Agriculture news in marathi provide Mineral mixtures in the diet of cattle | Agrowon

जनावरांच्या आहारात असावीत खनिज मिश्रणे

डॉ. मंजूषा ढगे, डॉ. पंढरीनाथ राठोड
बुधवार, 1 जुलै 2020

खनिज मिश्रणाच्या अभावामुळे होणारे जनावरांच्यामध्ये चयापचयाचे आजार तसेच दूधज्वर, किटोसिस, लालमूत्र आजार दिसतो. हे लक्षात घेऊन जनावरांच्या आहारात शिफारशीनुसार खनिज मिश्रणाचा समावेश करावा.
 

खनिज मिश्रणाच्या अभावामुळे होणारे जनावरांच्यामध्ये चयापचयाचे आजार तसेच दूधज्वर, किटोसिस, लालमूत्र आजार दिसतो. हे लक्षात घेऊन जनावरांच्या आहारात शिफारशीनुसार खनिज मिश्रणाचा समावेश करावा.

जनावरांचे आरोग्य निरोगी, संतुलित राहण्यासाठी, त्यांच्या रोजच्या शरीर व्यवस्थापनासाठी, त्यांना शारीरिक ऊर्जा निर्माण करून देण्यासाठी कर्बोदके, प्रथिने, मेद, जीवनसत्त्व, क्षार आणि पाणी आवश्यकता असते. यामधील एकही घटकाचा अभाव हा जनावरांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम करतो. या सर्व गोष्टी जनावरांना रोजच्या आहारातून मिळतात. खनिज, क्षारांचा विचार केला तर दिलेल्या आहारामध्ये मोठ्या प्रमाणात यांची कमतरता दिसून येते. आपण जनावरांना जो चारा देतो, त्या चाऱ्यामध्ये खनिजांचा अभाव पहिल्यापासूनच आहे, कारण जमिनीमध्येच खनिजांची कमतरता आहे. चाऱ्यातील कमतरतेमुळे जनावरांना पुरेशी खनिजे मिळत नाहीत.

खनिजे, जीवनसत्वे ही शरीरामध्ये होणाऱ्या वेगवेगळ्या क्रिया जसे की, चयापचयाच्या क्रिया, शोषण प्रक्रिया, रक्त गोठण प्रक्रिया, हाडांच्या मजबुतीसाठी आवश्यक आहे. गाई, म्हशी विण्याच्या शेवटच्या महिन्यात जनावरांना कॅल्शियमचा पुरवठा करणे अत्यावश्यक असतो, अन्यथा प्रसूती अवघड होते. जन्मलेले वासरू ही सुदृढ राहत नाही. फॉस्फरस खनिजाच्या अभावामुळे जनावरांना पिका, लाल मूत्र रोग होतात.

 • जनावरांना खनिज व जीवनसत्त्वाची गरज कमी असली तरी अत्यावश्यक आहे. या अभावावर मात करण्यासाठी जनावरांच्या आहारामध्ये खनिज मिश्रणाचा समावेश करावा.
 • खनिज मिश्रणामध्ये जनावरांना आवश्यक असणाऱ्या खनिजांचा गरजेनुसार समावेश करण्यात येतो.
 • खनिज मिश्रणाचा आहारामध्ये योग्य, नियमित व सुरळीत वापर केल्याने जनावरांचे प्रजोत्पादन, दुधोत्पादन, शारीरिक वाढ तसेच रोग प्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होते.

जनावरांना खनिज मिश्रणाचे प्रमाण

वासरू ( ३ महिन्याच्या पुढे ) २५ ग्रॅम प्रतिजनावर/प्रतिदिन
कालवड (२.५-३ वर्षापर्यंत) ५० ग्रॅम प्रतिजनावर/प्रतिदिन
दुधाळ जनावरे (दूध उत्पादनावर अवलंबून) १००-२०० ग्रॅम प्रतिजनावर/प्रतिदिन

टीप

 • वासरांना खनिज मिश्रण हे जन्मल्यानंतर तीन महिन्यानंतर चालू करावे.
 • खनिज मिश्रण हे जनावरांना विशिष्ट वेळेत न देता त्यांचा आहारामध्ये समावेश हा रोज नियमितरीत्या दिल्या गेलेल्या प्रमाणानुसार करावा.
 • जर जनावरांच्या आहारात दररोज खुराक देण्यात येत असेल तर खनिज मिश्रण देण्याचे प्रमाण हे २ किलो प्रति १०० किलो खुराक असे असावे.

आहारामध्ये खनिज मिश्रणाचे फायदे

 • वासरे आणि जनावरांच्या शारीरिक वाढीमध्ये सुधारणा होते.
 • आहारातून शोषून घेतलेल्या पोषणमूल्यांचे व्यवस्थितरीत्या सर्व शरीरामध्ये प्रसारण करते.
 • दूध उत्पादनामध्ये चांगली वाढ होते.
 • प्रजोत्पादनक्षमता सुधारते. दोन वेतातील अंतर कमी होते.
 • जनावरांचा उत्पादन कालावधी वाढतो.
 • जनावरांची रोगप्रतिकारक शक्ती चांगली राहते.

संपर्क- डॉ. मंजूषा ढगे, ९०६७०३७२०३,
डॉ. पंढरीनाथ राठोड, ८८०६३२८२६६
(पशुपोषण विभाग, पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालय, उदगीर, जि. लातूर)


इतर कृषिपूरक
दुग्ध व्यवसाय ठरतोय शेतीला आधारपनवेल येथील बांधकाम व्यावसायिक अनिल लक्ष्मण...
जनावरांच्या आहारात असावीत खनिज मिश्रणेखनिज कमतरतेचा परिणाम जनावरांची वाढ तसेच प्रजनन...
सामूहिक प्रयत्नातूनच प्राणिजन्य आजारावर...जगातील सुमारे ७० टक्के आजार हे प्राणिजन्य आहेत,...
जनावरांमध्ये दिसतोय स्नोअरिंग आजारमराठवाड्यातील काही भागांमध्ये (विशेषतः औंढा...
कोंबड्यांतील रोगप्रसार टाळाआजारी कोंबड्यांच्या व्यवस्थापनासाठी लागणारी भांडी...
विक्रमी दुग्धोत्पादन देणारी ‘जोगन'गायहरियानातील गालीब खेरी (कर्नाल) येथील पशूपालक...
जनावरांच्या आरोग्याकडे नको दुर्लक्षपावसाळ्यात हिरव्या चाऱ्याची उपलब्धता अधिक...
शाश्‍वत दूध उत्पादनासाठी ‘टीएमआर'गायीला शरीर वजन तसेच दूध उत्पादनासाठी आवश्यक...
जातिवंत वंशवृद्धीसाठी भ्रूण प्रत्यारोपण...साधारणपणे जातिवंत दुधाळू गाय एका वर्षात एकाच...
जनावरांच्या आहारात असावीत खनिज मिश्रणेखनिज मिश्रणाच्या अभावामुळे होणारे...
स्वच्छ दूध उत्पादनाची तत्त्वेदूध उत्पादनामध्ये भारताने आघाडी घेतली असली तरी...
संकरित गाईंची दूध उत्पादन वाढीची सूत्रेसद्यःस्थितीतील संकरित गाईंची दुसऱ्या-तिसऱ्या...
रेशीम कीटकांवर होणारा हवामानाचा परिणामरेशीम उत्पादनासाठी आवश्यक खर्चाचे प्रमाण अत्यल्प...
रानभाज्यांचे आहारातील महत्त्वशेती न करता नैसर्गिक स्थितीमध्ये उगवलेल्या...
दुधाळ जनावरांसाठी सॉर्डेड सीमेन...अलीकडच्या काळात पशुपालनामध्ये सेक्‍स ...
जनावरे, गोठ्याची ठेवा स्वच्छतापावसाळ्यात जनावरांच्या आरोग्याला असलेला धोका...
रेबीज’ची लक्षणे तपासा, उपाययोजना करामनुष्यामध्ये रेबीज विषाणू मध्यवर्ती मज्जासंस्थेला...
जनावरांमध्ये होणारा शिंगाचा कर्करोगशिंगाचा कर्करोग साधारणपणे ५ ते १० वर्षे वयोगटातील...
गवळाऊ संगोपनाचे पाऊल पडते पुढेविदर्भामध्ये गवळाऊ दुधाळ गाय आणि शेतीकामासाठी...
जनावरांच्या आहारात मूरघासाचा वापरमूरघासामुळे वर्षभर हिरव्या चाऱ्याचा पुरवठा करता...