’ याचिका...नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती...
बियाणे, खते, कीटकनाशक नियंत्रणासाठी...नाशिक : खरीप हंगामात बियाणे पेरणीचा कालावधी...
औरंगाबाद जिल्हाभरात फळे, भाजीपाला थेट...औरंगाबाद : शहरासह जिल्हाभरात राबविल्या जात...
लातूर जिल्ह्यात त्रेचाळीस हजार क्विंटल...लातूर: जिल्ह्यात कार्यान्वित १६ केंद्रांवरून २७५९...
अवैध दारू विक्रेत्यांना शासकीय योजनांचा...चंद्रपूर : अवैध दारू विक्रीमुळे सामाजिक स्वास्थ्य...
ऑक्सिजन प्रकल्प उभारणीचा अधिकार...मुंबई : कोरोना रुग्णांची वाढती संख्या व ऑक्सिजनची...
फळाचे ‘प्रमोशन’, मूल्यवर्धन होण्याची...चिकू बागायतदार संघाच्या वतीने राज्यातील चिकू...
अकोला जिल्हा परिषदेत खांदेपालटाची चर्चा अकोला : जिल्हा परिषदेत सत्तारूढ असलेल्या वंचित...
प्रक्रिया उद्योगाला चालना देणारनारळ लागवडीचे क्षेत्र वाढविताना शेतकऱ्यांच्या...
सामूहिक प्रयत्नातून काजू उत्पादकांची...जागतिक बाजारपेठेत वैशिष्ट्यपूर्ण चव असलेल्या...
क्षेत्र वाढ, प्रक्रियेसाठी सरकारी...देशात पेरू लागवडीचे सुमारे तीन लाख हेक्टर आणि...
दुर्लक्षित पिकांनाही येत्या काळात संधीद्राक्ष, डाळिंब, आंबा, केळी, संत्रा ही राज्याच्या...
आधुनिक फुलशेती संशोधन, निर्यात...गेल्या काही वर्षांत व्यावसायिक आणि उद्योगाचा...