कोंबड्यांमध्ये रोगप्रतिकारक शक्ती कमी प्रमाणात असेल, तसेच समतोल आहार, शुद्ध हवेची कमतरता,
ताज्या घडामोडी
रब्बी हंगामासाठी ‘काटेपूर्णा’चे पाणी देण्याची मागणी
अकोला ः यंदा तुडुंब भरलेल्या काटेपूर्णा प्रकल्पातून रब्बीसाठी १० डिसेंबरपासून सिंचनासाठी पाणी उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. काटेपूर्णा प्रकल्प समितीची सभा शुक्रवारी (ता. १५) बोरगाव मंजू येथील उपविभागीय कार्यालयात झाली. मनोज तायडे हे अध्यक्षस्थानी होते. तर उपविभागीय अधिकारी अभिजित नितनवरे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
अकोला ः यंदा तुडुंब भरलेल्या काटेपूर्णा प्रकल्पातून रब्बीसाठी १० डिसेंबरपासून सिंचनासाठी पाणी उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. काटेपूर्णा प्रकल्प समितीची सभा शुक्रवारी (ता. १५) बोरगाव मंजू येथील उपविभागीय कार्यालयात झाली. मनोज तायडे हे अध्यक्षस्थानी होते. तर उपविभागीय अधिकारी अभिजित नितनवरे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
परतीच्या पावसामुळे खरिपातील पिके पूर्णपणे नष्ट झाली. रब्बीच्या भरवशावर शेतकऱ्यांची अर्थव्यवस्था अवलंबून आहे. त्यामुळे पाणी वापर संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी रब्बी हंगामात हरभरा व गव्हाचे पीक घेण्यासाठी सिंचनाकरिता पाण्याची आवश्यकता भासणार आहे, असे सांगितले. त्याकरिता प्रकल्पावरील सर्वंच पाणीवापर संस्थेच्या देखभाल दुरुस्तीची कामे १ डिसेंबर २०१९ पर्यंत जलसंपदा विभागाने पूर्ण करून १०डिसेंबरला कालव्यात पाणी सोडण्याची मागणी शेतकऱ्यांनी नितनवरे यांच्याकडे केली. मनोज तायडे यांनीही सभेत मागणी लावून धरली.
जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता अवस्थी व कार्यकारी अभियंता वाकोडे यांच्या समोर यापूर्वी प्रकल्पाचे अनेक प्रश्न आणि समस्या सोडविण्यासाठी मांडलेली भूमिकाही त्यांनी स्पष्ट केली. यावर्षी शेतकऱ्यांची संपूर्ण आर्थिक बाजू रब्बी हंगामावर अवलंबून असल्याने शेतकऱ्यांना गहू व हरभरा पीक घेण्यासाठी ३१ मार्च २०२० पर्यंत पाणीपुरवठा करावा. सिंचन कायदा २००५ व नियम २००६ नुसार ‘टेल टू हेड’ या सूत्रांची अंमलबजावणी करून जलसंपदा विभागाने ही सर्व कामे तत्परतेने करून सिंचनाच्या नवीन पध्दतीने पाण्याचा पुरवठा करावा, असे आवाहन केले.
ही सर्व कामे वेळेवर पूर्ण करण्यासाठी आम्ही
पाणीवापर संस्थांना सोबत घेऊन कामे करू, अशी ग्वाही या वेळी नितनवरे यांनी दिली. या कार्यक्रमात शाखा अभियंता जाधव व जलसंपदा विभागाचे कर्मचारी आणि काटेपूर्णा प्रकल्पावरील सर्व पाणी वापर संस्थेची पदाधिकारी दिगंबर पाटील गांवडे, आनंदराव रायकर, सुभाष धोत्रे, मनोहर ठोकळ, अरविंद तायडे, पांडुरंग साबळे, डॉ. शर्मा, प्रकाश दळवी, राजू गमे, हरिदास गावंडे, राजू बापू, दीपक नागे, बाळासाहेब वसू, कुकडे, वसंतराव गावंडे, बाबुराव गावंडे, रामभाऊ खानापुरे, गणेश काकड, मुरलीधर रेवस्कार आदी लाभधारक शेतकरी व पदाधिकारी उपस्थित होते.