Agriculture news in marathi Provide insurance cover to those working on the Market Committee | Agrowon

बाजार समितीत काम करणाऱ्यांना विमा संरक्षण द्या 

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 21 एप्रिल 2020

नाशिक : ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊन सुरू असून बाजार समित्यांमध्ये लिलाव सुरू आहेत. बाजार समित्यांमध्ये कर्मचारी, माथाडी कामगार, कांदा खळ्यावरील मजूर जोखीम पत्करून काम करत आहेत. मात्र, त्यांना कोणतेही विमा संरक्षण नाही, राज्य शासनाच्या आस्थापनेवरील काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना जसे शासनाने विमा संरक्षण दिले आहे. त्याच धर्तीवर बाजार समिती कर्मचारी, माथाडी कामगार व मजूर यांनाही विमा संरक्षण द्या, अशी मागणी चांदवड बाजार समितीचे सभापती डॉ. आत्माराम कुंभार्डे यांनी मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. 

नाशिक : ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊन सुरू असून बाजार समित्यांमध्ये लिलाव सुरू आहेत. बाजार समित्यांमध्ये कर्मचारी, माथाडी कामगार, कांदा खळ्यावरील मजूर जोखीम पत्करून काम करत आहेत. मात्र, त्यांना कोणतेही विमा संरक्षण नाही, राज्य शासनाच्या आस्थापनेवरील काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना जसे शासनाने विमा संरक्षण दिले आहे. त्याच धर्तीवर बाजार समिती कर्मचारी, माथाडी कामगार व मजूर यांनाही विमा संरक्षण द्या, अशी मागणी चांदवड बाजार समितीचे सभापती डॉ. आत्माराम कुंभार्डे यांनी मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. 

निवेदनात म्हटले आहे की, सध्या बाजार समित्यांमध्ये शेतमालाचे लिलाव सुरू आहेत. ‘कोरोना’ विषाणूचे संक्रमण रोखण्यासाठी बाजार समित्यांचे निर्जंतुकीकरण करणे, सोशल डिस्टन्सिंगचे पालन, आवकेप्रमाणे शेतमालाचा लिलाव, वजन माप, काटा पट्टी करणे, यासह शिस्तपालन करून कर्मचारी कामकाज करीत आहे. शेतकरी बांधवांची कुठलीही गैरसोय होऊ नये यासाठी व्यापारी व शेतकरी यांचा समन्वय ठेऊन बाजार समित्या कर्तव्य पार पाडत आहेत. मात्र, यासाठी काम करणारे कर्मचारी वर्ग, माथाडी कामगार व कांदा भरणारे मजूर यांना कुठल्याही प्रकारचे विमा संरक्षण नाही. ‘कोरोना’ विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अत्यावश्यक सेवा बजावणाऱ्या शासनाच्या अधिपत्याखालील आस्थापनांवर कार्यरत असलेल्या कर्मचारी वर्गास शासनाने विमा संरक्षण लागू केले आहे. त्याच पार्श्वभूमीवर बाजार समितीत जोखीम पत्करून काम करणाऱ्या बाजार समितीतील कर्मचारी, माथाडी कामगार, कांदा भरणारे मजूर यांनाही विमा संरक्षण देण्याच्या मागणीचे पत्र जिल्हाधिकारी सूरज मांढरे व दिंडोरी लोकसभा मतदार संघाच्या खासदार डॉ. भारती पवार यांच्याकडे दिल्याचे त्यांनी कळविले आहे.


इतर ताज्या घडामोडी
सोलापूर जिल्ह्यात पावसामुळे महावितरणचे...सोलापूर ः महावितरणच्या अकलूज, पंढरपूर व...
वळण योजना प्रकल्प पूर्ण करा : भुजबळनाशिक : ‘‘जिल्ह्यातील पाणी पश्चिमेकडे वाहून...
कृषीकन्येकडून शेतकऱ्यांना मार्गदर्शनबदलापूर (जि.ठाणे) ः कृषी कार्यानुभव...
मालेगावात कांदा निर्यातबंदीच्या...मालेगाव, जि. नाशिक : गेल्या महिन्यात कांद्याला...
सोलापुरातील शेतकऱ्यांनो कृषी...सोलापूर : यंदाच्या वर्षासाठीची कृषी यांत्रिकीकरण...
जीवामृत निर्मितीचे प्रात्यक्षिकनशिराबाद, जि. बुलडाणाः येथील कृषीकन्या भाग्यश्री...
हिंगोलीतील सहा मंडळात अतिवृष्टीहिंगोली :जिल्ह्यात मंगळवारी (ता.२२) सकाळी...
द्राक्ष उत्पादकांची व्यापारी,...नाशिक : सुमारे ९५ टक्के द्राक्ष व्यापारी हे...
जळगाव जिल्ह्यात केळी उत्पादकांना विमा...जळगाव : शेतकरी प्रश्‍नी शरद जोशी प्रणित शेतकरी...
दुधना नदीला पूर, पिकांत पाणीच पाणीपरभणी : सेलू तालुक्यातील ब्रम्हवाकडी येथील निम्न...
उदगीरमधील ‘देवर्जन’ सात वर्षांनंतर भरलाउदगीर : देवर्जन (ता. उदगीर) येथील मध्यम...
बीड, लातूरमधील मंडळांत दमदार पाऊसऔरंगाबाद : औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद,...
गिरणा पट्ट्यात पूर ओसरताच वाळूचा उपसा...जळगाव : गिरणा परीसरातील शेतकऱ्यांना पूर,...
सेस रद्द करा, अन्यथा बंद पुकारूपुणे ः केंद्र सरकारच्या कृषी आणि पणन विषयक तीन...
जळगावात बाजार समित्या बरखास्तीचे राजकारणजळगाव ः जिल्ह्यात दोन्ही काँग्रेस, शिवसेनेची...
शेतकऱ्यांसाठी सुखावणारा कायदा ः...कोल्हापूर ः शेती उत्पन्न व्यापार आणि वाणिज्य...
बुलडाण्यात दहा हजार हेक्टरवर क्षेत्र...बुलडाणा ः जिल्ह्यात शनिवार (ता. १९) व रविवारी (ता...
सिंधुदुर्ग जिल्ह्याला मुसळधार पावसाने...सिंधुदुर्ग ः जिल्ह्याच्या काही भागाला सोमवारी (ता...
अखेर ६६५ शेतकऱ्यांना विम्याचा लाभअकोला ः  सन २०१९ च्या खरीप हंगामात पंतप्रधान...
संत्रा वाहतुकीसाठी रेल्वेकडून वरूड...अमरावती : किसान रेल्वेच्या माध्यमातून येत्या...